iQOO 7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 26 Apr 2021 12:25:57 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iQOO 7 सीरीज दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/iqoo-7-legend-and-iqoo-7-launched-in-india-price-and-specs/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-7-legend-and-iqoo-7-launched-in-india-price-and-specs/#respond Mon, 26 Apr 2021 12:25:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10699 iQOO 7 Legend आणि iQOO 7 दोन्ही स्मार्टफोन प्रीमियम आणि स्लीक डिजाइनसह सादर केले गेले आहेत.

The post iQOO 7 सीरीज दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo चा सबब्रँड iQOO ने भारतात आपली फ्लॅगशिप iQOO 7 सीरीज सादर केली आहे. कंपनीने या सीरीजचे दोन स्मार्टफोन iQOO 7 Legend आणि iQOO 7 भारतीय बाजारात आणले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन 5G कनेक्टक्टिविटी आणि लेटेस्ट स्नेपड्रेगन चिपसेटसह सादर केले गेले आहेत. iQOO 7 Legend स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या फ्लॅगशिप Snapdragon 888 चिपसेटसह सादर केला गेला आहे. तसेच iQOO 7 स्मार्टफोन Snapdragon 870 चिपसेटसह सादर केला गेला आहे. चिपसेट व्यतिरिक्त दोन्ही स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे आहेत. इथे आम्ही तुम्हाला iQOO 7 Legend आणि iQOO 7 स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबाबत संपूर्ण माहिती देत आहोत. (iQOO 7 legend and iQOO 7 launched in India price and specs)

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : डिजाइन आणि लुक

iQOO 7 Legend आणि iQOO 7 दोन्ही स्मार्टफोन प्रीमियम आणि स्लीक डिजाइनसह सादर केले गेले आहेत. स्मार्टफोनचा बॅक पॅनल काचेपासून बनला आहे, जी AG matte काच आहे. कंपनीचा दावा आहे कि याच्या बॅक पॅनलमध्ये फिंगरप्रिंट आणि डाग दिसत नाहीत. तर iQOO 7 Legend स्मार्टफोन आइकॉनिक अवार्ड विनिंग डिजाइनसह सादर केला गेला आहे. फोनच्या मागे असलेला रेसिंग ट्रॅक या स्मार्टफोनचा सुपरलाइटनिंग परफॉर्मन्स दर्शवतो. फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात तीन कॅमेरा सेंसर आणि LED फ्लॅश मिळतो. तसेच फोनच्या डिस्प्लेमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

iQOO 7

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : डिस्प्ले

iQOO 7 Series च्या दोन्ही स्मार्टफोन QOO 7 Legend आणि iQOO 7 मध्ये 6.62 इंचाचा 2400×1080 AMOLED IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅंप्लिंग रेट 300Hz आहे. iQOO 7 Series चे स्मार्टफोन HDR10 आणि HDR10+ हाई डायनमिक रेंज वडियो कंटेंट आणि विविड कलरला सपोर्टसह येतात. फ्रंट कॅमेऱ्यासाठी डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : परफॉर्मन्स

iQOO 7 Legend स्मार्टफोन कंपनीचा सर्वात प्रीमियम स्मार्टफोन आहे. यात क्वॉलकॉमचा Snapdragon 888 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच कंपनीने iQOO 7 मध्ये प्रीमियम मिड रेंज Snapdragon 870 चिपसेट दिला आहे. iQOO 7 Legend आणि iQOO 7 स्मार्टफोनमध्ये कंपनीने दमदार चिपसेटसह ग्राफिक्ससाठी क्रमश: Adreno 660 GPU आणि Adreno 650 GPU दिला आहे. iQOO 7 सीरीज स्मार्टफोनमध्ये 66W फ्लॅशचार्ज सपोर्ट आहे. iQOO 7 Legend स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी फक्त 22 मिनिटांत फुल चार्ज होते. तर iQOO 7 स्मार्टफोनमध्ये 4400mAh ची बॅटरी देण्यात आहे, जी 30 मिनिटांत फुल चार्ज होते.

