6,000mAh Battery सह iTel P40 भारतात लाँच; किंमत फक्त 7,699 रुपये

Highlights

  • आयटेल पी40 ची मुख्य यूएसपी यातील 6,000एमएएचची बॅटरी आहे.
  • कंपनीनुसार ही सिंगल चार्जमध्ये 57 दिवस स्टँडबायवर राहते.
  • iTel P40 अँड्रॉइड ‘गो’ एडिशनवर लाँच करण्यात आला आहे.

टेक ब्रँड आयटेलनं आज भारतीय बाजारात आपला नवीन लो बजेट मोबाइल फोन iTel P40 लाँच केला आहे. हा स्वस्त स्मार्टफोन 6,000एमएएचच्या पावरफुल बॅटरीसह आला आहे जो कंपनीच्या दाव्यानुसार एकदा फुल चार्ज केल्यानंतर हा फोन 57 दिवसांचा स्टँडबायटाइम देऊ शकतो. पुढे तुम्ही स्वस्त आयटेल पी40 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स व प्राइसची माहिती वाचू शकता.

आयटेल पी40 ची किंमत

iTel P40 कंपनीनं सध्या सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे जो 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. याची किंमत 7699 रुपये आहे. हा फोन मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजीसह येतो त्यामुळे 7जीबी रॅमची पावर मिळते. आयटेल पी40 Force Black, Dreamy Blue आणि Luxurious Gold कलरमध्ये बाजारात आला आहे. हे देखील वाचा: UIDAI नं दिली खुशखबर, 14 जून पर्यंत ऑनलाइन आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

आयटेल पी40 चे स्पेसिफिकेशन्स

iTel P40 स्मार्टफोन 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या लार्ज एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन आयपीएस पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच आहे. तर तीन कडा बेजल लेस आहेत परंतु खाली रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे.

आयटेल पी40 अँड्रॉइड 12 गो एडिशन वर लाँच झाला आहे जो UNISOC SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. अँड्रॉइड गो एडिशन असल्यामुळे या फोनमध्ये गुगल गो अ‍ॅप्स डाउनलोड व इन्स्टाल करता येतात. हे अ‍ॅप्स कमी स्टोरेज घेतात तसेच कमी रॅम व हलक्या प्रोसेसरवर देखील स्मूद चालतात.

फोटोग्राफीसाठी आयटेल पी40 स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईटसह एफ/1.85 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी क्यूवीजीए लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग या मोबाइल फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: 21 मार्चला लाँच होईल OPPO Find X6 सीरीज, प्रोमो पोस्टरमधून डिजाइनचा खुलासा

iTel P40 ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईसह चालतो. सिक्योरिटीसाठी मोबाइलच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी आयटेल पी40 मध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here