28 एप्रिलला लाँच होईल Infinix Smart 7 HD; फोनमध्ये मिळेल 5000mAh बॅटरी आणि 6.6-इंचाचा डिस्प्ले

Highlights

  • Infinix Smart 7 HD येतोय भारतात.
  • फोन मधील काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा कंपनीनं केला आहे.
  • यात 5000mAh ची बॅटरी आणि मोठा डिस्प्ले मिळेल.

Infinix इंडिया आपला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. कंपनी आपल्या स्मार्ट एचडी सीरीजमध्ये Smart 7 HD सादर करेल. हा फोन या महिन्यात 28 एप्रिलला सादर केला जाईल. हा फोन गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या Smart 6 HD चा अपग्रेडेड व्हेरिएंट असेल. जोडीला कंपनीनं आगामी हँडसेटच्या काही खास स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा केला आहे, त्यानुसार फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 6.6 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची उपलब्ध झालेली माहिती.

Infinix Smart 7 HD चे स्पेसिफिकेशन्स (कंफर्म)

इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडी मध्ये 6.6 इंचाची मोठी स्क्रीन दिली जाईल. आशा आहे की या लेटेस्ट फोनमध्ये एचडी रिजोल्यूशन आणि वॉटर ड्रॉप नॉच ऑफर केली जाईल. फोनमधील प्रोसेसरची माहिती तर अजून समोर आली नाही परंतु हे स्पष्ट झालं आहे की फोन 4 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजसह येईल.

ग्राहकांना या डिवाइसमध्ये 5000 एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. चार्जिंग क्षमता लाँच डेटवर समोर येईल. इनफिनिक्स स्मार्ट 7 एचडीमध्ये सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर कॅमेरा मॉड्यूलकडे फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, परंतु सध्या याचा खुलासा झाला नाही की फोनमध्ये किती मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाईल.

Infinix Smart 7 HD ची किंमत (संभाव्य)

कलर ऑप्शन्स पाहता हा अपकमिंग फोन ग्रीन आणि ब्लू दोन रंगात विकत घेता येईल. तसेच, गेल्यावर्षी प्रमाणेच स्मार्ट एचडी सीरीजमध्ये येत्या हा इनफिनिक्स स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये येऊ शकता. अजूनही किंमतीची कोणतीही माहिती समोर आली नाही.

दुसरीकडे बातमी आलू आहे की Infinix 19 एप्रिलला भारतात InBook Y1 Plus Neo लॅपटॉप देखील लाँच करू शकते. यात 15.6 इंचाचा डिस्प्ले, ड्युअल 2W स्पिकर आणि 45W टाइप-सी चार्जिंगची सोय मिळेल. या लॅपटॉपमध्ये 512GB स्टोरेजसह Intel Core प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. कथितरित्या याची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here