OPPO F23 Pro 5G भारतात 15 मेला होऊ शकतो लाँच; किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

Highlights

 

  • OPPO F23 Pro 5G स्मार्टफोन भारतात पुढील महिन्यात लाँच होऊ शकतो.
  • ओप्पोचा हा मिड रेंज स्मार्टफोन 30,000 रुपयांच्या रेंजमध्ये करेल एंट्री
  • OPPO F23 Pro 5G मध्ये मिळेल क्वॉलकॉम Snapdragon 695 प्रोसेसर

 

 

ओप्पो भारतात आपल्या F सीरीजचा नवीन फोन OPPO F23 Pro 5G लाँच करण्याची तयारी करत आहे. 91Mobiles ला टिपस्टर मुकुल शर्माकडून मिळालेल्या एक्सक्लूसिव्ह माहितीनुसार, ओप्पोचा हा फोन भारतात 15 मेला लाँच केला जाईल. ओप्पोच्या आगामी स्मार्टफोनच्या लाँचपूर्वीच या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती लीक झाली आहे. इथे आम्ही तुम्हाला या फोनची माहिती देत आहोत. कंपनीनं गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये OPPO F21s Pro आणि F21s Pro 5G भारतीय बाजारात लाँच केला होता.

ओप्पो एफ23 प्रो 5जी लाँच डेट आणि किंमत (संभाव्य)

ओप्पो एफ23 प्रो 5जी स्मार्टफोन भारतात 15 मेला लाँच केला जाऊ शकतो. ओप्पोचा हा मिड रेंज स्मार्टफोन भारतात 25,000 रुपये किंवा 26,000 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. कंपनी हा फोन अन्य व्हेरिएंट्स देखील लाँच करू शकते. सध्या याबाबत जास्त माहिती समोर आली नाही. हे देखील वाचा: Realme 11 Pro+ 5G च्या लाँचपूर्वीच समोर आली डिजाइन; कर्व्ड डिस्प्ले आणि 200MP कॅमेऱ्यासह करेल दणक्यात एंट्री

याआधी अंदाज लावला जात होता की ओप्पो भारतात F23 सीरीज मार्चमध्ये लाँच करेल, परंतु असं झालं नाही. लेटेस्ट रिपोर्ट्समध्ये या फोनच्या ‘प्रो’ व्हेरिएंटबद्दल डिटेल्स समोर आले आहेत. बेस व्हेरिएंट बद्दल माहिती उपलब्ध नाही. लाँचपूर्वी ओप्पोच्या अपकमिंग फोन्सबाबत आणखी माहिती समोर येऊ शकते.

ओप्पो एफ23 प्रो 5जी स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • मुकुल शर्मानुसार, अपकमिग OPPO F23 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स पुढीलप्रमाणे असू शकतात.
  • डिस्प्ले : OPPO F23 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.72-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याची ब्राइटनेस 580 निट्स आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की हा AMOLED पॅनल नाही. ओप्पोच्या या फोनमध्ये LCD डिस्प्ले पॅनल मिळू शकतो.
  • प्रोसेसर : ओप्पोच्या आगामी स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर मिळू शकतो. हा प्रोसेसर आहे जो वनप्लसच्या लेटेस्ट अफोर्डेबल Nord CE Lite 3 5G स्मार्टफोनमध्ये देण्यात आला होता.
  • कॅमेरा : OPPO F23 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे, जोडीला 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. ओप्पोच्या फोनमध्ये 40x मायक्रोस्कोप लेन्सचा सपोर्ट मिळेल. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: 6,000mAh battery सह लाँच झाला Infinix Hot 30 Play; जाणून घ्या किंमत

  • बॅटरी आणि चार्जिंग : OPPO F23 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते. हा फोन 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. SuperVOOC टेक्नॉलॉजी असण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here