40MP क्वाड कॅमेरा, 4000mAh बॅटरी आणि 5G सह आला Honor 30

Huawei ने काही दिवसांपूर्वी आपले तीननवीन स्मार्टफोन Huawei P40, Huawei P40 Pro आणि Huawei P40 Pro+ सादर केला होते. आता Huawei च्या सब-ब्रँड Honor ने Honor 30 सीरीज सादर केली आहे. या सीरीज मध्ये कंपनीने Honor 30, Honor 30 Pro आणि Honor 30 Pro+ लॉन्च केले आहेत. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Honor 30 बद्दल सर्व माहिती देणार आहोत.

किंमत आणि उपलब्धता

सध्यातरी Honor 30 स्मार्टफोन कंपनीने फक्त चाइनीज मार्केट मध्ये सादर केला आहे. फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे तर डिवाइसच्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 2999 (जवळपास 32,000 रुपये), 8GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 3199 (जवळपास 34000 रुपये) आणि टॉप-एंड वेरिएंट 8GB + 256GB ची किंमत CNY 3499 (जवळपास 37000 रुपये) आहे.

स्पेसिफिकेशन्स

Honor 30 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 2400×1080 पिक्सल आहे. तसेच हा स्मार्टफोन 60Hz रिफ्रेश रेट असलेल्या डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे. फोन मध्ये 6GB रॅम + 128GB स्टोरेज, 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज असलेले तीन वेरिएंट आहेत.

याव्यतिरिक्त फोन मध्ये फोटोग्राफीसाठी मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 40 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर (IMX600) 50x टेलीफोटो कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड-अँगल-कॅमेरा, 8-मेगापिक्सल पेरीस्कोप टेलीफोटो (OIS सोपोर्ट), आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन Magic UI 3.1.1 बेस्ड एंडरॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो. डिवाइस मध्ये पावर बॅकअपसाठी 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 40W फास्ट चार्जिंग सह येते. बॅटरी बद्दल Honor चा दावा आहे कि स्मार्टफोन फक्त 30 मिनिटांत 75 टक्के चार्ज होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here