7,000mAh Battery असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन झाला लाँच; किंमत 9 हजारांपेक्षा कमी

Highlights

  • हा फोन फक्त 499 रुपयांमध्ये बुक करता येईल.
    • पहिला फोन आहे जो ह्या बजेटमध्ये 7,000एमएएचची बॅटरी देत आहे.
    • ह्यात 100 दिवसांपर्यंत वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट मिळते.

लो बजेट सेग्मेंटमध्ये नवीन आणि मोठे फीचर्स घेऊन येणाऱ्या टेक ब्रँड आयटेलनं भारतात आणखी एक लेटेस्ट मोबाइल फोन itel P40+ लाँच केला आहे. आयटेल पी40 प्लस इंडियन मार्केटमधील पहिला स्मार्टफोन आहे जो 9 हजारांपेक्षा कमी किंमतीत 7,000एमएएचची बॅटरी देतो. ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

itel P40+ ची किंमत

आयटेल पी40+ कंपनीनं सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे ज्यात 4जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. itel P40+ फक्त 8,099 रुपयांमध्ये शॉपिंग साइट अ‍ॅमेझॉनवर Force Black आणि Ice Cyan कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. याची विक्री 14 जुलैपासून सुरु होईल जो 499 रुपयांमध्ये प्री-बुक केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉन इंडिया प्राइम डे सेल 2023 नंतर ह्याची किंमत वाढवली जाऊ शकते.

itel P40+ स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन : आयटेल पी40 प्लस स्मार्टफोन 720 x 1640 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो पंच-होल स्टाईलवर बनला आहे. ही आयपीएस स्क्रीन आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालते.

  • प्रोसेसर : itel P40+ अँड्रॉइड 12 वर लाँच झाला आहे जो Unisoc T606 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. ह्या फोनमध्ये 4जीबी वचुर्अल रॅम देण्यात आला आहे जो इंटरनल 4जीबी रॅमसह मिळून 8जीबी रॅमची ताकद देतो. फोनमध्ये 128जीबी स्टोरेज आहे.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात फ्लॅश लाईट असलेली 13 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर आणि सेकंडरी एआय लेन्स आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी आयटेल पी40+ स्मार्टफोनमध्ये 7,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला आहे. कंपनीनुसार हा मोबाइल 18 दिवसांचा स्टॅन्डबाय टाइम देऊ शकतो.
  • LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here