व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या माहिती

लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp नं काही दिवसांपूर्वीच नवीन फिचर व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी (WhatsApp Community) सादर केलं आहे. या नवीन फीचरच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅपवर ऑफिस किंवा कॅज्युअल ग्रुप सांभाळणे सोपं जाईल. तसेच फीचर ग्रुप अ‍ॅडमिनला ग्रुपच्या मेंबर्सशी चांगल्या पद्धतीनं कोऑर्डनेट करण्यास मदत करेल. WhatsApp Communities फीचर सर्व युजर्ससाठी रोल आउट झालं आहे. हे व्हॉट्सअ‍ॅपच्या मुख्य स्क्रीनवर दिसू लागलं आहे. याआधी जिथे कॅमेरा आयकॉन यायचा तिथे आता कम्युनिटी टॅब आली आहे आणि कॅमेरा आयकॉन तुम्हाला टॉप बारमध्ये सर्च बटनच्या डावीकडे ठेवण्यात आला आहे. आज आम्ही तुम्हाला WhatsApp Community फीचरची सविस्तर माहिती देणार आहोत.

व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी म्हणजे काय?

व्हॉट्सअ‍ॅपवर आलेलं नवीन कम्यूनिटी फिचर एक टूल आहे ज्याच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅपवर वेगवेगळ्या ग्रुपचे अ‍ॅडमिन एकाच जागी हे ग्रुप मॅनेजर करू शकतील. म्हणजे अ‍ॅडमिन आपले वेगवेगळे ग्रुप्स इथे अ‍ॅड करू शकतात. हा एकप्रकारचा सेंट्रल अनाउंसमेंट ग्रुप आहे. या फिचरच्या मदतीनं ग्रुप अ‍ॅडमिन एकत्र 50 ग्रुप जोडू शकतात, ज्यात 5000 मेंबर्स असू शकतात. तसेच कॉल लिंक पाठवून 32 मेंबर्ससह ग्रुप कॉल करू शकतात. इतकंच नव्हे तर कम्यूनिटीच्या मदतीनं व्हॉट्सअ‍ॅपवर अ‍ॅडमिन 2GB पर्यंतच्या फाईल सेंड करू शकतो.

इथे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपच्या लेटेस्ट फीचर व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी (WhatsApp Community) ची माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी कशी बनवायची? अ‍ॅडमिन नवीन कम्यूनिटी फिचरच्या मदतीनं आपलं काम कसं लवकर संपवू शकतो? आणि कम्यूनिटी युजर्सना याचा काय फायदा होईल? या प्रश्नांची उत्तरे पुढे देण्यात आली आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप कम्यूनिटी कशी बनवायची?

WhatsApp community बनवण्यासाठी युजर्सना सर्वप्रथम Community टॅबवर टॅप करा आणि स्टार्ट युअर कम्यूनिटी (Start your community) बटनवर क्लिक करा. नंतर तुम्हाला तुमच्या कम्युनिटी चा नाव आणि डिस्क्रिप्शनसह प्रोफाईल फोटो देऊन कम्यूनिटी क्रिएट करा.

हे केल्यानंतर कम्यूनिटी विंडोवर या. आता तुम्ही इथे नवीन ग्रुप बनवता येईल किंवा जुना ग्रुप कम्यूनिटीमध्ये जोडता येईल. दोन्हीसाठी एक डेडिकेटेड बटन असेल. जर तुम्ही जुना ग्रुप कम्यूनिटीमध्ये जोडायचा असेल तर तुम्ही त्या ग्रुपचे अ‍ॅडमिन असणं आवश्यक आहे. कम्यूनिटी विंडोमध्ये तुम्हाला ग्रुपची लिस्ट दिसेल, इथे एक एक डिफॉल्ट ग्रुप देखील असेल, जो अनाउंसमेंट ग्रुप आहे. खाली टिक मार्कवर टॅप केल्यावर तुमची कम्यूनिटी तयार होईल.

तुमच्या कम्यूनिटीमध्ये नवीन ग्रुप जोडतात त्या ग्रुपचे सर्व मेम्बर कम्यूनिटीच्या अनाउंसमेंट ग्रुपमध्ये जोडले जातील.

आता जर तुम्हाला एखादा मेसेज अनेक ग्रुपमध्ये पाठवायचा असेल तर अनाउंसमेंट ग्रुपमध्ये मेसेज टाकू शकता म्हणजे हा मेसेज तुमच्या सर्व ग्रुप मेंबर्सना मिळेल.

अ‍ॅडमिन कम्यूनिटीचा वापर कशाप्रकारे करू शकतो?

