Infinix Smart 7 HD - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 28 Apr 2023 09:32:33 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री! https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-infinix-smart-7-hd-launch-in-india-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-infinix-smart-7-hd-launch-in-india-know-price-specifications/#respond Fri, 28 Apr 2023 09:32:33 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20561 इनफिनिक्सनं आज भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट मोबाइल फोन Infinix Smart 7 HD लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 5,999 रुपयांपासून सुरु होते ज्यात मोठा डिस्प्ले, XOS 12, 4G AI प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारखे स्पेक्स मिळतात. पुढे इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. इनफिनिक्स स्मार्ट […]

The post स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix Smart 7 HD लो बजेट स्मार्टफोन आहे.
  • हा Android ‘Go’ एडिशनवर चालतो.
  • यात 5,000एमएएच बॅटरी मिळते.

इनफिनिक्सनं आज भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट मोबाइल फोन Infinix Smart 7 HD लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 5,999 रुपयांपासून सुरु होते ज्यात मोठा डिस्प्ले, XOS 12, 4G AI प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारखे स्पेक्स मिळतात. पुढे इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीची किंमत

Infinix Smart 7 HD भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे जो 2जीबी रॅमसह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीची किंमत 5,999 रुपये आहे परंतु सुरुवातीला काही दिवस हा फोन फक्त 5,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Silk Blue Green Apple Ink Black आणि Jade White कलरमध्ये फ्लिपकार्टवर 4 मे पासून उपलब्ध होईल.

इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ HD+ Display
  • Wave Pattern Design

Infinix Smart 7 HD स्मार्टफोन वेव्ह पॅटर्न डिजाइनसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 6.6 इंचाचा मोठा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच स्टाईलवर बनला आहे. ही स्क्रीन 500निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. डिस्प्ले तिन्ही बाजूंनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: OPPO F23 Pro 5G भारतात 15 मेला होऊ शकतो लाँच; किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

  • Android Go
  • 2GB Virtual RAM

हा नवीन इनफिनिक्स फोन अँड्रॉइड 12 ‘गो’ एडिशनवर लाँच करण्यात आला आहे जो एक्सओएस 12 सह चालतो. अँड्रॉइड गो असल्यामुळे यात गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात जे कमी रॅमवर देखील स्मूद चालतात. Infinix Smart 7 HD मध्ये 2जीबी रॅम देण्यात आला आहे जो 2जीबी वचुर्अल रॅमसह मिळून फोनला 4जीबी रॅमची ताकद देतो. हे देखील वाचा: PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव

  • 8MP + 5MP Camera
  • 5,000mAh Battery

फोटोग्राफीसाठी Infinix Smart 7 HD च्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळते तसेच सिक्योरिटीसाठी यात रियर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

The post स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री! first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/low-budget-mobile-phone-infinix-smart-7-hd-launch-in-india-know-price-specifications/feed/ 0
28 एप्रिलला लाँच होईल Infinix Smart 7 HD; फोनमध्ये मिळेल 5000mAh बॅटरी आणि 6.6-इंचाचा डिस्प्ले https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-7-hd-to-launch-in-india-on-april-28-with-5000mah-battery-4gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-7-hd-to-launch-in-india-on-april-28-with-5000mah-battery-4gb-ram/#respond Tue, 18 Apr 2023 06:21:45 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20311 Infinix इंडिया आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी आपल्या स्मार्ट एचडी सीरीजमध्ये Smart 7 HD सादर करेल. हा फोन या महिन्यात 28 एप्रिलला सादर केला जाईल. हा फोन गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या Smart 6 HD चा अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. जोडीला कंपनीनं आगामी हँडसेटच्या काही खास स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला आहे, त्यानुसार फोनमध्ये […]

The post 28 एप्रिलला लाँच होईल Infinix Smart 7 HD; फोनमध्ये मिळेल 5000mAh बॅटरी आणि 6.6-इंचाचा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Infinix Smart 7 HD येतोय भारतात.
  • फोन मधील काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा कंपनीनं केला आहे.
  • यात 5000mAh ची बॅटरी आणि मोठा डिस्प्ले मिळेल.

Infinix इंडिया आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी आपल्या स्मार्ट एचडी सीरीजमध्ये Smart 7 HD सादर करेल. हा फोन या महिन्यात 28 एप्रिलला सादर केला जाईल. हा फोन गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या Smart 6 HD चा अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. जोडीला कंपनीनं आगामी हँडसेटच्या काही खास स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला आहे, त्यानुसार फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची उपलब्ध झालेली माहिती.

Infinix Smart 7 HD चे स्पेसिफिकेशन्स (कंफर्म)

इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडी मध्ये 6.6 इंचाची मोठी स्क्रीन दिली जाईल. आशा आहे की या लेटेस्ट फोनमध्ये एचडी रिजोल्यूशन आणि वॉटर ड्रॉप नॉच ऑफर केली जाईल. फोनमधील प्रोसेसरची माहिती तर अजून समोर आली नाही परंतु हे स्पष्ट झालं आहे की फोन 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह येईल.

ग्राहकांना या डिवाइसमध्ये 5000 एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. चार्जिंग क्षमता लाँच डेटवर समोर येईल. इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीमध्ये सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर कॅमेरा मॉड्यूलकडे फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, परंतु सध्या याचा खुलासा झाला नाही की फोनमध्ये किती मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाईल.

Infinix Smart 7 HD ची किंमत (संभाव्य)

कलर ऑप्शन्स पाहता हा अपकमिंग फोन ग्रीन आणि ब्लू दोन रंगात विकत घेता येईल. तसेच, गेल्यावर्षी प्रमाणेच स्मार्ट एचडी सीरीजमध्ये येत्या हा इनफिनिक्स स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये येऊ शकता. अजूनही किंमतीची कोणतीही माहिती समोर आली नाही.

दुसरीकडे बातमी आलू आहे की Infinix 19 एप्रिलला भारतात InBook Y1 Plus Neo लॅपटॉप देखील लाँच करू शकते. यात 15.6 इंचाचा डिस्प्ले, ड्युअल 2W स्पिकर आणि 45W टाइप-सी चार्जिंगची सोय मिळेल. या लॅपटॉपमध्ये 512GB स्टोरेजसह Intel Core प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. कथितरित्या याची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

The post 28 एप्रिलला लाँच होईल Infinix Smart 7 HD; फोनमध्ये मिळेल 5000mAh बॅटरी आणि 6.6-इंचाचा डिस्प्ले first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/infinix-smart-7-hd-to-launch-in-india-on-april-28-with-5000mah-battery-4gb-ram/feed/ 0