64MP कॅमेरा आणि किरिन 820 5G प्रोसेसर सह आला Honor 30S, जाणून घ्या याची खासियत

Honor 30S अनेक दिवस चर्चेत होता. आता हा डिवाइस कंपनीने अधिकृतपणे आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये सादर केला आहे. Honor 30S कंपनीने 5जी सपोर्ट सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये 40 वॉट फास्ट चार्जिंग आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. चला पुढे फोनची सर्व माहिती पाहू.

Honor 30S कंपनीच्या Honor 30 सीरीजचा सर्वात छोटा मेंबर आहे जो प्रीमियम ग्लास आणि अल्युमीनियम डिजाइन सह सादर केला गेला आहे. फोनच्या फ्रंटला टॉप लेफ्ट साइडला पंच होल देण्यात आला आहे. फ्रंट पॅनलची डिजाइन Honor 20S सारखी दिसते. तसेच डिवाइसची बॉटम वगळता बेजल्स खूप कमी आहेत. मागे क्वाड कॅमेरा सेटअप चौकोनी आकाराचा देण्यात आला आहे. या सेटअप सोबतच एलईडी फ्लॅश लाइट आहे.

किंमत

Honor 30S कंपनीने एक रॅम व दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे. या डिवाइसच्या 8/128GB वेरिएंटची किंमत CNY 2,399 (जवळपास रुपये) आणि 8/256GB वर्जनची किंमत CNY 2,699 (जवळपास रुपये) आहे. डिवाइसची प्री-ऑर्डर प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर सेल 7 एप्रिलला आयोजित केला जाईल. डिवाइस भारतात येण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच Honor 30S कंपनीने Black, Blue, Green आणि Gradient कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे.

दमदार कॅमेरा

फोन मध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, ज्यात f / 1.8 अपर्चर आहे हा 16-मेगापिक्सेल इमेजचे आउटपुट देतो. 8-मेगापिक्सल ऑप्टिकल झूम लेंस 3x ऑप्टिकल झूम, 5x हाइब्रिड झूम आणि 20x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. 120 डिग्री वाइड-अँगल लेंस लँडस्केप बिल्डिंगसाठी देण्यात आला आहे, तर 2-मेगापिक्सल मॅक्रो लेंस छोट्या ऑबजेक्टसाठी देण्यात आली आहे. HONOR 30S एका 1 / 1.7-इंचाच्या अल्ट्रा-बिग सेंसर सह येतो जो क्वाड बायर एल्गोरिथ्मला सपोर्ट करतो आणि सुपर नाइट मोडला पण सपोर्ट करतो. फोनच्या फ्रंट कॅमेऱ्याची माहिती अजूनतरी समोर आलेली नाही.

HONOR 30S एक शानदार वीडियोग्राफी डिवाइस आहे, जो 4K 30fps वीडियो शूटिंग, 32X (960 एफपीएस @ 720p) स्लो-मोशन आणि 4K एचडी टाइम-लॅप्स शूटिंगला सपोर्ट करतो. HONOR 30S हाई क्विलिटी असलेले वीडियो देण्यासाठी AIS five-axis इमेज स्टेबलाइजेशन सपोर्ट सह येतो. तसेच यात इमेज स्टॅबिलायजेशन पण आहे.

स्पेसिफिकेशन्स

Honor 30S कंपनीने 6.5-इंचाच्या FHD+ IPS डिस्प्ले सह सादर केला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2400 x 1800 पिक्सल आणि स्क्रीन ब्राइटनेस 450 nits आहे. इतकेच नव्हे तर फोनचा हाई स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 90.3 टक्के आहे. कंपनीने फोन मध्ये किरिन 820 5G चिपसेट दिला आहे जो चार एआरएम-कॉर्टेक्स ए 55 कोर सह आठ कोर आर्किटेक्चर क्लॉक स्पीड 1.84GHz सह चार एआरएम-ए 76 कोर सह येतो.

फोन मध्ये 8जीबी रॅम सह 128जीबी स्टोरेज आणि 256जीबी स्टोरेजचा ऑप्शन आहे. डिवाइस मध्ये मॅजिक UI 3.1.1 बेस्ड एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 4,000 mAh ची बॅटरी 40W वायर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here