गेल्याच महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून हुआवई च्या सब ब्रांड कंपनी आॅनर ने आपला शानदार डिवाईस आॅनर 8एक्स सादर केला होता. टेक मंचावर आॅनर 8एक्स आल्यांनतर पासूनच इंडियन स्मार्टफोन यूजर या फोनची आतुरतेने वाट बघत आहेत. पण आज हि प्रतीक्षा संपवत आॅनर ने आपला हा शानदार स्मार्टफोन आॅनर 8एक्स इंडियन बाजारात आणला आहे. शानदार लुक आणि दमदार फीचर्स असलेला आॅनर 8एक्स 14,999 रुपयांच्या बेस किंमतीती लॉन्च करण्यात आला आहे जो 4 आक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.
आॅनर 8एक्स ची किंमत जितकी कमी आहे हा फोन लुक आणि डिजाईनच्या बाबतीत तितकाच खास आहे. कमी बजट मध्ये पण हा फोन प्रीमियत लुक देतो. आॅनर 8एक्स चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन पाहता हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो वाल्या फुल व्यू 2.0 डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन मध्ये 2,340 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.51-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे.
आॅनर 8एक्स एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित इमोशन यूआई वर सादर करण्यात आला आहे जो 2.2गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह हुआवई च्या किरीन 710 चिपसेट वर चालतो. कंपनी ने आॅनर 8एक्स भारतात 3 रॅम वेरिएंट मध्ये सादर केला आहे. एका वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट आहे तर इतर दोन वेरिएंट 6जीबी रॅम सह 64जीबी तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तिन्ही वेरिएंट्स मधील स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 400जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आॅनर 8एक्स डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर सह 20-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅशला सपोर्ट करतो. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे ज्यात बोका इफेक्ट आणि ब्यूटी मोड सारखे फीचर्स आहेत.
आॅनर 8एक्स रियल डुअल सिम फोन आहे 4जी वोलएटीई सोबतच यात बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक टेक्नॉलिजीला पण सपोर्ट करतो. आॅनर 8एक्स मध्ये पावर बॅकअप साठी इंटेलिजेंट पावर सेविंग टेक्नोलॉजी असलेली 3,750 एमएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत पाहता फोनचा 4जीबी रॅम वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच फोनचा 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 16,999 रुपये तर 6जीबी रॅम/128जीबी स्टोरेज वेरिएंट 18,999 रुपयांमध्ये रेड आणि ब्लू कलर मध्ये येत्या 24 आक्टोबर पासुन शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वरून विकत घेता येईल.
















