21 मार्चला लाँच होईल OPPO Find X6 सीरीज, प्रोमो पोस्टरमधून डिजाइनचा खुलासा

Highlights

  • कंपनीनं OPPO Find X6 सीरीजची लाँच डेट ऑफिशियल करण्यात आली आहे.
  • सीरीजमध्ये 21 मार्चला OPPO Find X6 आणि Find X6 Pro सादर केला जाऊ शकतो.
  • OPPO च्या प्रोमोशनल पोस्टरमधून फोनची डिजाइन समोर आली आहे.

OPPO Find X6 सीरीजच्या स्मार्टफोन्स बद्दल गेले कित्येक दिवस अफवा येत आहेत. परंतु आता ब्रँडनं आपल्या लेटेस्ट फ्लॅगशिप सीरीज फोनच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. कंपनीनं चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून माहिती दिली आहे की ओप्पो फाईंड एक्स6 याच महिन्यात 21 मार्च 2023 ला लाँच केली जाईल. परंतु ग्लोबल लाँच बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आशा आहे की चीन व्यतिरिक्त इतर देशांमध्ये देखील ही फोन सीरिज दाखल होईल.

OPPO Find X6 सीरिजमधील फोन

प्रमोशनल पोस्टरनुसार ओप्पो फाईंड एक्स6 सीरीज 21 मार्चला दुपारी 14:00 वाजता स्थानिक वेळेनुसार (11:30 AM IST) चीनमध्ये लाँच होईल. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली नाही परंतु फोनसह ओप्पो पॅड 2 देखील लाँच होऊ शकतो. OPPO Find X6 सीरीजमध्ये OPPO Find X6, OPPO Find X6 Pro आणि OPPO Find X6 Lite हे फोन्स येऊ शकतात. लाँच तारीख सांगताना OPPO नं OPPO Find X6 सीरीजचा पोस्टर आणि व्हिडीओ देखील जारी केला आहे, ज्यातून डिवाइसची डिजाइन समजली आहे. हे देखील वाचा: Samsung Galaxy A54 5G आणि Galaxy A34 5G भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

पोस्टरमध्ये पेरिस्कोप कॅमेऱ्याचा स्लॉट स्पष्ट दिसत आहे जो 100x पर्यंतच्या झूम सपोर्टसह बाजारात येऊ शकतो. त्याचबरोबर डिवाइसच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये चहूबाजूला एक मोठा रिंग असेल. डिवाइसच्या मागे लेदर सारखा मॅटेरियल दिसत आहे. एक प्रमोशनल व्हिडीओमध्ये कॅमेरा मॉड्यूलच्या मध्यभागी हॅसलब्लेड ब्रँडिंग दिसत आहे. तसेच ब्रँडनं एक प्रमोशनल व्हिडीओच्या माध्यमातून डिवाइसची नाइट फोटोग्राफी क्षमता टीज केली आहे. ओप्पो फाईंड एक्स6 प्रो फक्त चांगले मून शॉट्स नव्हे तर शॉटमधील इतर वस्तू आणि माणसांकडे देखील सामान लक्ष देईल. हे देखील वाचा: UIDAI नं दिली खुशखबर, 14 जून पर्यंत ऑनलाइन आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

ओप्पो फाईंड एक्स6 प्रो स्पेसिफिकेशन्स (लीक)

OPPO Find X6 Pro मध्ये 6.8-इंच 2K 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. तसेच डिवाइस स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसर, 16GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह बाजारात येण्याची शक्यता आहे. यात 50MP + 50MP + 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी स्नॅपर मिळू शकतो. डिवाइसमध्ये USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here