Honor 8X - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:50 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 या स्वस्त फोन्स मध्ये सुपर फास्ट चालेल PUBG गेम https://www.91mobiles.com/marathi/top-smartphones-for-pubg-mobile-under-15000-rupees-xiaomi-redmi-note-7-pro-realme-3-and-more-phone/ https://www.91mobiles.com/marathi/top-smartphones-for-pubg-mobile-under-15000-rupees-xiaomi-redmi-note-7-pro-realme-3-and-more-phone/#respond Tue, 02 Apr 2019 14:07:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3996 मार्केट मध्ये 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत असे हँडसेट वाईट जे खूप शानदार आहेत.

The post या स्वस्त फोन्स मध्ये सुपर फास्ट चालेल PUBG गेम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल मध्ये गेमिंग करणे खूप आधीपासून चालू आहे. तसेच सध्या सर्वात प्रसिद्ध मोबाईल गेम PUBG ची लोकप्रियता कमी होताना दिसत नाही. या गेम बद्दल येणाऱ्या नाकारात्मक बातम्यांनंतर पण याची लोकप्रियता तशीच आहे. हे पाहून स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या पण परफॉर्मेस ओरिएंटेड हँडसेट लॉन्च करत आहेत. याचा अर्थ असा कि तुम्हाला या गेम साठी आता फ्लॅगशिप फोन विकत घेण्याची गरज नाही.

अलीकडेच कमी किंमतीत असे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध झाले आहेत, ज्यात तुम्हाला PUBG खेळण्याचा चांगला अनुभव मिळेल. याचा अर्थ असा कि पबजी खेळण्यासाठी आता तुम्हाला स्मार्टफोन्स वर 30,000 रुपये खर्च करण्याची गरज नाही. मार्केट मध्ये 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत असे हँडसेट वाईट जे खूप शानदार आहेत.

Samsung Galaxy M30

सॅमसंग गॅलेक्सी एम30 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेजची किंमत 14,990 रुपये आहे. या डिवाइस मध्ये आम्ही पबजी खेळून पाहिले आहे. तम्ही लो मीडियम ग्राफिक्स सेट करून सहज पबजी खेळू शकता. डिवाइसचे स्पेसिफिकेशन्स पाहता 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले, 1.8गीगाहर्टज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्स ए73 तसेच 1.6गीगाहर्टज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्ट ए53 सह एक्सनॉस 7904 चिपसेट आहे.

हे देखील वाचा: पबजी खेळण्यासाठी घरच्यांनी फोन घेऊन दिला नाही म्हणून तरुणाने केली आत्महत्या

Redmi Note 7 Pro

शाओमी ने नुकताच रेडमी नोट 7 प्रो लॉन्च केला होता. या फोनच्या 4जीबी रॅम + 64जीबी मेमरीची किंमत 13,999 रुपये आहे. तसेच डिवाइस मध्ये पबजी चा शानदार एक्सपीरियंस घेता येईल. रेडमी नोट 7 प्रो मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच हँडसेट मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. कंपनी ने गेमिंग साठी या फोन मध्ये एक वेगळी कूलिंग सिस्टम दिली आहे.

Realme 3

रियलमी 3 च्या 4जीबी/64जीबी वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. कंपनीने हा फोन अलीकडेच लॉन्च केला आहे. फोन मध्ये पबजी सहज खेळाता येईल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.2-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हँडसेट मध्ये 12एनएम मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Asus Zenfone Max Pro M2

या डिवाइसचा 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरीएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोन पाहता यात 6.3-इंचाची एलसीडी स्क्रीन मिळेल. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन660 चिपसेट आणि 2.2गीगाहट्र्ज ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. तसेच गेमिंग साठी फोन मध्ये कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Huawei P30 Pro लवकरच होईल भारतात लॉन्च, या 5 कारणांसाठी बघा याची वाट

