या स्वस्त फोन्स मध्ये सुपर फास्ट चालेल PUBG गेम

मोबाईल मध्ये गेमिंग करणे खूप आधीपासून चालू आहे. तसेच सध्या सर्वात प्रसिद्ध मोबाईल गेम PUBG ची लोकप्रियता कमी होताना दिसत नाही. या गेम बद्दल येणाऱ्या नाकारात्मक बातम्यांनंतर पण याची लोकप्रियता तशीच आहे. हे पाहून स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या पण परफॉर्मेस ओरिएंटेड हँडसेट लॉन्च करत आहेत. याचा अर्थ असा कि तुम्हाला या गेम साठी आता फ्लॅगशिप फोन विकत घेण्याची गरज नाही.

अलीकडेच कमी किंमतीत असे स्मार्टफोन्स बाजारात उपलब्ध झाले आहेत, ज्यात तुम्हाला PUBG खेळण्याचा चांगला अनुभव मिळेल. याचा अर्थ असा कि पबजी खेळण्यासाठी आता तुम्हाला स्मार्टफोन्स वर 30,000 रुपये खर्च करण्याची गरज नाही. मार्केट मध्ये 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत असे हँडसेट वाईट जे खूप शानदार आहेत.

Samsung Galaxy M30

सॅमसंग गॅलेक्सी एम30 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेजची किंमत 14,990 रुपये आहे. या डिवाइस मध्ये आम्ही पबजी खेळून पाहिले आहे. तम्ही लो मीडियम ग्राफिक्स सेट करून सहज पबजी खेळू शकता. डिवाइसचे स्पेसिफिकेशन्स पाहता 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले, 1.8गीगाहर्टज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्स ए73 तसेच 1.6गीगाहर्टज क्लॉक स्पीड वाल्या कोर्टेक्ट ए53 सह एक्सनॉस 7904 चिपसेट आहे.

हे देखील वाचा: पबजी खेळण्यासाठी घरच्यांनी फोन घेऊन दिला नाही म्हणून तरुणाने केली आत्महत्या

Redmi Note 7 Pro

शाओमी ने नुकताच रेडमी नोट 7 प्रो लॉन्च केला होता. या फोनच्या 4जीबी रॅम + 64जीबी मेमरीची किंमत 13,999 रुपये आहे. तसेच डिवाइस मध्ये पबजी चा शानदार एक्सपीरियंस घेता येईल. रेडमी नोट 7 प्रो मध्ये 2340 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.3-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे. तसेच हँडसेट मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. कंपनी ने गेमिंग साठी या फोन मध्ये एक वेगळी कूलिंग सिस्टम दिली आहे.

Realme 3

रियलमी 3 च्या 4जीबी/64जीबी वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. कंपनीने हा फोन अलीकडेच लॉन्च केला आहे. फोन मध्ये पबजी सहज खेळाता येईल. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.2-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच हँडसेट मध्ये 12एनएम मीडियाटेक हीलियो पी70 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Asus Zenfone Max Pro M2

या डिवाइसचा 6जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज वेरीएंट 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फोन पाहता यात 6.3-इंचाची एलसीडी स्क्रीन मिळेल. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन660 चिपसेट आणि 2.2गीगाहट्र्ज ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. तसेच गेमिंग साठी फोन मध्ये कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Huawei P30 Pro लवकरच होईल भारतात लॉन्च, या 5 कारणांसाठी बघा याची वाट

Honor 8X

Honor 8X बद्दल बोलायचे तर याची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होते. तसेच या हँडसेट मध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी+ (2340 × 1080 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे जो गेमिंग एक्सपीरिंयस चांगला देतो. तसेच फोन मध्ये ऑक्टा-किरिन 710 12एनएम प्रोसेसर आहे, ज्याचा क्लॉक स्पीड 1.7गीगाहर्ट्ज आहे. सोबत ग्राफिक्स साठी फोन मध्ये एआरएम माली-जी51 एमपी4 जीपीयू आहे. डिवाइस मध्ये 4जीबी/6जीबी रॅम आणि 64जीबी/128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 400जीबी पर्यंत वाढवता येते. हॉनर ने पण आपल्या फोन मध्ये गेमिंग स्मूद करण्यासाठी कूलिंग सिस्टम दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here