50MP Sony IMX700 सेंसर सह लॉन्च होईल Honor 30, फोटो आला समोर

Huawei च्या सब-ब्रँड Honor ने याच आठवड्यात टेक मंचा वर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत फ्लॅगशिप फोन Honor 30s लॉन्च केला आहे. पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा फोन सादर केल्यानंतर ऑनर आता हि सीरीज वाढवत अजून दोन नवीन फोन Honor 30 आणि Honor 30 Pro आणण्यास तयार आहे. मागे बातमी आली होती कि कंपनी येत्या 15 एप्रिलला हे दोन्ही फोन स्मार्टफोन मार्केट मध्ये लॉन्च करेल. कंपनी कडून अजूनतरी ऑनर 30 आणि 30 प्रो च्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आलेली नाही, पण एका मीडिया रिपोर्ट मध्ये Honor 30 संबंधित महत्वाच्या माहितीचा खुलासा झाला आहे.

Honor 30 संबंधित हि माहिती जीएसएम एरिना वेबसाइटने दिली आहे. वेबसाइटने ऑनर 30 चा फोटो शेयर करत दावा केला आहे कि हा फोन 50 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला जाईल. फोटो बघून समजते कि Honor 30 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. हा कॅमेरा सेटअप चौकोनी आकाराचा असेल जो फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन सेंसर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहेत तर चौथा सेंसर आणि फ्लॅश लाईट उजवीकडे आहे. फ्लॅशच्या वर लेंसची माहिती लिहिण्यात आली आहे.

Honor 30 च्या क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये सर्वात वरचा कॅमेरा सेंसर पण गोल ऐवजी चौकोनी आकाराचा आहे. सेंसर बद्दल बोलायचे तर रिपोर्टनुसार फोन मध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX700 सेंसर दिला जाईल. हा कॅमेरा Octa PD फीचरला पण सपोर्ट करेल. ऑनर 30 च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये डुअल एलईडी फ्लॅश देण्यात आली आहे. फोटो मध्ये फोनचा कलर सिल्वर पर्पल शेड मध्ये दाखवण्यात आला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार किरीन 990 5जी चिपसेट वर लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच फोन मध्ये मोठा डिस्प्ले, पंच-होल फ्रंट कॅमेरा, फास्ट चार्जिंग आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सारखे फ्लॅगशिप फीचर्स असू शकतात.

HONOR 30S

Honor 30S कंपनीने 6.5-इंचाच्या FHD+ IPS डिस्प्ले सह सादर केला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2400 x 1800 पिक्सल आणि स्क्रीन ब्राइटनेस 450 nits आहे. इतकेच नव्हे तर फोनचा हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90.3 टक्के आहे. कंपनीने फोन मध्ये किरिन 820 5G चिपसेट दिला आहे जो चार एआरएम-कॉर्टेक्स ए 55 कोर सह आठ कोर आर्किटेक्चर क्लॉक स्पीड 1.84GHz सह चार एआरएम-ए 76 कोर सह येतो. फोन मध्ये 8जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेजचा ऑप्शन आहे. तसेच डिवाइस मध्ये मॅजिक UI 3.1.1 बेस्ड एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे.

फोन मध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, ज्यात f / 1.8 अपर्चर आहे हा 16-मेगापिक्सेल इमेजचे आउटपुट देतो. 8-मेगापिक्सल ऑप्टिकल झूम लेंस 3x ऑप्टिकल झूम, 5x हाइब्रिड झूम आणि 20x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. 120 डिग्री वाइड-अँगल लेंस लँडस्केप बिल्डिंगसाठी देण्यात आला आहे, तर 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस छोट्या ऑबजेक्टसाठी देण्यात आली आहे. तर पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000 mAh ची बॅटरी 40W वायर फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here