iTel P40 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Jul 2023 12:02:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7,000mAh Battery असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन झाला लाँच; किंमत 9 हजारांपेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/7000mah-battery-smartphone-itel-p40-plus-launched-in-india-check-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/7000mah-battery-smartphone-itel-p40-plus-launched-in-india-check-price-specification/#respond Wed, 12 Jul 2023 12:02:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22356 लो बजेट सेग्मेंटमध्ये नवीन आणि मोठे फीचर्स घेऊन येणाऱ्या टेक ब्रँड आयटेलनं भारतात आणखी एक लेटेस्ट मोबाइल फोन itel P40+ लाँच केला आहे. आयटेल पी40 प्लस इंडियन मार्केटमधील पहिला स्मार्टफोन आहे जो 9 हजारांपेक्षा कमी किंमतीत 7,000एमएएचची बॅटरी देतो. ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे. itel P40+ ची किंमत आयटेल पी40+ कंपनीनं […]

The post 7,000mAh Battery असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन झाला लाँच; किंमत 9 हजारांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा फोन फक्त 499 रुपयांमध्ये बुक करता येईल.
    • पहिला फोन आहे जो ह्या बजेटमध्ये 7,000एमएएचची बॅटरी देत आहे.
    • ह्यात 100 दिवसांपर्यंत वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट मिळते.

    लो बजेट सेग्मेंटमध्ये नवीन आणि मोठे फीचर्स घेऊन येणाऱ्या टेक ब्रँड आयटेलनं भारतात आणखी एक लेटेस्ट मोबाइल फोन itel P40+ लाँच केला आहे. आयटेल पी40 प्लस इंडियन मार्केटमधील पहिला स्मार्टफोन आहे जो 9 हजारांपेक्षा कमी किंमतीत 7,000एमएएचची बॅटरी देतो. ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

    itel P40+ ची किंमत

    आयटेल पी40+ कंपनीनं सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे ज्यात 4जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. itel P40+ फक्त 8,099 रुपयांमध्ये शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर Force Black आणि Ice Cyan कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. याची विक्री 14 जुलैपासून सुरु होईल जो 499 रुपयांमध्ये प्री-बुक केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉन इंडिया प्राइम डे सेल 2023 नंतर ह्याची किंमत वाढवली जाऊ शकते.

    itel P40+ स्पेसिफिकेशन्स

    स्क्रीन : आयटेल पी40 प्लस स्मार्टफोन 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो पंच-होल स्टाईलवर बनला आहे. ही आयपीएस स्क्रीन आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.

  • प्रोसेसर : itel P40+ अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो Unisoc T606 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ह्या फोनमध्ये 4जीबी वचुर्अल रॅम देण्यात आला आहे जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून 8जीबी रॅमची ताकद देतो. फोनमध्ये 128जीबी स्टोरेज आहे.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात फ्लॅश लाईट असलेली 13 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी एआय लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी आयटेल पी40+ स्मार्टफोनमध्ये 7,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे. कंपनीनुसार हा मोबाइल 18 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देऊ शकतो.

The post 7,000mAh Battery असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन झाला लाँच; किंमत 9 हजारांपेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/7000mah-battery-smartphone-itel-p40-plus-launched-in-india-check-price-specification/feed/ 0
6,000mAh Battery सह iTel P40 भारतात लाँच; किंमत फक्त 7,699 रुपये https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-itel-p40-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-itel-p40-price-specifications/#respond Thu, 16 Mar 2023 11:31:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19562 टेक ब्रँड आयटेलनं आज भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट मोबाइल फोन iTel P40 लाँच केला आहे. हा स्वस्त स्मार्टफोन 6,000एमएएचच्या पावरफुल बॅटरीसह आला आहे जो कंपनीच्या दाव्यानुसार एकदा फुल चार्ज केल्यानंतर हा फोन 57 दिवसांचा स्टँडबायटाइम देऊ शकतो. पुढे तुम्ही स्वस्त आयटेल पी40 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती वाचू शकता. आयटेल पी40 ची […]

The post 6,000mAh Battery सह iTel P40 भारतात लाँच; किंमत फक्त 7,699 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आयटेल पी40 ची मुख्य यूएसपी यातील 6,000एमएएचची बॅटरी आहे.
  • कंपनीनुसार ही सिंगल चार्जमध्ये 57 दिवस स्टँडबायवर राहते.
  • iTel P40 अँड्रॉइड ‘गो’ एडिशनवर लाँच करण्यात आला आहे.

टेक ब्रँड आयटेलनं आज भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट मोबाइल फोन iTel P40 लाँच केला आहे. हा स्वस्त स्मार्टफोन 6,000एमएएचच्या पावरफुल बॅटरीसह आला आहे जो कंपनीच्या दाव्यानुसार एकदा फुल चार्ज केल्यानंतर हा फोन 57 दिवसांचा स्टँडबायटाइम देऊ शकतो. पुढे तुम्ही स्वस्त आयटेल पी40 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती वाचू शकता.

आयटेल पी40 ची किंमत

iTel P40 कंपनीनं सध्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे जो 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. याची किंमत 7699 रुपये आहे. हा फोन मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे 7जीबी रॅमची पावर मिळते. आयटेल पी40 Force Black, Dreamy Blue आणि Luxurious Gold कलरमध्ये बाजारात आला आहे. हे देखील वाचा: UIDAI नं दिली खुशखबर, 14 जून पर्यंत ऑनलाइन आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

आयटेल पी40 चे स्पेसिफिकेशन्स

iTel P40 स्मार्टफोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या लार्ज एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. तर तीन कडा बेजल लेस आहेत परंतु खाली रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

आयटेल पी40 अँड्रॉइड 12 गो एडिशन वर लाँच झाला आहे जो UNISOC SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. अँड्रॉइड गो एडिशन असल्यामुळे या फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात. हे अ‍ॅप्स कमी स्टोरेज घेतात तसेच कमी रॅम व हलक्या प्रोसेसरवर देखील स्मूद चालतात.

फोटोग्राफीसाठी आयटेल पी40 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.85 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी क्यूवीजीए लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: 21 मार्चला लाँच होईल OPPO Find X6 सीरीज, प्रोमो पोस्टरमधून डिजाइनचा खुलासा

iTel P40 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईसह चालतो. सिक्योरिटीसाठी मोबाइलच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी आयटेल पी40 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

The post 6,000mAh Battery सह iTel P40 भारतात लाँच; किंमत फक्त 7,699 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/6000mah-battery-phone-itel-p40-price-specifications/feed/ 0