iQOO Neo5 स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये

iQOO लवकरच भारतात नवीन स्मार्टफोन लॉन्च करून हवा करण्याच्या तयारीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून iQOO च्या या अपकमिंग स्मार्टफोनबद्दल बातम्यासमोर येत आहेत. गेल्या महिन्यात Google Play Console वर iQOO चा अपकमिंग स्मार्टफोन मॉडेल नंबर I2012 सह स्पॉट केला गेला होता. आता iQOO चा हा स्मार्टफोन ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड (BIS) चे अप्रूवल मिळाले आहे. iQOO चा हा अपकमिंग स्मार्टफोन iQOO Neo5 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन कंपनीच्या फ्लॅगशिप iQOO 7 सह या महिन्याच्या शेवटपर्यंत लॉन्च केला जाऊ शकतो. (iqoo neo5 gets bis approval india launch soon with iqoo 7 series check specifications)

iQOO Neo5 लीक स्पेसिफिकेशन्स

iQOO Neo5 स्मार्टफोनला BIS चे सर्टिफिकेशन मिळाले आहे, पण याची कोणतीही माहिती समोर आली नाही. पण Google Play Console च्या लिस्टिंगवरून या स्मार्टफोनची बरीच माहिती समोर आली होती. लिस्टिंगनुसार iQOO Neo5 फोन पंच होल डिस्प्ले, Full HD+ रिजोल्यूशन डिस्प्ले आणि Snapdragon 870 चिपसेटसह 8 GB रॅम आणि Android 11 सह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 20MP सेल्फी कॅमेरा आणि 6GB रॅम असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, अशी असेल नवीन प्राइस

iQOO Neo5 चा कसा असेल कॅमेरा

iQOO Neo5 स्मार्टफोनसंबंधित बातम्यांनुसार या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच iQOO Neo5 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यात प्राइमेरी कॅमेरा 48 मेगापिक्सलसह 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंगसह सादर केला जाऊ शकतो.

हे देखील वाचा : 6000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

iQOO Neo5 स्मार्टफोनच्या डिस्प्लेबद्दल लीक झालेल्या माहितीनुसार या फोनमध्ये 6.62 इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. तसेच स्क्रीनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण दिला जाऊ शकतो. Vivo च्या सब-ब्रँड iQOO भारतात दोन स्मार्टफोन – iQOO 3 4G आणि iQOO 3 5G लॉन्च केले आहेत. आता कंपनी भारतात iQOO 7 सीरीज लॉन्च करण्याची तयारी करत आहे. काही रिपोर्टमध्ये असा पण दावा केला जात आहे कि iQOO Neo5 भारतात iQOO 7 सीरीजचा फोन असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here