6जीबी रॅम, 6.3-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 16-एमपी डुअल कॅमेरा सह लॉन्च झाला आॅनर चा दमदार स्मार्टफोन ‘आॅनर प्ले’

टेक कंपनी आॅनर ने आज अंर्तराष्ट्रीय टेक मंचावर आपली नवीन टेक्नीक सादर करत नवीन स्मार्टफोन ‘आॅनर प्ले’ लॉन्च केला आहे. आॅनर ने आपल्या या नवीन स्मार्टफोन ची सुरवात चीनी बाजारातून केली आहे. आॅनर प्ले ची सर्वात मोठी खासियत या फोन मधील ‘जीपीयू टर्बो’ आहे, जो ग्राफिक्स प्रोसेसिंग ला खुप शार्प करत फोन मधील पावर वापर कमी करतो. आॅनर चा दावा आहे की जीपीयू टर्बो टेक्नीक मुळे आॅनर प्ले फोन ग्राफिक्स ची क्षमता 60 टक्क्यांपर्यंत वाढेल आणि बॅटरी चा वापर 30 टक्क्यांपर्यंत कमी असेल.

आॅनर प्ले चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:8 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस ​डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. या फोन मध्ये मेटल यूनिबॉडी डिजाईन सह 6.3-इंचाचा मोठा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित ईएमयूआई 8.2 सह सादर करण्यात आला आहे. तसेच हा आॅक्टाकोर प्रोसेसर व किरीन 970 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम तसेच 6जीबी रॅम च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च केला आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता यात डुअल रियर कॅमेरा आहे. फोन च्या बॅक पॅनल वर एआई टेक्नीक असलेला 16-मेगापिक्सल आणि 2-मेगापिक्सल चे दोन रियर कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तर सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

आॅनर प्ले मधील जीपीयू टर्बो गेमिंग एक्सपीरियंस ला खूपच खास बनवतो. फोन ची ग्राफिक्स पावर गेम ला एचडीआर चा अनुभव देते तसेच यातील 7.1 चॅनल हाईस्टन साउंड 3डी गेम साउंड इफेक्ट देण्यास सक्षम आहे. बे​सिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन ब्लॅक, ब्लू आणि वॉयलेट कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

किंमत पाहता आॅनर प्ले चा 4जीबी रॅम वेरिएंट 1,999 युआन (जवळपास 21,000 रुपये) तसेच 6जीबी रॅम वेरिएंट 2,399 युआन (जवळपास 25,000 रुपये) च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. तर आॅनर प्ले चा एक स्पेशल वेरिएंट पण कंपनी ने सादर केला आहे जो 2,499 युआन म्हणजे जवळपास 26,200 रुपयांमध्ये चीन मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आॅनर आपल्या या दमदार स्मार्टफोनला भारतात केव्हा घेऊन येईल याविषीयी काही माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here