PUBG आणि BGMI वाल्या कंपनीनं भारतात लाँच केला नवा गेम; जाणून घ्या गेम प्ले आणि नाव

Highlights

  • नवीन गेमचं नाव Defense Derby आहे.
  • हा Google Play वरून डाउनलोड करता येईल.
  • 11 मे पर्यंत याचं प्रीव्यू व्हर्जन उपलब्ध असेल.

PUBG आणि BGMI इंडियन गेमिंग इंडस्ट्रीचे असे गेम्स आहेत ज्यांनी लाखो लोकांना वेड लावलं होतं. हे दोन्ही सुपरहिट मोबाइल गेम्स बनवणाऱ्या कंपनी Krafton नं आता भारतात अजून एक नवीन गेम रिलीज केला आहे. हा डिफेंस डर्बी (Defense Derby) Game नावानं लाँच करण्यात आला आहे जो गुगल प्ले स्टोर (Google Play) वर डाउनलोडसाठी उपलब्ध झाला आहे.

Defense Derby गेम Krafton द्वारे रिलीज करण्यात आला आहे ज्याची निर्मिती स्वतंत्र स्टूडियो राइजिंगविंग्सनं केली आहे. कंपनीनं सध्या या गेमचं प्रीव्यू व्हर्जन जारी केलं आहे जो अर्ली अ‍ॅक्सेससाठी उपलब्ध झाला आहे. येत्या 11 मेपर्यंत डिफेंस डर्बीचं हे प्रीव्यू व्हर्जन गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड व इन्स्टाल करता येईल. हे देखील वाचा: 6,000mAh battery सह लाँच झाला Infinix Hot 30 Play; जाणून घ्या किंमत

कसा आहे डिफेंस डर्बीचा गेम प्ले

सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की Defense Derby गेम PUBG आणि BGMI सारखा अजिबात नाही. हा एक स्ट्रॅटेजी गेम आहे तर बीजीएमआय आणि पबजी मोबाइल बॅटल रॉयल-स्टाइल गेम होते. डिफेंस डर्बीमध्ये टॉवर डिफेंस शैलीचा वापर करण्यात आला आहे. म्हणजे प्लेयर्सना एक ठराविक लक्ष्य दिलं जाईल ज्याची सुरक्षा करावी लागेल.

डिफेंस डर्बीमध्ये एक साथ 4 प्लेयर एक संघात खेळू शकतात. प्रत्येक राउंडमध्ये चारही खेळाडूंना स्काउटिंगच्या माध्यमातून कार्ड्स दिले जातील आणि या कार्ड्सचा वापर करून त्यांना डेक बनवावा लागेल. हा डेक मॉन्स्टर म्हणजे राक्षसांपासून वाचण्यासाठी बनवला जाईल. जोपर्यंत संघातील सर्व खेळाडू मरत नाहीत तोपर्यंत गेम सुरु राहील.

मोफत खेळात येईल डिफेंस डर्बी गेम

Krafton नं Defense Derby ‘फ्री गेम’ श्रेणी अंतगर्त लाँच केला आहे. हा गेम Google Play वर उपलब्ध झाला आहे जिथे हा मोफत डाउनलोड करता येईल. वर सांगितल्याप्रमाणे या गेमचं प्रीव्यू व्हर्जन आलं आहे, परंतु नंतर फुल व्हर्जन रिलीज झाल्यानंतर देखील डिफेंस डर्बी गेम पूर्णपणे फ्री राहील. हे देखील वाचा: OPPO F23 Pro 5G भारतात 15 मेला होऊ शकतो लाँच; किंमत आणि स्पेसिफिकेशन्स आले समोर

क्राफ्टननं इंडियन युजर्ससाठी एक्सक्सूलिव्ह गिफ्ट्स देखील गेममध्ये ठेवले आहेत. यात अर्ली अ‍ॅक्सेस टेस्टिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी 700 रुपयांचे गेम रिवॉर्ड मिळत आहेत. या रिवॉर्ड्समध्ये 2500 क्रिस्टल, 500 गोल्ड, 500 एलिक्सिर आणि 500 मॅनास्टोनचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here