UIDAI नं दिली खुशखबर, 14 जून पर्यंत ऑनलाइन आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

Highlights

  • UIDAI नं आधार अपडेट करण्यासाठी लागणारं शुल्क रद्द केलं आहे.
  • 14 जून, 2023 पर्यंत आधार कार्ड मोफत ऑनलाइन अपडेट करता येईल.
  • त्यानंतर Aadhaar अपडेट केल्यास 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

आधार कार्ड धारकांसाठी UIDAI नं एक खुशखबर दिली आहे. UIDAI नं माहिती दिली आहे की आता आधार अपडेट करण्यासाठी कार्डधारकांना 15 मार्च, 2023 ते 14 जून, 2023 पर्यंत कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणजे या कालावधीत आधार अपडेट करण्यासाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करण्यात आलं आहे. परंतु ही सुविधा फक्त ऑनलाइन अपडेटसाठी लागू असेल.

14 जूनपर्यंत ऑनलाइन आधार अपडेट मोफत

UIDAI नं आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करून अशी माहिती दिली आहे की आधार धारकांना या फ्री आधार अपडेटच्या सुविधेचा फायदा तीन महिने मिळेल. म्हणजे होल्डर्स 15 मार्च, 2023 पासून 14 जून, 2023 पर्यंत आपलं आधार कार्ड मोफत ऑनलाइन अपडेट करू शकतील. हे देखील वाचा: लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन्ससह लिस्ट झाला Infinix Hot 30i, 27 मार्चला होणार भारतात एंट्री

आधार एनरोलमेंट आणि अपडेट रेग्युलेशन 2016 नुसार आधार कार्ड जारी होऊन जर 10 वर्षांचा कालावधी झाला असेल तर तुम्ही हा अपडेट करू शकता. दरम्यान अनेकांचा पत्ता, नाव इत्यादी बदलेले असते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव UIDAI नं सर्व आधार कार्ड अपडेट करण्याची सूचना दिली आहे. आधार अपडेटचा ऑनलाइन वेग वाढवण्यासाठी सरकारकडून आकारली जाणारी 50 रुपयांची फी आता रद्द करण्यात आली आहे.

नोट: डेमोग्राफिक डिटेल (नाव, जन्मतारीख, पत्ता इत्यादी ) बदलण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागल्यास सामान्य शुल्क लागू होईल.

आधारमधील माहिती अपडेट कशी करायची

तुम्हाला आधारवरील माहिती अपडेट करायची असेल तर (Uidai) युआयडीएआय तुमचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी स्वीकारेल. ज्यात युजरचं नाव आणि फोटोची माहिती असेल. या आयडेंटिफिकेशन डॉक्यूमेंटमध्ये पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर आयडी सारख्या डॉक्यूमेंटचा समावेश असेल. डॉक्यूमेंट अपडेट करण्यासाठी माय आधार पोर्टल (myAadhaar portal) आणि माय आधार अ‍ॅप (myAadhaar app) चा वापर करता येईल. तसेच तुम्ही बदल करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आधार एनरोलमेंट सेंटर (Aadhaar enrolment center) वर देखील जाऊ शकता. हे देखील वाचा: Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

तुमच्या आधार कार्डवर पत्ता ऑनलाइन बदलण्यासाठी सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (Self Service Update Portal) (SSUP) ची मदत घेता येईल. जर तुम्हाला आधारवरील नाव, पत्ता, डेट ऑफ बर्थ, जेंडर किंवा मोबाइल नंबर बदलायचा असेल किंवा फिंगरप्रिंट बायोमेट्रिकमध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला यासाठी आधारच्या पर्मनंट एनरोलमेंट सेंटरवर जावं लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here