iQOO 7 Camera

iQOO 7 सीरीज स्मार्टफोनमध्ये पावरफुल परफॉर्मन्ससाठी इंडस्ट्री लीडिंग कूलिंग सिस्टम आहे. iQOO 7 Legend स्मार्टफोनमध्ये लीक्विड कूलिंग सिस्टम 4096mm2 Vapor Chamber आहे जो सर्व हीटिंग कोरला कवर करतो. तसेच iQOO 7 स्मार्टफोनमध्ये 6000mm2 Graphite Layer फुल कवरेज लिक्विड कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे कि हि कूलिंग सिस्टम युजरला स्मूद गेमिंग एक्सपीरियंस देते.

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : कॅमेरा

iQOO 7 Series स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 48MP चा मेन कॅमेरा आहे, जो SONY IMX598 सेंसर आहे. तसेच दोन्ही फोनमध्ये 13MP चा सुपर वाइड अँगल मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये तिसरा कॅमेरा सेंसर वेगवेगळा देण्यात आला आहे. iQOO 7 स्मार्टफोनमध्ये 2MP मोनो कॅमेरा देण्यात आला आहे, तर iQOO 7 Legend स्मार्टफोन 13MP ची Pro Portrait Lens मिळते.

व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी दोन्ही स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. iQOO 7 Series स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेला प्राइमेरी कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS)ला सपोर्ट करतो. फोटोग्राफी फीचर्स पाहता iQOO 7 Series स्मार्टफोनमध्ये एक्सट्रीम नाइट विजन प्रो, स्पोर्टस मोड, सुपर नाइट मोड, सुपर नाइट पॅनो, डबल एक्सपोजर मोड देण्यात आले आहेत.

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : इतर फीचर्स

iQOO 7 Legend आणि iQOO 7 दोन्ही स्मार्टफोन Android 11 वर आधारित कंपनीच्या कस्टमाइज्ड युजर इंटरफेस Funtouch OS 11.1 वर चालतात. दोन्ही स्मार्टफोनमध्ये डुअल स्पीकर सपोर्ट देण्यात आला आहे जे सराउंड साउंड ऑफर करतात. कनेक्टिविटी पाहता दोन्ही स्मार्टफोनमध्ये डुअल सिम 5G आणि 4G, डुअल WiFi बॅंड, Bluetooth 5.1, USB Type C पोर्ट देण्यात आले आहेत. iQOO 7 दोन कलर ऑप्शन – स्ट्रॉम ब्लॅक आणि आइस ब्लू मध्ये सादर केला गेला आहे.

iQOO 7 Legend

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : किंमत

iQOO ने भारतात iQOO 7 Legend स्मार्टफोन दोन वेरिएंट आणि iQOO 7 तीन वेरिएंटमध्ये सादर केला आहे. iQOO 7 Legend स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 39,990 रुपयांमध्ये सादर केला आहे. तर याचा टॉप वेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरोजसह 43,990 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे.

iQOO 7 स्मार्टफोनचा बेस वेरिएंट 8GB रॅम + 128GB स्टोरेजसह 31,990 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला गेला आहे. तर दुसरा वेरिएंट 8GB रॅम + 256 GB स्टोरेजसह 33,990 रुपयांमध्ये सादर केला आहे. टॉप वेरिएंट 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह 35,990 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे.

iQOO 7 Legend आणि iQOO 7 : प्रीऑर्डर ऑफऱ

दोन्ही स्मार्टफोन विक्रीसाठी 1 मेला अमेझॉनवर उपलब्ध होतील. iQOO 7 सीरीजची प्री बुकिंग अमेझॉन आणि iQOO च्या ऑफिशियल वेबसाइटवर सुरु झाली आहे. iQOO 7 स्मार्टफोनवर ICICI बँकेच्या कार्डवर 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच 2000 रुपयांची अमेझॉन कुपन ऑफर मिळत आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन को प्री ऑर्डर केल्यास फोन 27,990 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल.

