Honor 30S - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 28 May 2020 05:25:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 40MP क्वाड कॅमेरा, 4000mAh बॅटरी आणि 5G सह आला Honor 30 https://www.91mobiles.com/marathi/honor-30-launch-with-40mp-quad-camera-4000mah-battery-and-5g-chipset-know-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/honor-30-launch-with-40mp-quad-camera-4000mah-battery-and-5g-chipset-know-price-specification/#respond Wed, 15 Apr 2020 11:05:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7098 सध्यातरी Honor 30 स्मार्टफोन कंपनीने फक्त चाइनीज मार्केट मध्ये सादर केला आहे.

The post 40MP क्वाड कॅमेरा, 4000mAh बॅटरी आणि 5G सह आला Honor 30 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने काही दिवसांपूर्वी आपले तीननवीन स्मार्टफोन Huawei P40, Huawei P40 Pro आणि Huawei P40 Pro+ सादर केला होते. आता Huawei च्या सब-ब्रँड Honor ने Honor 30 सीरीज सादर केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने Honor 30, Honor 30 Pro आणि Honor 30 Pro+ लॉन्च केले आहेत. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Honor 30 बद्दल सर्व माहिती देणार आहोत.

किंमत आणि उपलब्धता

सध्यातरी Honor 30 स्मार्टफोन कंपनीने फक्त चाइनीज मार्केट मध्ये सादर केला आहे. फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे तर डिवाइसच्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 2999 (जवळपास 32,000 रुपये), 8GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 3199 (जवळपास 34000 रुपये) आणि टॉप-एंड वेरिएंट 8GB + 256GB ची किंमत CNY 3499 (जवळपास 37000 रुपये) आहे.

स्पेसिफिकेशन्स

Honor 30 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. तसेच हा स्मार्टफोन 60Hz रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे. फोन मध्ये 6GB रॅम + 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज असलेले तीन वेरिएंट आहेत.

याव्यतिरिक्त फोन मध्ये फोटोग्राफीसाठी मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 40 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर (IMX600) 50x टेलीफोटो कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल-कॅमेरा, 8-मेगापिक्सल पेरीस्कोप टेलीफोटो (OIS सोपोर्ट), आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन Magic UI 3.1.1 बेस्ड एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. डिवाइस मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 40W फास्ट चार्जिंग सह येते. बॅटरी बद्दल Honor चा दावा आहे कि स्मार्टफोन फक्त 30 मिनिटांत 75 टक्के चार्ज होईल.

The post 40MP क्वाड कॅमेरा, 4000mAh बॅटरी आणि 5G सह आला Honor 30 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-30-launch-with-40mp-quad-camera-4000mah-battery-and-5g-chipset-know-price-specification/feed/ 0
50MP Sony IMX700 सेंसर सह लॉन्च होईल Honor 30, फोटो आला समोर https://www.91mobiles.com/marathi/honor-30-with-50-megapixel-sony-imx700-quad-rear-camera-to-launch-0n-15-april/ https://www.91mobiles.com/marathi/honor-30-with-50-megapixel-sony-imx700-quad-rear-camera-to-launch-0n-15-april/#respond Fri, 03 Apr 2020 12:52:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6993 Honor 30 संबंधित हि माहिती जीएसएम एरिना वेबसाइटने दिली आहे. वेबसाइटने ऑनर 30 चा फोटो शेयर करत दावा केला आहे कि हा फोन 50 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला जाईल.

The post 50MP Sony IMX700 सेंसर सह लॉन्च होईल Honor 30, फोटो आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei च्या सब-ब्रँड Honor ने याच आठवड्यात टेक मंचा वर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत फ्लॅगशिप फोन Honor 30s लॉन्च केला आहे. पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा फोन सादर केल्यानंतर ऑनर आता हि सीरीज वाढवत अजून दोन नवीन फोन Honor 30 आणि Honor 30 Pro आणण्यास तयार आहे. मागे बातमी आली होती कि कंपनी येत्या 15 एप्रिलला हे दोन्ही फोन स्मार्टफोन मार्केट मध्ये लॉन्च करेल. कंपनी कडून अजूनतरी ऑनर 30 आणि 30 प्रो च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आलेली नाही, पण एका मीडिया रिपोर्ट मध्ये Honor 30 संबंधित महत्वाच्या माहितीचा खुलासा झाला आहे.

Honor 30 संबंधित हि माहिती जीएसएम एरिना वेबसाइटने दिली आहे. वेबसाइटने ऑनर 30 चा फोटो शेयर करत दावा केला आहे कि हा फोन 50 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला जाईल. फोटो बघून समजते कि Honor 30 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. हा कॅमेरा सेटअप चौकोनी आकाराचा असेल जो फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन सेंसर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहेत तर चौथा सेंसर आणि फ्लॅश लाईट उजवीकडे आहे. फ्लॅशच्या वर लेंसची माहिती लिहिण्यात आली आहे.

