Honor Play - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 21 Dec 2018 13:25:04 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 5 सर्वात दमदार स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-under-rs-20000-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-under-rs-20000-in-marathi/#respond Fri, 21 Dec 2018 13:22:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3194 आम्ही 5 शानदार फोन्सचा उल्लेख या लेखात केला आहे जे या बजेट मध्ये येतात.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 5 सर्वात दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुमचे बजेट 20,000 रुपये असेल तर तुम्ही या बजेट मध्ये सर्वकाही शोधात. तुम्हाला फोनचा लुक प्रीमियम हवा असतो, तुम्हाला याचा कॅमेरा दमदार, बॅटरी बॅकअप शानदार पाहिजे असतो आणि जास्त मेमरी सोबत प्रोसेसिंग पण पावरफुल हवी असते. एकंदरीत तुम्ही फ्लॅगशिप फीचर कमी बजेट मध्ये शोधता. भारतीय बाजारात असे फोन आहेत जे तुमच्या प्रत्येक गरज पूर्ण करतात. खाली आम्ही अशाच 5 शानदार फोन्सचा उल्लेख केला आहे.

पोको एफ1

परफॉर्मेंस आणि फीचर्सच्या बाबतीती 20,000 रुपयांच्या बजेट मध्ये येणाऱ्या सर्वात बेस्ट फोन्स पैकी एक आहे. पोको फोन पण कमी किंमतीत चांगले स्पेसिफिकेशन देतो. कंपनी ने पोको एफ1 चे तीन वेरियंट सादर केले आहेत जे 4जीबी, 6जीबी आणि 8जीबी रॅम वेरियंट सह येतात. फोन मध्ये 6.18-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित मीयूआई 9.6 वर चालतो. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये 12एमपी+5एमपी चा रियर कॅमेरा आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 20एमपी चा देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च होणारा हा सर्वात स्वस्त फोन आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट सह क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी असलेली 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

ऑनर प्ले

ऑनर चा हा फोन पोको एफ1 पेक्षा कमी नाही. गेमिंग असो किंवा अजूनही काही सर्व बाबतीती हा टक्कर देतो.मेटल डिजाइन वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. इमोशन यूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह हा फोन 2.4गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी सोबत जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी आहे. ऑनर प्ले च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4जी वोएलटीई, डुअल सिम व यूएसबी टाइप-सी सोबत हा फोन 3,750 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो.

असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2

असूस ने नुकताच झेनफोन मॅक्स प्रो एम1चा अपग्रेड आणला आहे. हा फोन पण कमाल आहे. डिजाइन डिस्प्ले किंवा मग स्पेसिफिकेशन प्रत्येक बाबतीती हा चांगलाच आहे. असूस झेनफोन मॅक्स प्रो एम2 मध्ये 19:9 आसपेक्ट रेशियो असलेली 6.3-इंचाची फुलएचडी+ आईपीएस एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित हा फोन 3जीबी, 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम सह येतो. तसेच इंटरनल मेमरी 32जीबी, 64जीबी आणि 128जीबी आहे. फोटोग्राफी साठी 12-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर आहे जो वाइड एंगल ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी 13—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम आधारित या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

रियलमी 2 प्रो

रियलमी 2 प्रो का जिक्र आज हर जगह पर हो रहा आहे. उसका सर्वात बड़ा कारण आहे कमी प्राइस मध्ये बेस्ट स्पेसिफिकेशन. यात 6.3 इंचाची फुल एचडी+ स्क्रीन वॉटर ड्रॉप नॉच सह आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो जो या बजेट मध्ये खुप चांगला आहे. फोन मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 8जीबी रॅम आहे. त्याचबरोबर 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. याचा 4जीबी आणि 6जीबी रॅम वाला मॉडेल पण आहे. फोटोग्राफी साठी रियलमी 2 प्रो मध्ये 16—मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 16—मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी 3,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