iQOO 7 Legend ची प्री ऑर्डर पण अमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाइटवर सुरु झाली आहे. यात ICICI बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास 3000 रुपयांचा डिस्काउंट आणि 2000 रुपयांचा अमेझॉन कुपन डिस्काउंट मिळत आहे. प्री-ऑर्डर करताना iQOO 7 Legend स्मार्टफोन 34,990 रुपयांच्या बेस किंमतीत विकत घेता येईल.

The post iQOO 7 सीरीज दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-7-legend-and-iqoo-7-launched-in-india-price-and-specs/feed/ 0
iQOO Neo5 स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo5-gets-bis-approval-india-launch-soon-with-iqoo-7-series-check-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo5-gets-bis-approval-india-launch-soon-with-iqoo-7-series-check-specifications/#respond Wed, 07 Apr 2021 17:43:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10541 iQOO Neo5 स्मार्टफोनला BIS चे सर्टिफिकेशन मिळाले आहे, पण याची कोणतीही माहिती समोर आली नाही. पण Google Play Console च्या लिस्टिंगवरून या स्मार्टफोनची बरीच माहिती समोर आली होती.

The post iQOO Neo5 स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO लवकरच भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करून हवा करण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून iQOO च्या या अपकमिंग स्मार्टफोनबद्दल बातम्यासमोर येत आहेत. गेल्या महिन्यात Google Play Console वर iQOO चा अपकमिंग स्मार्टफोन मॉडेल नंबर I2012 सह स्पॉट केला गेला होता. आता iQOO चा हा स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) चे अप्रूवल मिळाले आहे. iQOO चा हा अपकमिंग स्मार्टफोन iQOO Neo5 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन कंपनीच्या फ्लॅगशिप iQOO 7 सह या महिन्याच्या शेवटपर्यंत लॉन्च केला जाऊ शकतो. (iqoo neo5 gets bis approval india launch soon with iqoo 7 series check specifications)

iQOO Neo5 लीक स्पेसिफिकेशन्स

iQOO Neo5 स्मार्टफोनला BIS चे सर्टिफिकेशन मिळाले आहे, पण याची कोणतीही माहिती समोर आली नाही. पण Google Play Console च्या लिस्टिंगवरून या स्मार्टफोनची बरीच माहिती समोर आली होती. लिस्टिंगनुसार iQOO Neo5 फोन पंच होल डिस्प्ले, Full HD+ रिजोल्यूशन डिस्प्ले आणि Snapdragon 870 चिपसेटसह 8 GB रॅम आणि Android 11 सह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 20MP सेल्फी कॅमेरा आणि 6GB रॅम असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, अशी असेल नवीन प्राइस

iQOO Neo5 चा कसा असेल कॅमेरा

iQOO Neo5 स्मार्टफोनसंबंधित बातम्यांनुसार या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच iQOO Neo5 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यात प्राइमेरी कॅमेरा 48 मेगापिक्सलसह 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 6000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

iQOO Neo5 स्मार्टफोनच्या डिस्प्लेबद्दल लीक झालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये 6.62 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच स्क्रीनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण दिला जाऊ शकतो. Vivo च्या सब-ब्रँड iQOO भारतात दोन स्मार्टफोन – iQOO 3 4G आणि iQOO 3 5G लॉन्च केले आहेत. आता कंपनी भारतात iQOO 7 सीरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. काही रिपोर्टमध्ये असा पण दावा केला जात आहे कि iQOO Neo5 भारतात iQOO 7 सीरीजचा फोन असू शकतो.

