Realme Narzo N55 लाँच डेटची माहिती लागली आमच्या हाती; रॅम आणि स्टोरेजचा देखील खुलासा

Highlights

  • Realme Narzo N55 भारतात 12 एप्रिलला सादर केला जाऊ शकतो.
  • हँडसेट 4GB/6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज दिली जाऊ शकते.
  • कंपनीनं अजूनतरी फोनचा ऑफिशियल लुक जारी केला नाही.

Realme India नं आपल्या Narzo-N सीरीजचा फोन टीज करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच 91मोबाइल्सनं एक्सक्लूसिव्ह माहिती दिली होती की फोन भारतात पुढील महिन्यात सादर केला जाऊ शकतो. आता आम्हाला या फोनच्या लाँच डेटबाबत एक्सक्लूसिव्ह बातमी मिळाली आहे. इंडस्ट्री सोर्सनुसार नारजो एन55 सीरीज 12 एप्रिलला सादर केली जाऊ शकते. जरी कंपनीनं ऑफिशियल लाँच डेटची माहिती दिली नसली तरी आम्हाला अपेक्षा आहे की कंपनी लवकरच याबाबत घोषणा करेल.

कलर, रॅम व स्टोरेज व्हेरिएंट

आमच्या एक्सक्लूसिव्ह रिपोर्टनुसार Realme Narzo N55 प्राइम ब्लॅक आणि प्राइम ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच हा हँडसेट अनेक मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. डिवाइसच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. तसेच Narzo N55 4जीबी रॅम व 128जीबी, 6जीबी रॅम व 64जीबी/128जीबी स्टोरेजसह देखील सादर केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर डिवाइसमध्ये 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज देखील मिळू शकते. हे देखील वाचा: Redmi Note 12 4G फोनची भारतात एंट्री; फोनमध्ये 50MP कॅमेऱ्यासह 6GB रॅम

फोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल अद्याप जास्त माहिती समोर आली नाही. परंतु नारजो एन55 एक मिड-रेंज ऑफरिंग फोन असेल, अशी चर्चा आहे. आशा आहे की फोन एक गेमिंग डिवाइस असेल जो नारजो सीरीजचा न्याय देईल. हँडसेट अ‍ॅमेझॉन व रियलमी वेबसाइटवर विकला जाईल.

अधिकृतपणे या फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले नाहीत. परंतु आम्हाला खात्री आहे की पुढील काही दिवसांमध्ये Realme Narzo N55 च्या लाँच बाबत अधिक माहिती समोर येईल, तसेच यात फोनच्या स्पेसिफिकेशन्सचा देखील समावेश आहे. हे देखील वाचा: 8,999 रुपयांमध्ये Redmi 12C भारतात लाँच; कमी किंमतीत 50MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here