शाओमी मी ए2

परफॉर्मेंस च्या बाबतीती हा फोन पण इतरांपेक्षा कमी नाही. शानदार प्रोसेसर सह कंपनी ने हा एंडरॉयड वन इंटीग्रेशन सह सादर केला आहे जो दोन वर्षांपर्यंत ओएस अपडेट देतो. अन्य स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 18:9 आस्पेक्ट रेशियो असलेली 5.99-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टड आहे. क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट आधारित या डिवाइस मध्ये 2.2गीगाहट्र्ज चा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. त्याचबरोबर 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मी ए2 मध्ये 20-मेगा​पिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट सोबत 3,010एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 5 सर्वात दमदार स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/top-5-smartphone-under-rs-20000-in-marathi/feed/ 0
नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/#respond Fri, 17 Aug 2018 13:58:08 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1738 आम्ही 5 अशा स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे देशात कमी किंमतीत तुम्हाला आयफोन 10 वाला फील आणि नॉच डिस्प्लेची स्टाईल मारण्याची संधी देतील.

The post नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक दिग्गज कंपनी अॅप्पल ने गेल्या वर्षी आपला 10वा वर्धापनदिन साजरा करताना आयफोन 10 सादर केला होता. हा फोन जगासमोर येताच चर्चेत आला. आयफोन 10 ने स्मार्टफोन जगात नवीन ट्रेंड सुरू केला होता आणि हा ट्रेंड होता ‘नॉच डिस्प्ले’ चा. आयफोन 10 चा नॉच डिस्प्ले टेक विश्वा सोबतच स्मार्टफोन यूजर्स साठी पण अगदीच नवीन होता. अॅप्पल आयफोन 10 तर कंपनी ने हाईरेंज मध्ये आणला होता, पण नॉच डिस्प्ले कॉपी करून आजकाल सर्वच ब्रँड आपले फोन लॉन्च करत आहेत. भारतात पण असे अनेक स्मार्टफोन आहे जे आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतात. देशात हे नॉच डिस्प्ले वाले स्मार्टफोन वेगवेगळ्या बजेट मध्ये लॉन्च झाले आहेत. खाली आम्ही 5 अशा स्वस्त नॉच डिस्प्ले वाल्या स्मार्टफोनची माहिती दिली आहे जे देशात कमी किंमतीत तुम्हाला आयफोन 10 वाला फील आणि नॉच डिस्प्लेची स्टाईल मारण्याची संधी देतील.

1. वीवो वाय81
नॉच डिस्प्ले सह भारतात लॉन्च झालेला हा लेटेस्ट स्मार्टफोन आहे. या फोन मध्ये 19:9 आस्पेक्ट रेशियो वाला बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यात 1440 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. वीवो वाय81 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.0 वर सादर झाला आहे सोबतच हा 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6762 चिपसेट वर चालतो.

वाय81 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे जी 256जीबी पर्यंत वाढवता येते. वीवो वाय81 च्या बॅक पॅनल वर एलईड फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला तर सेल्फी साठी या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर वाला5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा एक 4जी स्मार्टफोन आहे जो डुअल सिम ला सपोर्ट करतो. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 12,999 रुपयांमध्ये आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही प्लॅटफार्म वर सेल साठी उपलब्ध होईल.

2. ओपो ए3एस
ओपो चा हा फोन 6.2-इंचाच्या एचडी+ सुपर फुल स्क्रीन बेजल लेस नॉच डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित कलरओएस 5.1 सह सादर करण्यात आला आहे. सोबतच हा 1.8गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. भारतात हा फोन 2जीबी रॅम/16जीबी मेमरी आणि 3जीबी रॅम/32जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे.

