5000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला Honor चा स्वस्त स्मार्टफोन Play 9A

टेक कंपनी HONOR ने अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत फ्लॅगशिप फोन Honor 30S लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीच्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये आला आहे. ऑनर 30एस सोबतच कंपनीने लो बजेट मध्ये पण नवीन डिवाईस सादर केला आहे. कंपनीने हा फोन Honor Play 9A नावाने लॉन्च केला आहे. ऑनर प्ले 9ए गेल्यावर्षी लॉन्च झालेल्या ऑनर प्ले 8ए स्मार्टफोनचा अपग्रेडेड मॉडेल आहे जो कमी किंमतीत सेलसाठी उपलब्ध होईल.

Honor Play 9A

ऑनर प्ले 9ए चे स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनचे डायमेंशन 159.07 x 74.06 x 9.04एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. कंपनीने हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1600 × 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.3 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हि नॉच स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप मध्ये देण्यात आली आहे. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट आहे.

Honor Play 9A एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो मॅजिक यूआई 3.0.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी इस फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो पी35 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन पावरवीआर जीई8320 जीपीयू ला सपोर्ट करतो. ऑनर प्ले 9ए 4 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजच्या दोन ऑप्शन्स मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलासायचे झाले तर फोनच्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो उजवीकडे आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे सोबतच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी डेफ्थ सेंसर आहे. त्याचप्रमाणे सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी Honor Play 9A एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Honor Play 9A डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Honor Play 9A च्या किंमतीबाबत बोलायचे तर फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 899 युआन (जवळपास 9,500 रुपये) मध्ये लॉन्च झाला आहे तसेच फोनचा 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 1199 युआन (जवळपास 12,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here