प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! तुमची ट्रेन कुठे आहे हे पाहा मोबाइलवर, जाणून घ्या सोपी पद्धत

Live Train Running Status: वेगवान, किफायतशीर आणि सुखद प्रवासासाठी भारतीय रेल्वेला पसंती देतात. तसेच मोठ्या रेल्वे नेटवर्कमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. म्हणूनच कोट्यवधी भारतीय रोज रेल्वेनं हजारो-लाखो किलोमीटरचा प्रवास करतात. प्रवास कितीही सुखकर आणि सहज असला तरी जेव्हा ट्रेन वेळेवर नसते तेव्हा खूप त्रास होतो. स्टेशनवर किती जरी घोषणा झाल्या तरी ट्रेन नेमकी कुठे आहे हे मात्र समजत नाही. परंतु तुम्हाला माहित आहे का की तुम्ही तुमच्या मोबाइलच्या मदतीनं भारतीय रेल्वेच्या कोणत्याही ट्रेनचं अचूक लाइव्ह स्टेटस बघू शकता. विशेष म्हणजे ही सुविधा स्वतः भारतीय रेल्वेकडून देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया ट्रेनचं ऑनलाइन रनिंग स्टेटस कसं चेक करायचं.

मोबाइलवरून चेक करता येईल ट्रेनचं रनिंग स्टेटस

ट्रेनचं रनिंग स्टेटस तुम्ही मोबाइलच्या माध्यमातून सहज चेक करू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतंही अ‍ॅप देखील डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. यासाठी तुमच्याकडे मोबाइल असणं आवश्यक आहे. प्रवासी फक्त मोबाइलच्या माध्यमातून सहज ट्रेनची लाइव्ह स्थिती बघू शतकात. यासाठी ऑनलाइन अनेक वेबसाइट्स देखील उपलब्ध आहेत, ज्या ट्रेनचं रनिंग स्टेटस सांगण्याची सुविधा देतात. त्यामुळे प्रवासी ट्रेनचं रनिंग स्टेटस चेक करून आपली वेळ मॅनेज करू शकतात. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

How To Book Train Tatkal Ticket Confirmed Reservation

अशी मिळवा माहिती

भारतीय रेल्वेच्या ट्रेन्सची लाइव्ह ट्रेन स्थिती जाणून घेणे म्हणजे कोणत्याही ट्रेनची वर्तमान स्थिती, ट्रेन कुठे आहे आणि तुमच्या स्टेशन पर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल इत्यादी गोष्ट समजतात. यात आगामी स्टेशनवर ट्रेन पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल याचा अंदाजे वेळ देखील असतो. तसेच ट्रेन कुठे कुठे थांबणार आहे हे देखील सांगितले जाते. हे देखील वाचा: What Is Community In WhatsApp And How To Use: व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या

अशाप्रकारे चेक करा ट्रेनचं लाइव्ह रनिंग स्टेटस

  • सर्वप्रथम https://enquiry.indianrail.gov.in/mntes/ वर जा.
  • इथे ट्रेन नंबर आणि नाव सबमिट करण्याचा पर्याय तुम्हाला दिसले. तिथे ट्रेनचा नंबर आणि नाव टाका.
  • त्यानंतर तुम्ही जिथून प्रवास करणार आहात त्या स्टेशनची निवड करा.
  • त्यानंतर तारीख टाका.
  • त्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुम्ही निवडलेल्या स्टेशनवर ट्रेन कधी पोहोचेल आणि तिथून कधी प्रस्थान करेल.
  • तसेच त्या स्टेशनवर ट्रेन उशिरा येणार असल्यास त्याची देखील देण्यात येईल.
  • पुढील स्टेशन कोणतं आहे आणि स्टेशन्स कोणते आहेत, याची माहिती देखील मिळेल.
  • यात शो फुल रनिंगचा ऑप्शन देखील मिळेल, ज्याच्या मदतीनं ट्रेनच्या स्टार्टींग पॉईंट पासून अखेरच्या स्टेशन पर्यंतची माहिती घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here