काही दिवसांपूर्वी आॅनर ने भारतीय बाजारात 9एन मॉडल सादर केला होता. मिड रेंज मधील हा फोन आपल्या चांगल्या स्पेसिफिकेशन साठी ओळखला जातो. तर आता कंपनी आॅनर प्ले घेऊन आली आहे. खासकरून हा फोन त्यांच्यासाठी आहे ज्यांना मोबाईल वर गेम खेळायला आवडतात. विशेष म्हणजे कंपनीने यात हुआवई चा सर्वात ताकदवान चिपसेट दिला आहे आणि याची किंमत पण त्यामानाने कमी ठेवली आहे. भारतात आॅनर प्ले ची किंमत 19,999 रुपये आहे आणि हा फोन आज 4 वाजल्यापासून आॅनलाइन स्टोर अमेजॉन इंडिया स्टोर वर सेल साठी उपलब्ध होईल.
डिजाइन
आॅनर प्ले च्या निमित्ताने जवळपास एक वर्षानंतर आॅनर ने पुन्हा एकदा मेटल डिजाइन वाला फोन सादर केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनी ग्लास बॉडी वाले फोन लॉन्च करत होती पण आॅनर प्ले मुळे तुम्हाला स्लिक डिजाइन वाला ऑनरचा मेटल फोन पुन्हा बाघयला मिळेल ज्यात नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे.
डिस्प्ले
कंपनी ने हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वाली बेजल लेस डिस्प्ले सह सादर केला आहे. फोन मध्ये 6.3-इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. पण कोटिंग बद्दल अजूनतरी माहिती देण्यात आली नाही.
प्रोसेसर
आॅनर प्ल हुआवई च्या हाईसिलिकॉन किरीन 970 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये 2.4गीगाहजट्र्ज चा आॅक्टा कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत तुम्हाला माली—जीएमपी12 जीपीयू मिळेल. विशेष म्हणजे कंपनी ने यात जीपीयू टर्बो टेक्नोलॉजी दिले आहे ज्यामुळे ग्राफिक्स चांगले होतील. कंपनी ने माहिती दिली आहे की या चिपसेट मध्ये एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस दिले आहे. जीपीयू सोबत एनपीयू इंटीग्रेटेड आहे.
कॅमेरा
फोटोग्राफी साठी या फोन मध्ये एआई टेक्नोलॉजी आहे. यात 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरा मध्ये तुम्हाला बोके इफेक्ट फीचर मिळेल. तसेच एआई कॅमेरा आणि ब्यूटि मोड सारखे काही फीचर्स पण आहेत.
आॅपरेटिंग सिस्टम
हा फोन इमोशन यूआई 8.2 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो आधारित आहे. फोन मध्ये तुम्हाला जेस्चर आधारित काही चांगले फीचर्स तुम्हाला मिळतील.
मेमरी
भारतात आॅनर प्ले 4जीबी रॅम आणि 6जीबी रॅम वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. पण दोन्ही सोबत इंटरनल मेमरी 64जीबी असेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही माइक्रोएसडी कार्ड वापरू शकता. परंतु लक्षात असू दे की दुसरा स्लॉट हाईब्रीड आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही पैकी एकच सिम वापरू शकला.
ड्यूअल सिम आधारित आॅनर प्ले मध्ये 4जी वोएलटीई सपोर्ट आहे आणि तुम्ही कोणत्याही सिम वर 4जी वापरू शकता. तसेच डाटा साठी वाईफाई सोबत ब्लूटूथ देण्यात आली आहे. फोन मध्ये यूएसबी टाइप सी कनेक्टिविटी देण्यात आली आहे.
बॅटरी
पावर बॅकअप साठी आॅनर प्ले मध्ये 3,750 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. खास बाब म्हणजे यात फास्ट चर्जिंग सपोर्ट आहे.
किंमत
भारतात आॅनर प्ले च्या 4जीबी + 64जीबी मेमरी वेरियंट ची किंमत 19,999 रुपये आहे. तर 6जीबी रॅम आणि 64जीबी मेमरी वाला वेरियंट 23,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

