Honor 30 च्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये सर्वात वरचा कॅमेरा सेंसर पण गोल ऐवजी चौकोनी आकाराचा आहे. सेंसर बद्दल बोलायचे तर रिपोर्टनुसार फोन मध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX700 सेंसर दिला जाईल. हा कॅमेरा Octa PD फीचरला पण सपोर्ट करेल. ऑनर 30 च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये डुअल एलईडी फ्लॅश देण्यात आली आहे. फोटो मध्ये फोनचा कलर सिल्वर पर्पल शेड मध्ये दाखवण्यात आला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार किरीन 990 5जी चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये मोठा डिस्प्ले, पंच-होल फ्रंट कॅमेरा, फास्ट चार्जिंग आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सारखे फ्लॅगशिप फीचर्स असू शकतात.

HONOR 30S

Honor 30S कंपनीने 6.5-इंचाच्या FHD+ IPS डिस्प्ले सह सादर केला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2400 x 1800 पिक्सल आणि स्क्रीन ब्राइटनेस 450 nits आहे. इतकेच नव्हे तर फोनचा हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90.3 टक्के आहे. कंपनीने फोन मध्ये किरिन 820 5G चिपसेट दिला आहे जो चार एआरएम-कॉर्टेक्स ए 55 कोर सह आठ कोर आर्किटेक्चर क्लॉक स्पीड 1.84GHz सह चार एआरएम-ए 76 कोर सह येतो. फोन मध्ये 8जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेजचा ऑप्शन आहे. तसेच डिवाइस मध्ये मॅजिक UI 3.1.1 बेस्ड एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे.

फोन मध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, ज्यात f / 1.8 अपर्चर आहे हा 16-मेगापिक्सेल इमेजचे आउटपुट देतो. 8-मेगापिक्सल ऑप्टिकल झूम लेंस 3x ऑप्टिकल झूम, 5x हाइब्रिड झूम आणि 20x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. 120 डिग्री वाइड-अँगल लेंस लँडस्केप बिल्डिंगसाठी देण्यात आला आहे, तर 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस छोट्या ऑबजेक्टसाठी देण्यात आली आहे. तर पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000 mAh ची बॅटरी 40W वायर फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

The post 50MP Sony IMX700 सेंसर सह लॉन्च होईल Honor 30, फोटो आला समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-30-with-50-megapixel-sony-imx700-quad-rear-camera-to-launch-0n-15-april/feed/ 0
64MP कॅमेरा आणि किरिन 820 5G प्रोसेसर सह आला Honor 30S, जाणून घ्या याची खासियत https://www.91mobiles.com/marathi/honor-30s-goes-official-with-kirin-820-5g-soc-and-4000-mah-battery-know-price-full-specification/ https://www.91mobiles.com/marathi/honor-30s-goes-official-with-kirin-820-5g-soc-and-4000-mah-battery-know-price-full-specification/#respond Tue, 31 Mar 2020 13:24:57 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6953 Honor 30S कंपनीच्या Honor 30 सीरीजचा सर्वात छोटा मेंबर आहे जो प्रीमियम ग्लास आणि अल्युमीनियम डिजाइन सह सादर केला गेला आहे.

The post 64MP कॅमेरा आणि किरिन 820 5G प्रोसेसर सह आला Honor 30S, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Honor 30S अनेक दिवस चर्चेत होता. आता हा डिवाइस कंपनीने अधिकृतपणे आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये सादर केला आहे. Honor 30S कंपनीने 5जी सपोर्ट सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 40 वॉट फास्ट चार्जिंग आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चला पुढे फोनची सर्व माहिती पाहू.

Honor 30S कंपनीच्या Honor 30 सीरीजचा सर्वात छोटा मेंबर आहे जो प्रीमियम ग्लास आणि अल्युमीनियम डिजाइन सह सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंटला टॉप लेफ्ट साइडला पंच होल देण्यात आला आहे. फ्रंट पॅनलची डिजाइन Honor 20S सारखी दिसते. तसेच डिवाइसची बॉटम वगळता बेजल्स खूप कमी आहेत. मागे क्वाड कॅमेरा सेटअप चौकोनी आकाराचा देण्यात आला आहे. या सेटअप सोबतच एलईडी फ्लॅश लाइट आहे.

किंमत

Honor 30S कंपनीने एक रॅम व दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे. या डिवाइसच्या 8/128GB वेरिएंटची किंमत CNY 2,399 (जवळपास रुपये) आणि 8/256GB वर्जनची किंमत CNY 2,699 (जवळपास रुपये) आहे. डिवाइसची प्री-ऑर्डर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर सेल 7 एप्रिलला आयोजित केला जाईल. डिवाइस भारतात येण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच Honor 30S कंपनीने Black, Blue, Green आणि Gradient कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे.