The post iQOO Neo5 स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo5-gets-bis-approval-india-launch-soon-with-iqoo-7-series-check-specifications/feed/ 0
OnePlus ला टक्कर देण्यासाठी येत आहे 12GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट आणि 120W चार्जिंग असलेला हा पावरफुल 5G फोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-7-5g-phone-to-launch-in-india-in-march-with-snapdragon-888-soc-12gb-ram/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-7-5g-phone-to-launch-in-india-in-march-with-snapdragon-888-soc-12gb-ram/#respond Thu, 11 Feb 2021 11:30:18 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9993 iQOO 7 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.

The post OnePlus ला टक्कर देण्यासाठी येत आहे 12GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट आणि 120W चार्जिंग असलेला हा पावरफुल 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo पासून वेगळे झाल्यानंतर टेक ब्रँड iQOO ने गेल्या वर्षी भारतीय बाजारात iQOO 3 स्मार्टफोन लाॅन्च केला होता जो भारतातील पहिला 5G स्मार्टफोन म्हणून आला होता. आयक्यू 3 च्या यशानंतर आता कंपनी देशात आपला विस्तार करण्याची तयारी करत आहे. अशी बातमी आली आहे कि आयक्यू पुढल्या महिन्यात म्हणजे मार्च मध्ये आपला फ्लॅगशिप डिवायस iQOO 7 भारतात लाॅन्च करेल. फक्त इतकेच नव्हे तर आयक्यू 7 सोबतच कंपनी एप्रिल मध्ये अजून दोन नवीन स्मार्टफोन इंडिया मार्केट मध्ये घेऊन येईल.

iQOO 7 च्या इंडिया लाॅन्चची माहिती गॅजेट्सडाटाच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टरने एक ट्वीट करून असा दावा केला आहे कि आयक्यू 7 स्मार्टफोन मार्च मध्ये भारतात लाॅन्च होईल जो तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात भारतीय बाजारात येईल. तसेच लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि आयक्यू 7 च्या लाॅन्चनंतर हा ब्रँड एप्रिल मध्ये अजून दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करेल. एप्रिल मध्ये लाॅन्च होणाऱ्या या दोन iQOO स्मार्टफोन्सची नावे काय असतील, याची माहिती मात्र मिळाली नाही.

iQOO 7

आयक्यू 7 टेक मार्केट मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.62 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल एमोलेड डिस्प्लेवर सादर केला गेला आहे. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीसह येते तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. आयक्यू 7 अँड्रॉइड 11 वर लॉन्च झाला आहे ज्यात 5नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉमचा सर्वात पावरफुल 5G चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 888 देण्यात आला आहे. टेक मंचावर हा फोन 8 जीबी आणि 12 जीबीच्या दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे.

हे देखील वाचा : 5,000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला iQOO U3 स्मार्टफोन, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

iQOO 7 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड अँगल लेंस आणि एफ/2.46 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या पोर्टरेट लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी आयक्यू 7 मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

आयक्यू 7 स्मार्टफोन डुअल मोड 5जी (SA/NSA) आणि 4जी वोएलटीई दोन्ही नेटवर्कला सपोर्ट करू शकतो. हा एक डुअल सिम फोन आहे जो ब्लूटूथ, वाय-फाय सारख्या कनेक्टिविटी फीचर्ससह येतो. तसेच पावर बॅकअपसाठी iQOO 7 मध्ये 120वॉट अल्ट्रा-फास्ट फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी असेलेली 4,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 8 जीबी + 128 जीबी वेरिएंटची किंमत 43,000 रुपये तर 12 जीबी + 256 जीबी वेरिएंटची किंमत 47,500 रुपयांच्या आसपास आहे.

The post OnePlus ला टक्कर देण्यासाठी येत आहे 12GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट आणि 120W चार्जिंग असलेला हा पावरफुल 5G फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-iqoo-7-5g-phone-to-launch-in-india-in-march-with-snapdragon-888-soc-12gb-ram/feed/ 0