Honor 8X

Honor 8X बद्दल बोलायचे तर याची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. तसेच या हँडसेट मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ (2340 × 1080 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे जो गेमिंग एक्सपीरिंयस चांगला देतो. तसेच फोन मध्ये ऑक्टा-किरिन 710 12एनएम प्रोसेसर आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 1.7गीगाहर्ट्ज आहे. सोबत ग्राफिक्स साठी फोन मध्ये एआरएम माली-जी51 एमपी4 जीपीयू आहे. डिवाइस मध्ये 4जीबी/6जीबी रॅम आणि 64जीबी/128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 400जीबी पर्यंत वाढवता येते. हॉनर ने पण आपल्या फोन मध्ये गेमिंग स्मूद करण्यासाठी कूलिंग सिस्टम दिली आहे.

The post या स्वस्त फोन्स मध्ये सुपर फास्ट चालेल PUBG गेम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-smartphones-for-pubg-mobile-under-15000-rupees-xiaomi-redmi-note-7-pro-realme-3-and-more-phone/feed/ 0
6जीबी रॅम सह आॅनर 8एक्स झाला भारतात लॉन्च, शानदार लुक सह दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत यात https://www.91mobiles.com/marathi/honor-8x-launched-feature-specifications-price-in-india-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-8x-launched-feature-specifications-price-in-india-in-marathi/#respond Tue, 16 Oct 2018 08:54:54 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2506 किंमत पाहता फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post 6जीबी रॅम सह आॅनर 8एक्स झाला भारतात लॉन्च, शानदार लुक सह दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्याच महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून हुआवई च्या सब ब्रांड कंपनी आॅनर ने आपला शानदार डिवाईस आॅनर 8एक्स सादर केला होता. टेक मंचावर आॅनर 8एक्स आल्यांनतर पासूनच इंडियन स्मार्टफोन यूजर या फोनची आतुरतेने वाट बघत आहेत. पण आज हि प्रतीक्षा संपवत आॅनर ने आपला हा शानदार स्मार्टफोन आॅनर 8एक्स इंडियन बाजारात आणला आहे. शानदार लुक आणि दमदार फीचर्स असलेला आॅनर 8एक्स 14,999 रुपयांच्या बेस किंमतीती लॉन्च करण्यात आला आहे जो 4 आक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.

आॅनर 8एक्स ची किंमत जितकी कमी आहे हा फोन लुक आणि डिजाईनच्या बाबतीत तितकाच खास आहे. कमी बजट मध्ये पण हा फोन प्रीमियत लुक देतो. आॅनर 8एक्स चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहता हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या फुल व्यू 2.0 डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन मध्ये 2,340 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.51-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे.

आॅनर 8एक्स एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित इमोशन यूआई वर सादर करण्यात आला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवई च्या किरीन 710 चिपसेट वर चालतो. कंपनी ने आॅनर 8एक्स भारतात 3 रॅम वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एका वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट आहे तर इतर दोन वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तिन्ही वेरिएंट्स मधील स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आॅनर 8एक्स डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर सह 20-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात बोका इफेक्ट आणि ब्यूटी मोड सारखे फीचर्स आहेत.

आॅनर 8एक्स रियल डुअल सिम फोन आहे 4जी वोलएटीई सोबतच यात बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलिजीला पण सपोर्ट करतो. आॅनर 8एक्स मध्ये पावर बॅकअप साठी इंटेलिजेंट पावर सेविंग टेक्नोलॉजी असलेली 3,750 एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत पाहता फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोनचा 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपये तर 6जीबी रॅम/128जीबी स्टोरेज वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये रेड आणि ब्लू कलर मध्ये येत्या 24 आक्टोबर पासुन शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल.