ओपो ए3एस च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला जो 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एआई ब्यूटीफाई फीचर असलेला 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबत अन्य बेसिक फीचर्स ला सपोर्ट करतो. कंपनी ने फोन मध्ये फेस अनलॉक फीचर दिला आहे तसेच पावर बॅकअप साठी यात 4,230एमएएच ची पावरफुल बॅटरी आहे. ओपो ए3एस चा 2जीबी/16जीबी वेरिएंट 10,990 रुपयांमध्ये तसेच 3जीबी/32जीबी वेरिएंट 13,990 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट सह आॅफलाईन स्टोर मधून पण विकत घेता येईल.

3. आॅनर 9एन
हुआवई च्या सब-ब्रांड आॅनर ने लॉन्च केलेला हा स्टाईलिश आणि आर्कषक स्मार्टफोन आहे. हा फोन मेटल फ्रेम वर बनलेला आहे ज्याच्या बॅक पॅनल मिरर फिनिशिंग वाली आहे. हा फोन 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5.84-इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. एंडरॉयड 8.0 ओरियो आधारित ईएमयूआई 8.0 सोबत आॅनर 9एन हाईसिलिकॉन किरीन 659 चिपसेट वर चालतो.

आॅनर 9एन डुअल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सह फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलॉक फीचर ला पण सपोर्ट करतो आणि पावर बॅकअप साठी यात 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. भारतीय बाजारात आॅनर 9एन चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,999 रुपये, 4जीबी/64जीबी वेरिएंट 13,999 रुपये तसेच 4जीबी/128जीबी मेमरी वेरिएंट 17,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

4. वीवो वी9 यूथ
वीवो वी9 यूथ कपंनी च्या वीवो वी9 स्मार्टफोन चा स्वस्त मॉडेल आहे जो नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास कोटेड आहे. एंडरॉयड 8.1 ओरियो सोबतच हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो. वीवो ने या फोन मध्ये 4जीबी रॅम दिला आहे तसेच यात 32जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

वी9 यूथ च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. तसेच फोन च्या फ्रंट पॅनल वर एआई ब्यूटी फीचर वाला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 4जी वोएलटीई आणि डुअल सिम सोबत वी9 यूथ मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे आणि पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,260 एमएएच ची बॅटरी आहे. भारतीय बाजारात वीवो वी9 यूथ 18,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

5. आॅनर प्ले
आॅनर प्ले ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतात लॉन्च झाला आहे. दमदार स्पेसिफिकेशन्स सोबत हा फोन नॉच डिस्प्ले ला सपोर्ट करतो. मेटल डिजाइन वाल्या या फोन मध्ये 6.3-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. इमोशन यूआई 8.2 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह हा फोन 2.4गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो. या फोन मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नोलॉजी सोबत जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी आहे.

आॅनर प्ले च्या बॅक पॅनल वर 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 4जी वोएलटीई, डुअल सिम व यूएसबी टाइप-सी सोबत हा फोन 3,750 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. रियर फिंगरप्रिंट सेंसर सोबत फोन मध्ये फेस अनलॉक फीचर पण देण्यात आला आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन अमेजॉन इंडिया वरून 4जीबी/64जीबी मेमरी वेरिएंट 19,999 रुपये तसेच 6जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

बोनस
विशेष म्हणजे काही दिवसांत ओपो कंपनी आपला अजून एक नॉच डिस्प्ले वाला स्मार्टफोन ओपो ए5 भारतात लॉन्च करणार आहे ज्यात 6.2-इंचाचा मोठा डिस्प्ले आणि 4,230एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात येईल. तसेच आजच रियलमी च्या सेकेंड जेनेरेशन फोन रियलमी 2 ची माहिती समोर आली आहे आणि कंपनी हा स्मार्टफोन पण नॉच डिस्प्ले सह सादर करेल ज्यात डुअल रियर कॅमेरा असेल. हे दोन्ही स्मार्टफोन मीड रेंज व कमी किंमतीत लॉन्च केले जातील.

