6000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Gionee Max

Gionee ने बजेट स्मार्टफोन सेग्मेंटमध्ये अजून एक नवीन Gionee P15 Pro लॉन्च केला आहे. लेटेस्ट Gionee P15 Pro स्मार्टफोन दमदार 6000mAh बॅटरी आणि एंट्री लेवल मीडियाटेकचा चिपसेट Helio G35 SoC सह सादर केला गेला आहे. चायनीज स्मार्टफोन कंपनी Gionee ने हा स्मार्टफोन सध्या नायजेरियामध्ये लॉन्च केला आहे. Gionee चा हा बजेट स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात पण कमी किंमतीत सादर केला जाऊ शकतो. Gionee च्या या स्मार्टफोनची थेट टक्कर Xiaomi, Realme, Samsung आणि Motorola च्या एंट्री लेवल स्मार्टफोनपासून होणार आहे. इथे आम्ही तुम्हाला Gionee P15 Pro स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर आणि किंमतीची माहिती देत आहोत. (gionee p15 pro launched check price and specifications)

Gionee P15 Pro : स्पेसिफिकेशन

Gionee P15 Pro स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 720 x 1600 पिक्सल आहे. या डिस्प्लेचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 84.6% आहे, ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी वाटरड्रॉप नॉच देण्यात आला आहे. या फोनचा बॅक पॅनल पॉलीकार्बोनेटचा बनला आहे. या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Gionee P15 Pro स्मार्टफोन MediaTek Helio G35 SoC सह 3GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला गेला आहे. या स्मार्टफोनची स्टोरेज MicroSD कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये हेडफोन जॅक, डुअल 4G सिम स्लॉट, WiFi, ब्लूटूथ आणि GPS सारखे फीचर देण्यात आले आहेत. जियोनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन Android 11 वर चालतो.

हे देखील वाचा : OPPO Reno5 Z ने केली धमाकेदार एंट्री, यात आहे 48MP कॅमेरा, 8GB रॅम आणि खूप काही

Gionee P15 Pro : कॅमेरा

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Gionee P15 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे. या कॅमेरा सेंसरसह 2 मेगापिक्सल कॅमेरा सेंसर आणि AI लेंस देण्यात आली आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये LED फ्लॅश पण देण्यात आला आहे. रियर पॅनलमध्ये या फोनचा फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : 20MP सेल्फी कॅमेरा आणि 6GB रॅम असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, अशी असेल नवीन प्राइस

Gionee P15 Pro : किंमत

Gionee P15 Pro स्मार्टफोन सध्या नायजेरियामध्ये सादर केला गेला आहे. हा फोन सिंगल वेरिएंट 3GB RAM + 64GB स्टोरेजसह नाइजिरिया मध्ये ₦61,500 (जवळपास 11,000 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. जियोनीचा हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात पण लॉन्च केला जाऊ शकतो. सध्या याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here