The post 6जीबी रॅम सह आॅनर 8एक्स झाला भारतात लॉन्च, शानदार लुक सह दमदार स्पेसिफिकेशन्स आहेत यात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-8x-launched-feature-specifications-price-in-india-in-marathi/feed/ 0
आॅनर 8एक्स 16 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-8x-launching-in-india-on-16-october-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-8x-launching-in-india-on-16-october-in-marathi/#respond Wed, 03 Oct 2018 07:20:28 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2342 आॅनर ने सांगितले आहे की कंपनी 16 ऑक्टोबरला दिल्ली मध्ये एका लॉन्च ईवेंटचे आयोजन करेल आणि याच ईवेंट मधून आॅनर 8एक्स बाजारात येईल.

The post आॅनर 8एक्स 16 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आॅनर ने गेल्या महिन्यात खुपच शानदार आणि पावरफुल स्मार्टफोन आॅनर 8एक्स ग्लोबल मंचावरून सादर केला होता. नॉच डिस्प्ले सह येणारा हा फोन दमदार स्पेसिफिकेशन्स सह येतो. आॅनर 8एक्स समोर आल्यापासून इंडियन फॅन्स पण या स्मार्टफोन लॉन्च ची वाट बघत आहेत. आता आॅनर ने इंटरनेशनल अनांउसमेंट करत आॅनर 8एक्स च्या इंडिया लॉन्च ची घोषणा केली आहे. आॅनर 8एक्स येत्या 16 ऑक्टोबरला भारतात लॉन्च केला जाईल.

आॅनर ने आपल्या ग्लोबल आॅफिशियल वेबसाइट वर आॅनर 8एक्स च्या इंडिया लॉन्चच्या तारखेचा खुलासा केला आहे. कंपनी या महिन्यात अनेक इंटरनेशनल मार्केट्स मध्ये आॅनर 8एक्स घेऊन येत आहे आणि त्यात भारताचे नाव आहे. आॅनर ने सांगितले आहे की कंपनी 16 ऑक्टोबरला दिल्ली मध्ये एका लॉन्च ईवेंटचे आयोजन करेल आणि याच ईवेंट मधून आॅनर 8एक्स बाजारात येईल.

आॅनर ने आपल्या वेबसाइट वर आॅनर 8एक्स चा उल्लेख केला आहे तसेच अशी आशा व्यक्त केली जात आहे की कंपनी 16 ऑक्टोबरला आॅनर 8एक्स सोबत अजुन याचा अजून एक वेरिएंट आॅनर 8एक्स मॅक्स पण लॉन्च करू शकते. फोनचे स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 6.5-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने हा फुल एचडी प्लस डिस्प्ले सह सादर केला आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2,340 x 1,080 पिक्सल आहे. विशेष म्हणजे यात तुम्हाल 19:9 आसपेक्ट रेशियो वाला नॉच डिस्प्ले मिळेल ज्याला कंपनी ने पर्ल डिस्प्ले नाव दिले आहे. 

आॅनर 8एक्स हुआवई च्या नवीन किरीन 710 ​चिपसेट वर चालतो आणि यात 4जीबी आणि 6जीबी रॅम देण्यात आला आहे या सोबत तीन स्टोरेज वेरियंट आहे. 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आहे तर 6जीबी मध्ये 64जीबी आणि 128जीबी ची स्टोरेज मिळेल. सोबत 400 जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे. 

फोटोग्राफी साठी फोन मध्ये 20-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा एफ/1.8 अपर्चर सह दिला आहे. तसेच फ्रंट मध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेटअप मिळेल. कॅमेरा सह तुम्हाला एआई इंटीग्रेशन मिळेल. हा फोन एंडरॉयड इमोशन यूआई वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 वर आधारित आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

आॅनर 8एक्स मॅक्स मध्ये 7.12-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी 2244×1080 पिक्सल सह उपलब्ध आहे. यात पण छोटी वाटर ड्रॉप नॉच मिळेल. पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चा​र्जला सपोर्ट करते.

हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो आणि यात 4जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. तसेच कंपनी ने माहिती दिली आहे की याचा एक मॉडेल स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह उपलब्ध होईल ज्यात 6जीबी मेमरी असेल. हा फोन ऑक्टोबर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

फोटोग्राफी साठी आॅनर 8एक्स मॅक्स मध्ये 16-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे आणि हा एफ/2.0 अपर्चर सह उपलब्ध आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा एफ/2.0 अपर्चर सह उपलब्ध आहे.

