प्रत्येकवेळी ट्रेनमध्ये कंफर्म तिकीट मिळवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेक कारणांमुळे प्रवास करावा लागतो. याकाळात भारतीय रेल्वेकडून स्पेशल ट्रेन्सची देखील घोषणा केली जाते परंतु प्रवाश्यांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकदा Train Ticket Confirm होत नाही. कंफर्म तिकीट बुकिंगसाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा प्रसंगी आम्ही पुढे सांगितलेल्या ट्रिक्स तुमच्या कामी येतील, त्यामुळे चुटकीसरशी Indian Railways ची Tatkal Ticket Booking करता येईल आणि तुमचा प्रवास सुखकर होईल.

अनेकदा ट्रेन रिजर्वेशन झालेलं असतं आणि सर्व सीट्स आधीच बुक असतात. अशावेळी ‘तात्कळ तिकीट बुकिंग’ हा एकमेव पर्याय उरतो. परंतु तात्कळ तिकीट बुक करणं प्रत्येकाला जमतंच असं नाही, हे देखील सत्य आहे. तात्कळ कोटा खुला झाल्यानंतर काही मिनिटांतच सर्व उपलब्ध सीट्स बुक होतात. अशाप्रसंगी काय करायचं आणि कशाप्रकारे बुकिंग कन्फर्म करायची, हे जाणून घेऊया. सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की तात्कळ कोटा सकाळी 10 वाजता खुला होतो जो एसी कोचसाठी असतो. तसेच स्लीपर कोचसाठी तात्कळ बुकिंग 11 वाजता सुरु होते.

How To Book Train Tatkal Ticket Confirmed Reservation

How to Book Train Ticket Online

1. यादी बनवून घ्या

जो लोक ट्रेनमध्ये प्रवास करणार आहेत त्यांची सर्व डिटेल्स आधीच तुमच्या प्रोफाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. . यात नाव व वय इत्यादीचा समवेश असेल. IRCTC वर बनलेल्या अकाऊंटच्या प्रोफाईल सेक्शनमध्ये ही बनवता येईल. आधीपासून लिस्ट तयार असेल तर तिकीट बुकिंगच्या वेळी डिटेल्स पुन्हा भरावे लागत नाहीत आणि वेळ वाचेल. हे देखील वाचा: 42 दिवस चार्जींगविना चालेल हा फोन! फक्त 6099 रुपयांमध्ये नवीन Tecno POP 6 Pro भारतात लाँच

2. लॉग-इन करून राहा तयार

तात्कळ बुकिंग ओपन होण्याची वाट पाहू नक, उलट आधीच तुमचा आयडी लॉग-इन करा. आयडी लॉगिन सोबतच ट्रेन रूट, स्टेशन कोड, बर्थ सलेक्शन सारख्या डिटेल्स आधीच भरून घ्या आणि तात्कळ कोटा ओपन होताच सेव्ह केलेल्या पॅसेंजर लिस्टमधून प्रवाश्यांची नावे निवडा आणि पेमेंट मोडवर जा.

3. बँक डिटेल्स आणि सीवीवी ठेवा समोर

पॅसेंजर लिस्ट बनवून आणि आयडी लॉगिनमध्ये डिटेल्स भरून तुम्ही खूप वेळ वाचवू शकता. परंतु जेव्हा पेमेंटची वेळ येते तेव्हा लोक नेहमीच गोंधळतात आणि चिंताग्रस्त होतात. अशावेळी तुमचे बँक डिटेल्स आधीच तयार ठेवा. जमल्यास नंबर सांगण्यासाठी कोणाला तरी सोबत बसवावं, म्हणजे तुम्ही अचूक आणि लवकर नंबर टाइप करू शकाल. तसेच ज्या फोन नंबरवर ओटीपी येईल तो देखील अनलॉक करून तुमच्या शेजारी ठेवा.

How To Book Train Tatkal Ticket Confirmed Reservation

4. ओटीपीविना करा पेमेंट

जेव्हा बँकिंग डिटेल्स देऊन पेमेंट केलं जातं तेव्हा रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येतो आणि व्हेरिफाय करून पेमेंट केलं जातं. परंतु IRCTC वर पेमेंट करण्याचे अनेक पर्याय आहेत ज्यात इंटरनेट बँकिंग, वॉलेट व यूपीआय इत्यादींचा समावेश आहे. परंतु आमच्या मते वेळ वाचवण्यासाठी UPI ची निवड योग्य ठरेल. अशाप्रकारे तुम्हाला ओटीपीची वाट पाहावी लागणार नाही तर फक्त युपीआय पासर्वड टाकावा लागेल. हे देखील वाचा: Ola Electric Offer: या इलेक्ट्रिक स्कूटीवर पहिल्यांदाच मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या संपूर्ण माहिती

5. इंटरनेट स्पीड

वरील सर्व टिप्स तुम्ही योग्यरीत्या वापराल परंतु जर इंटरनेटनं दगा दिला तर सर्व मेहनत वाया जाईल. त्यामुळे सल्ला दिला जात की तुमचं इंटरनेट कनेक्शन चांगलं असावं. जर एखादी अशी जागा असेल जिथे इंटरनेट स्पीड चांगला असेल तर त्या जागी बसूनच बुकिंग सुरु करा. विशेष म्हणजे एकाच सिस्टम आणि ब्राउजरवर तुमची आयडी लॉगिन करा. एकच आयडी वेगवेगळ्या सिस्टमवर लॉगिन असेल तर बुकिंग करता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here