स्वस्त स्मार्टफोन Infinix Smart 7 HD भारतात लाँच, फक्त 5399 रुपयांमध्ये होणार विक्री!

Highlights

  • Infinix Smart 7 HD लो बजेट स्मार्टफोन आहे.
  • हा Android ‘Go’ एडिशनवर चालतो.
  • यात 5,000एमएएच बॅटरी मिळते.

इनफिनिक्सनं आज भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट मोबाइल फोन Infinix Smart 7 HD लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 5,999 रुपयांपासून सुरु होते ज्यात मोठा डिस्प्ले, XOS 12, 4G AI प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारखे स्पेक्स मिळतात. पुढे इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीची किंमत

Infinix Smart 7 HD भारतीय बाजारात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे जो 2जीबी रॅमसह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीची किंमत 5,999 रुपये आहे परंतु सुरुवातीला काही दिवस हा फोन फक्त 5,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन Silk Blue Green Apple Ink Black आणि Jade White कलरमध्ये फ्लिपकार्टवर 4 मे पासून उपलब्ध होईल.

इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ HD+ Display
  • Wave Pattern Design

Infinix Smart 7 HD स्मार्टफोन वेव्ह पॅटर्न डिजाइनसह सादर केला गेला आहे. या फोनमध्ये 6.6 इंचाचा मोठा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच स्टाईलवर बनला आहे. ही स्क्रीन 500निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते. डिस्प्ले तिन्ही बाजूंनी बेजल लेस आहे तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: OPPO F23 Pro 5G भारतात 15 मेला होऊ शकतो लाँच; किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

  • Android Go
  • 2GB Virtual RAM

हा नवीन इनफिनिक्स फोन अँड्रॉइड 12 ‘गो’ एडिशनवर लाँच करण्यात आला आहे जो एक्सओएस 12 सह चालतो. अँड्रॉइड गो असल्यामुळे यात गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात जे कमी रॅमवर देखील स्मूद चालतात. Infinix Smart 7 HD मध्ये 2जीबी रॅम देण्यात आला आहे जो 2जीबी वचुर्अल रॅमसह मिळून फोनला 4जीबी रॅमची ताकद देतो. हे देखील वाचा: PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव

  • 8MP + 5MP Camera
  • 5,000mAh Battery

फोटोग्राफीसाठी Infinix Smart 7 HD च्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 5 मेगापिक्सलच्या सेल्फी सेन्सरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी मिळते तसेच सिक्योरिटीसाठी यात रियर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here