Infinix Hot 30 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 Apr 2023 05:34:26 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16जीबी रॅम आणि 50एमपी कॅमेरा! Infinix Hot 30 ची थायलँड मध्ये लाँच https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30-launched-in-thailand-with-50mp-camera-16gb-ram-know-full-detail/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30-launched-in-thailand-with-50mp-camera-16gb-ram-know-full-detail/#respond Mon, 03 Apr 2023 05:33:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19953 इंफिनिक्सनं थायलँडच्या बाजारात अजून एक नवीन स्मार्टफोन Infinix Hot 30 सादर केला आहे. हा नवीन मोबाइल अनेक खास फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात हेलियो G88 ऑक्टा-कोर गेमिंग इंजिन प्रोसेसर दिला आहे, याबाबत कंपनीनं दावा केला आहे की जर या फोनमध्ये एक तास लोकप्रिय मोबाइल गेम फ्री फायर खेळल्यावर याचं तापमान 34.5°C च्या वर […]

The post 16जीबी रॅम आणि 50एमपी कॅमेरा! Infinix Hot 30 ची थायलँड मध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix Hot 30 थायलँडमध्ये लाँच करण्यात आला आहे.
  • या फोनमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आहे.
  • फोनमध्ये Helio G88 हाय-स्पीड प्रोसेसर देण्यात आला आहे.

इंफिनिक्सनं थायलँडच्या बाजारात अजून एक नवीन स्मार्टफोन Infinix Hot 30 सादर केला आहे. हा नवीन मोबाइल अनेक खास फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात हेलियो G88 ऑक्टा-कोर गेमिंग इंजिन प्रोसेसर दिला आहे, याबाबत कंपनीनं दावा केला आहे की जर या फोनमध्ये एक तास लोकप्रिय मोबाइल गेम फ्री फायर खेळल्यावर याचं तापमान 34.5°C च्या वर जाणार नाही. तसेच फोनमध्ये 16GB RAM (8GB+8GB), 50MP कॅमेरा आणि 33 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Infinix Hot 30 ची किंमत

Infinix Hot 30 च्या किंमतीबाबत कंपनीनं आपल्या थायलँड वेबसाइटवर कोणतीही माहिती दिली नाही. परंतु हा थायलँडमध्ये ऑफलाइन सेलसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या फोनच्या किंमतीची आम्हाला माहिती मिळताच आम्ही ही बातमी अपडेट करू. हे देखील वाचा: ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या

Infinix Hot 30 चे स्पेसिफिकेशन्स

Infinix नं सादर केलेल्या इंफिनिक्स हॉट 30 मध्ये 6.78 इंचाचा फुल एचडी LCD पॅनल देण्यात आला आहे. डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, 500 निट्स पीक ब्राइटनेस आणि पांडा ग्लास प्रोटेक्शनसह येतो. तसेच, फोनचं स्क्रीन रिजोल्यूशन 1080*2460 पिक्सल आहे. तसेच हा 2.0GHz पर्यंत स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर सीपीयू Helio G88 चिपसेट 12nm प्रोसेसरसह येतो. इतकेच नव्हेतर चांगल्या ग्राफिक्ससाठी डिवाइसमध्ये ARM Mail-G52 MC2 देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. तसेच यात 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट पण मिळतो. म्हणजे फोन रॅम 16GB पर्यंत वाढवता येतो.

फोटोग्राफीसाठी कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. या कॅमेऱ्यात एफ 1.6 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक AI लेन्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच याच्या फ्रंटला एफ 2.45 अपर्चरसह 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनला पावर देण्यासाठी कंपनीनं यात 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: चुकीच्या UPI ID वर पाठवले पैसे? अशाप्रकारे मिळवा रिफंड, जाणून घ्या प्रोसेस

तसेच कनेक्टिव्हिटी फीचर्स म्हणून डिवाइसमध्ये एक यूएसबी-सी पोर्ट, एक मायक्रोफोन आणि एक 3.5 मिमी ऑडियो जॅक सारखे ऑफ्शन मिळतात. हा फोन XOS 12 आधारित अँड्रॉइड 12 ओएसवर चालतो.