दमदार कॅमेरा

फोन मध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, ज्यात f / 1.8 अपर्चर आहे हा 16-मेगापिक्सेल इमेजचे आउटपुट देतो. 8-मेगापिक्सल ऑप्टिकल झूम लेंस 3x ऑप्टिकल झूम, 5x हाइब्रिड झूम आणि 20x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. 120 डिग्री वाइड-अँगल लेंस लँडस्केप बिल्डिंगसाठी देण्यात आला आहे, तर 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस छोट्या ऑबजेक्टसाठी देण्यात आली आहे. HONOR 30S एका 1 / 1.7-इंचाच्या अल्ट्रा-बिग सेंसर सह येतो जो क्वाड बायर एल्गोरिथ्मला सपोर्ट करतो आणि सुपर नाइट मोडला पण सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याची माहिती अजूनतरी समोर आलेली नाही.

HONOR 30S एक शानदार वीडियोग्राफी डिवाइस आहे, जो 4K 30fps वीडियो शूटिंग, 32X (960 एफपीएस @ 720p) स्लो-मोशन आणि 4K एचडी टाइम-लॅप्स शूटिंगला सपोर्ट करतो. HONOR 30S हाई क्विलिटी असलेले वीडियो देण्यासाठी AIS five-axis इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट सह येतो. तसेच यात इमेज स्टॅबिलायजेशन पण आहे.

स्पेसिफिकेशन्स

Honor 30S कंपनीने 6.5-इंचाच्या FHD+ IPS डिस्प्ले सह सादर केला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2400 x 1800 पिक्सल आणि स्क्रीन ब्राइटनेस 450 nits आहे. इतकेच नव्हे तर फोनचा हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90.3 टक्के आहे. कंपनीने फोन मध्ये किरिन 820 5G चिपसेट दिला आहे जो चार एआरएम-कॉर्टेक्स ए 55 कोर सह आठ कोर आर्किटेक्चर क्लॉक स्पीड 1.84GHz सह चार एआरएम-ए 76 कोर सह येतो.

फोन मध्ये 8जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेजचा ऑप्शन आहे. डिवाइस मध्ये मॅजिक UI 3.1.1 बेस्ड एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000 mAh ची बॅटरी 40W वायर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post 64MP कॅमेरा आणि किरिन 820 5G प्रोसेसर सह आला Honor 30S, जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-30s-goes-official-with-kirin-820-5g-soc-and-4000-mah-battery-know-price-full-specification/feed/ 0
5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला Honor चा स्वस्त स्मार्टफोन Play 9A https://www.91mobiles.com/marathi/honor-play-9a-launched-with-5000mah-battery-dual-camera-4gb-ram-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/honor-play-9a-launched-with-5000mah-battery-dual-camera-4gb-ram-specs-price/#respond Tue, 31 Mar 2020 12:55:19 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6950 Honor Play 9A गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या ऑनर प्ले 8ए स्मार्टफोनचा अपग्रेडेड मॉडेल आहे जो कमी किंमतीत सेलसाठी उपलब्ध होईल.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला Honor चा स्वस्त स्मार्टफोन Play 9A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी HONOR ने अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत फ्लॅगशिप फोन Honor 30S लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये आला आहे. ऑनर 30एस सोबतच कंपनीने लो बजेट मध्ये पण नवीन डिवाईस सादर केला आहे. कंपनीने हा फोन Honor Play 9A नावाने लॉन्च केला आहे. ऑनर प्ले 9ए गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या ऑनर प्ले 8ए स्मार्टफोनचा अपग्रेडेड मॉडेल आहे जो कमी किंमतीत सेलसाठी उपलब्ध होईल.

Honor Play 9A

ऑनर प्ले 9ए चे स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनचे डायमेंशन 159.07 x 74.06 x 9.04एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. कंपनीने हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.3 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हि नॉच स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप मध्ये देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट आहे.

Honor Play 9A एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो मॅजिक यूआई 3.0.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी इस फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन पावरवीआर जीई8320 जीपीयू ला सपोर्ट करतो. ऑनर प्ले 9ए 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजच्या दोन ऑप्शन्स मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलासायचे झाले तर फोनच्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबतच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Honor Play 9A एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Honor Play 9A डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Honor Play 9A च्या किंमतीबाबत बोलायचे तर फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 899 युआन (जवळपास 9,500 रुपये) मध्ये लॉन्च झाला आहे तसेच फोनचा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 1199 युआन (जवळपास 12,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post 5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला Honor चा स्वस्त स्मार्टफोन Play 9A first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-play-9a-launched-with-5000mah-battery-dual-camera-4gb-ram-specs-price/feed/ 0