The post नॉच डिस्प्ले असलेले 5 सर्वात स्वस्त एंडरॉयड स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/notch-display-smartphone-in-india-under-budget-vivo-y81-oppo-a3s-vivo-v9-honor-9n-honor-play-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम आणि एआई फीचर्स सह लॉन्च झाला आॅनर प्ले, जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/honor-play-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-play-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/#respond Mon, 06 Aug 2018 08:54:17 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1569 भारतात आॅनर प्ले ची किंमत 19,999 रुपये आहे आणि हा फोन आज 4 वाजल्यापासून आॅनलाइन स्टोर अमेजॉन इंडिया स्टोर वर सेल साठी उपलब्ध होईल.

The post 6जीबी रॅम आणि एआई फीचर्स सह लॉन्च झाला आॅनर प्ले, जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी आॅनर ने भारतीय बाजारात 9एन मॉडल सादर केला होता. मिड रेंज मधील हा फोन आपल्या चांगल्या स्पेसिफिकेशन साठी ओळखला जातो. तर आता कंपनी आॅनर प्ले घेऊन आली आहे. खासकरून हा फोन त्यांच्यासाठी आहे ज्यांना मोबाईल वर गेम खेळायला आवडतात. विशेष म्हणजे कंपनीने यात हुआवई चा सर्वात ताकदवान चिपसेट दिला आहे आणि याची किंमत पण त्यामानाने कमी ठेवली आहे. भारतात आॅनर प्ले ची किंमत 19,999 रुपये आहे आणि हा फोन आज 4 वाजल्यापासून आॅनलाइन स्टोर अमेजॉन इंडिया स्टोर वर सेल साठी उपलब्ध होईल.

डिजाइन
आॅनर प्ले च्या निमित्ताने जवळपास एक वर्षानंतर आॅनर ने पुन्हा एकदा मेटल ​डिजाइन वाला फोन सादर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनी ग्लास बॉडी वाले फोन लॉन्च करत होती पण आॅनर प्ले मुळे तुम्हाला स्लिक डिजाइन वाला ऑनरचा मेटल फोन पुन्हा बाघयला मिळेल ज्यात नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे.

डिस्प्ले
कंपनी ने हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली बेजल लेस ​डिस्प्ले सह सादर केला आहे. फोन मध्ये 6.3-इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पण कोटिंग बद्दल अजूनतरी माहिती देण्यात आली नाही.

प्रोसेसर
आॅनर प्ल हुआवई च्या हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 2.4गीगाहजट्र्ज चा आॅक्टा कोर प्रोसेसर ​देण्यात आला आहे. यासोबत तुम्हाला माली—जीएमपी12 जीपीयू मिळेल. विशेष म्हणजे कंपनी ने यात जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी दिले आहे ज्यामुळे ग्राफिक्स चांगले होतील. कंपनी ने माहिती दिली आहे की या चिपसेट मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस दिले आहे. जीपीयू सोबत एनपीयू इंटीग्रेटेड आहे.

कॅमेरा
फोटोग्राफी साठी या फोन मध्ये एआई टेक्नोलॉजी आहे. यात 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरा मध्ये तुम्हाला बोके इफेक्ट फीचर मिळेल. तसेच एआई कॅमेरा आणि ब्यूटि मोड सारखे काही फीचर्स पण आहेत.

आॅपरेटिंग सिस्टम
हा फोन इमोशन यूआई 8.2 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे. फोन मध्ये तुम्हाला जेस्चर आधारित काही चांगले फीचर्स तुम्हाला मिळतील.

मेमरी
भारतात आॅनर प्ले 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. पण दोन्ही सोबत इंटरनल मेमरी 64जीबी असेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता. परंतु लक्षात असू दे की दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही पैकी एकच सिम वापरू शकला.

ड्यूअल सिम आधारित आॅनर प्ले मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे आणि तुम्ही कोणत्याही सिम वर 4जी वापरू शकता. तसेच डाटा साठी वाईफाई सोबत ब्लूटूथ देण्यात आली आहे. फोन मध्ये यूएसबी टाइप सी कनेक्टिविटी देण्यात आली आहे.

