Indian Railways - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 09:44:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 प्रत्येकवेळी ट्रेनमध्ये कंफर्म तिकीट मिळवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स https://www.91mobiles.com/marathi/how-to-book-train-tatkal-ticket-confirmed-reservation/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-book-train-tatkal-ticket-confirmed-reservation/#respond Mon, 02 Jan 2023 12:30:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13490 सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेक कारणांमुळे प्रवास करावा लागतो. याकाळात भारतीय रेल्वेकडून स्पेशल ट्रेन्सची देखील घोषणा केली जाते परंतु प्रवाश्यांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकदा Train Ticket Confirm होत नाही. कंफर्म तिकीट बुकिंगसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगी आम्ही पुढे सांगितलेल्या ट्रिक्स तुमच्या कामी येतील, त्यामुळे चुटकीसरशी Indian Railways ची Tatkal Ticket Booking करता येईल आणि […]

The post प्रत्येकवेळी ट्रेनमध्ये कंफर्म तिकीट मिळवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेक कारणांमुळे प्रवास करावा लागतो. याकाळात भारतीय रेल्वेकडून स्पेशल ट्रेन्सची देखील घोषणा केली जाते परंतु प्रवाश्यांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकदा Train Ticket Confirm होत नाही. कंफर्म तिकीट बुकिंगसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगी आम्ही पुढे सांगितलेल्या ट्रिक्स तुमच्या कामी येतील, त्यामुळे चुटकीसरशी Indian Railways ची Tatkal Ticket Booking करता येईल आणि तुमचा प्रवास सुखकर होईल.

अनेकदा ट्रेन रिजर्वेशन झालेलं असतं आणि सर्व सीट्स आधीच बुक असतात. अशावेळी ‘तात्कळ तिकीट बुकिंग’ हा एकमेव पर्याय उरतो. परंतु तात्कळ तिकीट बुक करणं प्रत्येकाला जमतंच असं नाही, हे देखील सत्य आहे. तात्कळ कोटा खुला झाल्यानंतर काही मिनिटांतच सर्व उपलब्ध सीट्स बुक होतात. अशाप्रसंगी काय करायचं आणि कशाप्रकारे बुकिंग कन्फर्म करायची, हे जाणून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की तात्कळ कोटा सकाळी 10 वाजता खुला होतो जो एसी कोचसाठी असतो. तसेच स्लीपर कोचसाठी तात्कळ बुकिंग 11 वाजता सुरु होते.

How To Book Train Tatkal Ticket Confirmed Reservation

How to Book Train Ticket Online

1. यादी बनवून घ्या

जो लोक ट्रेनमध्ये प्रवास करणार आहेत त्यांची सर्व डिटेल्स आधीच तुमच्या प्रोफाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. . यात नाव व वय इत्यादीचा समवेश असेल. IRCTC वर बनलेल्या अकाऊंटच्या प्रोफाईल सेक्शनमध्ये ही बनवता येईल. आधीपासून लिस्ट तयार असेल तर तिकीट बुकिंगच्या वेळी डिटेल्स पुन्हा भरावे लागत नाहीत आणि वेळ वाचेल. हे देखील वाचा: 42 दिवस चार्जींगविना चालेल हा फोन! फक्त 6099 रुपयांमध्ये नवीन Tecno POP 6 Pro भारतात लाँच

2. लॉग-इन करून राहा तयार

तात्कळ बुकिंग ओपन होण्याची वाट पाहू नक, उलट आधीच तुमचा आयडी लॉग-इन करा. आयडी लॉगिन सोबतच ट्रेन रूट, स्टेशन कोड, बर्थ सलेक्शन सारख्या डिटेल्स आधीच भरून घ्या आणि तात्कळ कोटा ओपन होताच सेव्ह केलेल्या पॅसेंजर लिस्टमधून प्रवाश्यांची नावे निवडा आणि पेमेंट मोडवर जा.

3. बँक डिटेल्स आणि सीवीवी ठेवा समोर

पॅसेंजर लिस्ट बनवून आणि आयडी लॉगिनमध्ये डिटेल्स भरून तुम्ही खूप वेळ वाचवू शकता. परंतु जेव्हा पेमेंटची वेळ येते तेव्हा लोक नेहमीच गोंधळतात आणि चिंताग्रस्त होतात. अशावेळी तुमचे बँक डिटेल्स आधीच तयार ठेवा. जमल्यास नंबर सांगण्यासाठी कोणाला तरी सोबत बसवावं, म्हणजे तुम्ही अचूक आणि लवकर नंबर टाइप करू शकाल. तसेच ज्या फोन नंबरवर ओटीपी येईल तो देखील अनलॉक करून तुमच्या शेजारी ठेवा.

How To Book Train Tatkal Ticket Confirmed Reservation

4. ओटीपीविना करा पेमेंट

जेव्हा बँकिंग डिटेल्स देऊन पेमेंट केलं जातं तेव्हा रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येतो आणि व्हेरिफाय करून पेमेंट केलं जातं. परंतु IRCTC वर पेमेंट करण्याचे अनेक पर्याय आहेत ज्यात इंटरनेट बँकिंग, वॉलेट व यूपीआय इत्यादींचा समावेश आहे. परंतु आमच्या मते वेळ वाचवण्यासाठी UPI ची निवड योग्य ठरेल. अशाप्रकारे तुम्हाला ओटीपीची वाट पाहावी लागणार नाही तर फक्त युपीआय पासर्वड टाकावा लागेल. हे देखील वाचा: Ola Electric Offer: या इलेक्ट्रिक स्कूटीवर पहिल्यांदाच मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

5. इंटरनेट स्पीड

वरील सर्व टिप्स तुम्ही योग्यरीत्या वापराल परंतु जर इंटरनेटनं दगा दिला तर सर्व मेहनत वाया जाईल. त्यामुळे सल्ला दिला जात की तुमचं इंटरनेट कनेक्शन चांगलं असावं. जर एखादी अशी जागा असेल जिथे इंटरनेट स्पीड चांगला असेल तर त्या जागी बसूनच बुकिंग सुरु करा. विशेष म्हणजे एकाच सिस्टम आणि ब्राउजरवर तुमची आयडी लॉगिन करा. एकच आयडी वेगवेगळ्या सिस्टमवर लॉगिन असेल तर बुकिंग करता येत नाही.