The post 16जीबी रॅम आणि 50एमपी कॅमेरा! Infinix Hot 30 ची थायलँड मध्ये लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30-launched-in-thailand-with-50mp-camera-16gb-ram-know-full-detail/feed/ 0
31 मार्चला लाँच होईल Infinix Hot 30 स्मार्टफोन; सर्वप्रथम थायलँडमध्ये होणार एंट्री https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30-thailand-launch-date-march-31-design-teased-officially/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30-thailand-launch-date-march-31-design-teased-officially/#respond Fri, 31 Mar 2023 03:28:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19897 Infinix नं अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन फोन Infinix Hot 30i लाँच केला होता. आता कंपनी एक नवीन डिवाइस टेक मार्केटमध्ये सादर करण्याची तयारी करत आहे. हा नवीन फोन कंपनी इनफिनिक्स हॉट 30 नावानं लाँच करेल. कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून माहिती दिली आहे की 31 मार्चला हा हँडसेट थायलँडमध्ये सादर केला जाईल. परंतु […]

The post 31 मार्चला लाँच होईल Infinix Hot 30 स्मार्टफोन; सर्वप्रथम थायलँडमध्ये होणार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • इनफिनिक्स हॉट 30 थायलँड मध्ये 31 मार्चला लाँच केला जाईल.
  • Infinix Hot 30 मध्ये 6.78-इंच LCD पॅनल असेल.
  • फोन Helio G88 चिपसेटवर चालेल.

Infinix नं अलीकडेच भारतीय बाजारात आपला नवीन फोन Infinix Hot 30i लाँच केला होता. आता कंपनी एक नवीन डिवाइस टेक मार्केटमध्ये सादर करण्याची तयारी करत आहे. हा नवीन फोन कंपनी इनफिनिक्स हॉट 30 नावानं लाँच करेल. कंपनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलच्या माध्यमातून माहिती दिली आहे की 31 मार्चला हा हँडसेट थायलँडमध्ये सादर केला जाईल. परंतु हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र अद्याप समोर आली नाही. साधारणतः कंपनी जागतिक लाँचनंतर काही दिवसांनी आपले स्मार्टफोन भारतात सादर करते.

Infinix Hot 30 चे फीचर्स कंपनीनं केले टीज

Infinix द्वारे जारी केलेल्या टीजरमधून स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे, ही माहिती कंपनीनं दिल्यामुळे यावर विश्वास ठेवता येईल. टीजरनुसार Infinix Hot 30 स्मार्टफोन 6.78-इंचाच्या LCD पॅनलसह सादर केला जाईल. यात फुल एचडी + रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळेल. तसेच फोनमध्ये Helio G88 चिपसेट दिला जाईल. हे देखील वाचा: 8,999 रुपयांमध्ये Redmi 12C भारतात लाँच; कमी किंमतीत 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

याव्यतिरिक्त आशा आहे की Hot 30 मध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली जाईल जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. टीजरमध्ये फोनच्या फ्रंट व रियर डिजाइनची झलक मिळाली आहे. यावरून स्पष्ट झालं आहे की फोनमध्ये समोरच्या बाजूला पंच-होल डिस्प्ले मिळेल आणि यूनिक डिजाइन रियर शेल असेल. तसेच फोनच्या बॉटम एजमध्ये स्पिकर ग्रिल, यूएसबी टाइप-सी पोर्ट, मायक्रोफोन आणि 3.5एमएम ऑडियो जॅक होगा. फोन के मागे ड्युअल कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह दिला जाईल. हे देखील वाचा: Realme Narzo N55 लाँच डेटची माहिती लागली आमच्या हाती; रॅम आणि स्टोरेजचा देखील खुलासा

विशेष म्हणजे Infinix Hot 30i काही दिवसांपूर्वी भारतात 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज सपोर्टसह सादर करण्यात आला होता. भारतात या फोनची किंमत 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या रुपयांमध्ये विकला जात आहे. या प्राइस सेग्मेंटमध्ये रियलमीकडे realme C33 तर रेडमीकडे Redmi 10A आणि Redmi 9i Sport मोबाइल फोन आहेत आणि इनफिनिक्स हॉट 30आय या हँडसेट्सना चांगली टक्कर देत आहे.

The post 31 मार्चला लाँच होईल Infinix Hot 30 स्मार्टफोन; सर्वप्रथम थायलँडमध्ये होणार एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-hot-30-thailand-launch-date-march-31-design-teased-officially/feed/ 0