अनाउंसमेंट: एखाद्या ग्रुपचा अ‍ॅडमिन म्हणून, कम्यूनिटीच्या मदतीनं एकत्र सर्व ग्रुपमध्ये मेसेज पाठवता येईल. म्हणजे एकच मेसेज वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पाठवण्याऐवजी एकाच कम्यूनिटी अनाउंसमेंट ग्रुपमध्ये पाठवून सर्वांपर्यंत मेसेज पोहोचवता येईल. टेक्स्ट मेसेजसह तुम्ही मीडिया फाईल, डॉक्यूमेंट किंवा व्हॉइस नोट्स देखील पाठवू शकता.

मेंबर इन्वाइट: अ‍ॅडमिन कम्यूनिटीमध्ये दुसऱ्या युजर्सना जोडण्यासाठी शेयर लिंक देखील क्रिएट करता येईल. या लिंकच्या माध्यमातून युजर्स फक्त कम्युनिटीमध्ये जोडले जातील. परंतु ते कोणत्याही ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. परंतु तुम्ही स्वतःहून त्यांना एखाद्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकता.

रिमूविंग मेंबर्स: एखाद्या युजरला ग्रुपमधून काढायचं असेल तर हे काम कम्यूनिटीद्वारे देखील करता येईल. यासाठी तुम्हाला कम्यूनिटीच्या होम पेजवर जावं लागेल. इथे तुम्हाला वर डावीकडे 3 डॉट मेन्यू दिसेल. यावर टॅप करून व्यू मेंबर (View Members) वर क्लिक करावं लागेल. तुम्हाला सर्व ग्रुपचे सर्व मेंबर दिसतील. इथून तुम्ही ज्या युजरला बाहेरचा रस्ता दाखवू इच्छित असाल तर त्यावर टॅप करून आणि कम्यूनिटीसह ग्रुपमधून काढू शकता.

नवीन अ‍ॅडमिन बनवणे: कम्यूनिटी अ‍ॅडमिन असल्यामुळे तुम्ही अनाउंसमेंट ग्रुपसाठी अन्य युजर्सना देखील अ‍ॅडमिन बनवू शकता. यासाठी तुम्हाला कम्यूनिटीच्या मेन पेजवर 3 डॉट मेन्यूवर क्लिक करावं लागेल. इथे तुम्हाला व्यू मेंबरवर टॅप करावं लागेल, ज्या युजरला अ‍ॅडमिन बनवायचं आहे त्यावर क्लिक करा आणि ऑप्शनमधून ‘Make Admin’ (अ‍ॅडमिन बनवा) ची निवड करा.

व्हॉट्सअ‍ॅप युजर कम्यूनिटीचा वापर कशाप्रकारे करू शकतील? | How to use Communities (Other members)

कम्यूनिटीचे सर्व मेम्बर्सकडे अनाउंसमेंट ग्रुपमध्ये अ‍ॅडमिननं पाठवलेले मेसेज, मीडिया फाईल्सचा अ‍ॅक्सेस असेल. तसेच कम्यूनिटी मेंबर अन्य पद्धतीनं अनाउंसमेंट ग्रुपचा वापर करू शकतील.

जॉइनिंग ग्रुप: जर तुम्ही एखाद्या कम्यूनिटीमध्ये असाल परंतु कोणत्याही ग्रुपमध्ये नसाल तर तुम्ही कम्यूनिटीचे वेगवेगळे ग्रुप बघू शकता आणि तो ग्रुप जॉईन करण्याची रिक्वेस्ट अ‍ॅडमिनला पाठवू शकता.

कम्यूनिटी विंडोमध्ये आल्यानंतर युजर्सना ग्रुपची लिस्ट दिसेल आणि ते सहज ग्रुप जॉइन करण्यासाठी रिक्वेक्ट करू शकतील. एखादा मेंबर कम्यूनिटीच्या एका ग्रुपचा मेंबर असेल आणि त्याला दुसरा ग्रुप जॉइन करायचा असेल तर तो कम्यूनिटीमध्ये अ‍ॅडमिनला त्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याची रिक्वेस्ट करू शकतो.

ग्रुप किंवा कम्यूनिटी सोडणे: कम्यूनिटी मॅनेजर कधीही ग्रुप किंवा कम्यूनिटी सोडू शकतो. एखाद्या कम्यूनिटीमध्ये एक किंवा अधिक ग्रुप सोडण्यासाठी ग्रुप डिटेल विंडोमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळेल.

कम्यूनिटी न सोडता ग्रुप सोडणे: जर तुम्हाला कोणत्याही ग्रुपविना कम्यूनिटीमध्ये अ‍ॅड व्हायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. तुम्ही ग्रुप लेफ्ट करून कम्यूनिटी अनाउंमेंट चॅनेलमध्ये राहू शकता. इथे तुम्हाला ग्रुप अ‍ॅडमिनचे मेसेज रिसीव करता येतील.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here