The post प्रत्येकवेळी ट्रेनमध्ये कंफर्म तिकीट मिळवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-book-train-tatkal-ticket-confirmed-reservation/feed/ 0
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! तुमची ट्रेन कुठे आहे हे पाहा मोबाइलवर, जाणून घ्या सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-check-live-train-running-status-on-mobile-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-check-live-train-running-status-on-mobile-in-marathi/#respond Mon, 05 Dec 2022 11:41:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15679 Live Train Running Status: वेगवान, किफायतशीर आणि सुखद प्रवासासाठी भारतीय रेल्वेला पसंती देतात. तसेच मोठ्या रेल्वे नेटवर्कमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. म्हणूनच कोट्यवधी भारतीय रोज रेल्वेनं हजारो-लाखो किलोमीटरचा प्रवास करतात. प्रवास कितीही सुखकर आणि सहज असला तरी जेव्हा ट्रेन वेळेवर नसते तेव्हा खूप त्रास होतो. स्टेशनवर किती जरी घोषणा झाल्या तरी […]

The post प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! तुमची ट्रेन कुठे आहे हे पाहा मोबाइलवर, जाणून घ्या सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Live Train Running Status: वेगवान, किफायतशीर आणि सुखद प्रवासासाठी भारतीय रेल्वेला पसंती देतात. तसेच मोठ्या रेल्वे नेटवर्कमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. म्हणूनच कोट्यवधी भारतीय रोज रेल्वेनं हजारो-लाखो किलोमीटरचा प्रवास करतात. प्रवास कितीही सुखकर आणि सहज असला तरी जेव्हा ट्रेन वेळेवर नसते तेव्हा खूप त्रास होतो. स्टेशनवर किती जरी घोषणा झाल्या तरी ट्रेन नेमकी कुठे आहे हे मात्र समजत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का की तुम्ही तुमच्या मोबाइलच्या मदतीनं भारतीय रेल्वेच्या कोणत्याही ट्रेनचं अचूक लाइव्ह स्टेटस बघू शकता. विशेष म्हणजे ही सुविधा स्वतः भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया ट्रेनचं ऑनलाइन रनिंग स्टेटस कसं चेक करायचं.

मोबाइलवरून चेक करता येईल ट्रेनचं रनिंग स्टेटस

ट्रेनचं रनिंग स्टेटस तुम्ही मोबाइलच्या माध्यमातून सहज चेक करू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतंही अ‍ॅप देखील डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. यासाठी तुमच्याकडे मोबाइल असणं आवश्यक आहे. प्रवासी फक्त मोबाइलच्या माध्यमातून सहज ट्रेनची लाइव्ह स्थिती बघू शतकात. यासाठी ऑनलाइन अनेक वेबसाइट्स देखील उपलब्ध आहेत, ज्या ट्रेनचं रनिंग स्टेटस सांगण्याची सुविधा देतात. त्यामुळे प्रवासी ट्रेनचं रनिंग स्टेटस चेक करून आपली वेळ मॅनेज करू शकतात. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

How To Book Train Tatkal Ticket Confirmed Reservation

अशी मिळवा माहिती

भारतीय रेल्वेच्या ट्रेन्सची लाइव्ह ट्रेन स्थिती जाणून घेणे म्हणजे कोणत्याही ट्रेनची वर्तमान स्थिती, ट्रेन कुठे आहे आणि तुमच्या स्टेशन पर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल इत्यादी गोष्ट समजतात. यात आगामी स्टेशनवर ट्रेन पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाजे वेळ देखील असतो. तसेच ट्रेन कुठे कुठे थांबणार आहे हे देखील सांगितले जाते. हे देखील वाचा: What Is Community In WhatsApp And How To Use: व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या

अशाप्रकारे चेक करा ट्रेनचं लाइव्ह रनिंग स्टेटस

  • सर्वप्रथम https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर जा.
  • इथे ट्रेन नंबर आणि नाव सबमिट करण्याचा पर्याय तुम्हाला दिसले. तिथे ट्रेनचा नंबर आणि नाव टाका.
  • त्यानंतर तुम्ही जिथून प्रवास करणार आहात त्या स्टेशनची निवड करा.
  • त्यानंतर तारीख टाका.
  • त्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुम्ही निवडलेल्या स्टेशनवर ट्रेन कधी पोहोचेल आणि तिथून कधी प्रस्थान करेल.
  • तसेच त्या स्टेशनवर ट्रेन उशिरा येणार असल्यास त्याची देखील देण्यात येईल.
  • पुढील स्टेशन कोणतं आहे आणि स्टेशन्स कोणते आहेत, याची माहिती देखील मिळेल.
  • यात शो फुल रनिंगचा ऑप्शन देखील मिळेल, ज्याच्या मदतीनं ट्रेनच्या स्टार्टींग पॉईंट पासून अखेरच्या स्टेशन पर्यंतची माहिती घेता येईल.

The post प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! तुमची ट्रेन कुठे आहे हे पाहा मोबाइलवर, जाणून घ्या सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-check-live-train-running-status-on-mobile-in-marathi/feed/ 0