बॅटरी
पावर बॅकअप साठी आॅनर प्ले मध्ये 3,750 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. खास बाब म्हणजे यात फास्ट चर्जिंग सपोर्ट आहे.

किंमत
भारतात आॅनर प्ले च्या 4जीबी + 64जीबी मेमरी वेरियंट ची किंमत 19,999 रुपये आहे. तर 6जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वाला वेरियंट 23,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

The post 6जीबी रॅम आणि एआई फीचर्स सह लॉन्च झाला आॅनर प्ले, जाणून घ्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-play-launched-in-india-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम, 6.3-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा वाला आॅनर प्ले, 6 ऑगस्टला होत आहे भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/honor-play-to-launch-in-india-on-6th-august-amazon-exclusive-feature-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-play-to-launch-in-india-on-6th-august-amazon-exclusive-feature-specifications-in-marathi/#respond Wed, 25 Jul 2018 12:25:19 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1408 आॅनर प्ले शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर लिस्ट करण्यात आला आहे.

The post 6जीबी रॅम, 6.3-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा वाला आॅनर प्ले, 6 ऑगस्टला होत आहे भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आॅनर इंडिया ने कालच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 9एन लॉन्च केला आहे. भारतात हा स्मार्टफोन तिन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे जो येत्या 31 जुलै पासून सेल साठी उपलब्ध होईल. आॅनर 9एन च्या इंडिया लॉन्च नंतर काही तासांनी कंपनी ने भारतात आपल्या अजून एका स्मार्टफोन ची घोषणा केली आहे. आॅनर ने सांगितले आहे की कंपनी लवकरच आपला अजून एक स्मार्टफोन आॅनर प्ले भारतात लॉन्च करणार आहे. आॅनर प्ले 6 ऑगस्ट ला भारतात लॉन्च केला जाईल.

आॅनर प्ले शॉपिंग साइट अमेजॉन इंडिया वर लिस्ट करण्यात आला आहे. अमेजॉन ने आॅनर प्ले बद्दल एक वेबपेज बनविले आहे ज्यावरून फोन च्या लॉन्च डेट ची माहिती मिळाली आहे. या लिस्टिंग वरून एक बाब स्पष्ट झाली आहे की हा फोन भारतात अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेल साठी उपलब्ध होईल. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात आॅनर प्ले चीनी बाजारात लॉन्च झाला आहे. चीन मध्ये हा फोन दोन रॅम वेरिएंट सोबत एका स्पेशल एडिशन मध्ये सादर करण्यात आला आहे. पण भारतात कंपनी आॅनर प्ले चे किती वेरिएंट घेऊन येईल यासाठी 6 ऑगस्ट ची वाट बघावी लागेल.

आॅनर प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:8 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. या फोन मध्ये मेटल यूनिबॉडी डिजाईन सह 6.3-इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 सह सादर करण्यात आला आहे. तसेच हा आॅक्टाकोर प्रोसेसर व किरीन 970 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता यात डुअल रियर कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एआई टेक्नीक असलेला 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

आॅनर प्ले मधील जीपीयू टर्बो गेमिंग एक्सपीरियंस ला खूपच खास बनवतो. फोन ची ग्राफिक्स पावर गेम ला एचडीआर चा अनुभव देते तसेच यातील 7.1 चॅनल हाईस्टन साउंड 3डी गेम साउंड इफेक्ट देण्यास सक्षम आहे. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन ब्लॅक, ब्लू आणि वॉयलेट कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

किंमत पाहता आॅनर प्ले चा 4जीबी रॅम वेरिएंट 1,999 युआन (जवळपास 21,000 रुपये) तसेच 6जीबी रॅम वेरिएंट 2,399 युआन (जवळपास 25,000 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. तर आॅनर प्ले चा एक स्पेशल वेरिएंट पण कंपनी ने सादर केला आहे जो 2,499 युआन म्हणजे जवळपास 26,200 रुपयांमध्ये चीन मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

चीन मध्ये हा फोन ब्लॅक, ब्लू आणि वॉयलेट कलर वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. आॅनर प्ले ची भारतातील किंमत काय असेल तसेच 6 ऑगस्टला लॉन्च झाल्यानंतर हा स्मार्टफोन कधी सेल साठी उपलब्ध होईल यासाठी फोन लॉन्च ची वाट बघितली जात आहे.

