16जीबी रॅम आणि 50एमपी कॅमेरा! Infinix Hot 30 ची थायलँड मध्ये लाँच

Highlights

  • Infinix Hot 30 थायलँडमध्ये लाँच करण्यात आला आहे.
  • या फोनमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी आहे.
  • फोनमध्ये Helio G88 हाय-स्पीड प्रोसेसर देण्यात आला आहे.

इंफिनिक्सनं थायलँडच्या बाजारात अजून एक नवीन स्मार्टफोन Infinix Hot 30 सादर केला आहे. हा नवीन मोबाइल अनेक खास फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात हेलियो G88 ऑक्टा-कोर गेमिंग इंजिन प्रोसेसर दिला आहे, याबाबत कंपनीनं दावा केला आहे की जर या फोनमध्ये एक तास लोकप्रिय मोबाइल गेम फ्री फायर खेळल्यावर याचं तापमान 34.5°C च्या वर जाणार नाही. तसेच फोनमध्ये 16GB RAM (8GB+8GB), 50MP कॅमेरा आणि 33 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

Infinix Hot 30 ची किंमत

Infinix Hot 30 च्या किंमतीबाबत कंपनीनं आपल्या थायलँड वेबसाइटवर कोणतीही माहिती दिली नाही. परंतु हा थायलँडमध्ये ऑफलाइन सेलसाठी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या फोनच्या किंमतीची आम्हाला माहिती मिळताच आम्ही ही बातमी अपडेट करू. हे देखील वाचा: ऑनलाईन फसवणूक आणि Cyber Crime ची तक्रार पोलीस स्टेशनला न जात कशी करायची? जाणून घ्या

Infinix Hot 30 चे स्पेसिफिकेशन्स

Infinix नं सादर केलेल्या इंफिनिक्स हॉट 30 मध्ये 6.78 इंचाचा फुल एचडी LCD पॅनल देण्यात आला आहे. डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट, 500 निट्स पीक ब्राइटनेस आणि पांडा ग्लास प्रोटेक्शनसह येतो. तसेच, फोनचं स्क्रीन रिजोल्यूशन 1080*2460 पिक्सल आहे. तसेच हा 2.0GHz पर्यंत स्पीड असलेल्या ऑक्टा-कोर सीपीयू Helio G88 चिपसेट 12nm प्रोसेसरसह येतो. इतकेच नव्हेतर चांगल्या ग्राफिक्ससाठी डिवाइसमध्ये ARM Mail-G52 MC2 देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. तसेच यात 8GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट पण मिळतो. म्हणजे फोन रॅम 16GB पर्यंत वाढवता येतो.

फोटोग्राफीसाठी कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. या कॅमेऱ्यात एफ 1.6 अपर्चरसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि एक AI लेन्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच याच्या फ्रंटला एफ 2.45 अपर्चरसह 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनला पावर देण्यासाठी कंपनीनं यात 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: चुकीच्या UPI ID वर पाठवले पैसे? अशाप्रकारे मिळवा रिफंड, जाणून घ्या प्रोसेस

तसेच कनेक्टिव्हिटी फीचर्स म्हणून डिवाइसमध्ये एक यूएसबी-सी पोर्ट, एक मायक्रोफोन आणि एक 3.5 मिमी ऑडियो जॅक सारखे ऑफ्शन मिळतात. हा फोन XOS 12 आधारित अँड्रॉइड 12 ओएसवर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here