The post आॅनर 8एक्स 16 ऑक्टोबरला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-8x-launching-in-india-on-16-october-in-marathi/feed/ 0
आॅनर 8एक्स आणि 8एक्स मॅक्स लॉन्च, मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि वॉटर ड्रॉप नॉच सह https://www.91mobiles.com/marathi/honor-8x-and-honor-8x-max-launched-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-8x-and-honor-8x-max-launched-price-specification-and-features-in-marathi/#respond Thu, 06 Sep 2018 10:17:03 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1973 कंपनी ने आॅनर 8एक्स सोबत आॅनर 8 मॅक्स पण लॉन्च केला आहे.

The post आॅनर 8एक्स आणि 8एक्स मॅक्स लॉन्च, मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि वॉटर ड्रॉप नॉच सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी चर्चा चालू होती की हुआवई ब्रँड आॅनर लवकरच 8एक्स मॉडेल सादर करणार आहे आणि काल कंपनी ने हा फोन जगासमोर ठेवला आहे. सर्वात खास बाब म्हणजे कंपनी ने आॅनर 8एक्स सोबत आॅनर 8 मॅक्स पण लॉन्च केला आहे. नावावरुन स्पष्ट होते की मॅक्स ला कंपनी ने मोठ्या स्क्रीन सह सादर केले आहे आणि इतर स्पेसिफिकेशन मध्ये पण थोडा फरक असेल. या फोन्सच्या भारत लॉन्च बद्दल कंपनी ने अजूनतरी कोणतीही माहिती दिली नाही पण आशा आहे की काही दिवसांत हे फोन्स उपलब्ध होतील.

आॅनर 8एक्स चे स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 6.5-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने हा फुल एचडी प्लस डिस्प्ले सह सादर केला आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2,340 x 1,080 पिक्सल आहे. विशेष म्हणजे यात तुम्हाल 19:9 आसपेक्ट रेशियो वाला नॉच डिस्प्ले मिळेल ज्याला कंपनी ने पर्ल डिस्प्ले नाव दिले आहे.

आॅनर 8एक्स हुआवई च्या नवीन किरीन 710 ​चिपसेट वर चालतो आणि यात 4जीबी आणि 6जीबी रॅम देण्यात आला आहे या सोबत तीन स्टोरेज वेरियंट आहे. 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आहे तर 6जीबी मध्ये 64जीबी आणि 128जीबी ची स्टोरेज मिळेल. सोबत 400 जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये 20-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा एफ/1.8 अपर्चर सह दिला आहे. तसेच फ्रंट मध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेटअप मिळेल. कॅमेरा सह तुम्हाला एआई इंटीग्रेशन मिळेल. हा फोन एंडरॉयड इमोशन यूआई वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 वर आधारित आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

आॅनर 8एक्स मॅक्स मध्ये 7.12-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी 2244×1080 पिक्सल सह उपलब्ध आहे. यात पण छोटी वाटर ड्रॉप नॉच मिळेल. पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चा​र्जला सपोर्ट करते.

हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो आणि यात 4जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. तसेच कंपनी ने माहिती दिली आहे की याचा एक मॉडेल स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह उपलब्ध होईल ज्यात 6जीबी मेमरी असेल. हा फोन ऑक्टोबर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

फोटोग्राफी साठी आॅनर 8एक्स मॅक्स मध्ये 16-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे आणि हा एफ/2.0 अपर्चर सह उपलब्ध आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा एफ/2.0 अपर्चर सह उपलब्ध आहे.

The post आॅनर 8एक्स आणि 8एक्स मॅक्स लॉन्च, मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि वॉटर ड्रॉप नॉच सह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-8x-and-honor-8x-max-launched-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0