आॅनर 9एन चे फुल स्पेसिफिकेशन्स व किंमत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

The post 6जीबी रॅम, 6.3-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि डुअल कॅमेरा वाला आॅनर प्ले, 6 ऑगस्टला होत आहे भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-play-to-launch-in-india-on-6th-august-amazon-exclusive-feature-specifications-in-marathi/feed/ 0
6जीबी रॅम, 6.3-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 16-एमपी डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला आॅनर चा दमदार स्मार्टफोन ‘आॅनर प्ले’ https://www.91mobiles.com/marathi/honor-play-with-gpu-turbo-technology-launched-full-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/honor-play-with-gpu-turbo-technology-launched-full-specifications-in-marathi/#respond Wed, 06 Jun 2018 12:22:37 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=797 यातील 7.1 चॅनल हाईस्टन साउंड 3डी गेम साउंड इफेक्ट देण्यास सक्षम आहे.

The post 6जीबी रॅम, 6.3-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 16-एमपी डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला आॅनर चा दमदार स्मार्टफोन ‘आॅनर प्ले’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी आॅनर ने आज अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आपली नवीन टेक्नीक सादर करत नवीन स्मार्टफोन ‘आॅनर प्ले’ लॉन्च केला आहे. आॅनर ने आपल्या या नवीन स्मार्टफोन ची सुरवात चीनी बाजारातून केली आहे. आॅनर प्ले ची सर्वात मोठी खासियत या फोन मधील ‘जीपीयू टर्बो’ आहे, जो ग्राफिक्स प्रोसेसिंग ला खुप शार्प करत फोन मधील पावर वापर कमी करतो. आॅनर चा दावा आहे की जीपीयू टर्बो टेक्नीक मुळे आॅनर प्ले फोन ग्राफिक्स ची क्षमता 60 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि बॅटरी चा वापर 30 टक्क्यांपर्यंत कमी असेल.

आॅनर प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:8 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. या फोन मध्ये मेटल यूनिबॉडी डिजाईन सह 6.3-इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 सह सादर करण्यात आला आहे. तसेच हा आॅक्टाकोर प्रोसेसर व किरीन 970 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता यात डुअल रियर कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एआई टेक्नीक असलेला 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

आॅनर प्ले मधील जीपीयू टर्बो गेमिंग एक्सपीरियंस ला खूपच खास बनवतो. फोन ची ग्राफिक्स पावर गेम ला एचडीआर चा अनुभव देते तसेच यातील 7.1 चॅनल हाईस्टन साउंड 3डी गेम साउंड इफेक्ट देण्यास सक्षम आहे. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन ब्लॅक, ब्लू आणि वॉयलेट कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

किंमत पाहता आॅनर प्ले चा 4जीबी रॅम वेरिएंट 1,999 युआन (जवळपास 21,000 रुपये) तसेच 6जीबी रॅम वेरिएंट 2,399 युआन (जवळपास 25,000 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. तर आॅनर प्ले चा एक स्पेशल वेरिएंट पण कंपनी ने सादर केला आहे जो 2,499 युआन म्हणजे जवळपास 26,200 रुपयांमध्ये चीन मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आॅनर आपल्या या दमदार स्मार्टफोनला भारतात केव्हा घेऊन येईल याविषीयी काही माहिती मिळाली नाही.

The post 6जीबी रॅम, 6.3-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 16-एमपी डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला आॅनर चा दमदार स्मार्टफोन ‘आॅनर प्ले’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/honor-play-with-gpu-turbo-technology-launched-full-specifications-in-marathi/feed/ 0