Jio 5G Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 06:11:54 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लीक फार्मवेयरमधून Jio Phone 5G च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specifications-exclusive-5000mah-battery-13mp-camera-know-more-details/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specifications-exclusive-5000mah-battery-13mp-camera-know-more-details/#respond Thu, 29 Sep 2022 06:21:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13557 भारतात लवकरच 5G मोबाइल सर्व्हिस (5G Service) सुरु होऊ शकते. यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव झाला आहे, टेलिकॉम Jio आणि Airtel सारख्या टेलिकॉम ऑपरेटर्सनी पुढील महिन्यात सर्व्हिस लाइव्ह करण्याची तयारी केली आहे. परंतु मोठ्याप्रमाणावर 5G चा प्रसार करण्याच्या मार्गात एक मोठा अडथळा आहे तो म्हणजे महागडे 5G स्मार्टफोन्स. परंतु आता यावर देखील भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी […]

The post लीक फार्मवेयरमधून Jio Phone 5G च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात लवकरच 5G मोबाइल सर्व्हिस (5G Service) सुरु होऊ शकते. यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव झाला आहे, टेलिकॉम Jio आणि Airtel सारख्या टेलिकॉम ऑपरेटर्सनी पुढील महिन्यात सर्व्हिस लाइव्ह करण्याची तयारी केली आहे. परंतु मोठ्याप्रमाणावर 5G चा प्रसार करण्याच्या मार्गात एक मोठा अडथळा आहे तो म्हणजे महागडे 5G स्मार्टफोन्स. परंतु आता यावर देखील भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio नं उपाय शोधला आहे तो म्हणजे Jio Phone 5G.

रिलायन्स जियो (Jio) सर्वप्रथम आपलं 5G Network लाइव्ह करण्यासोबतच स्वस्त 5जी स्मार्टफोन म्हणजे Jio Phone 5G सादर करण्याची योजना बनवत आहे. अलीकडेच Jio 5G Phone ची Price समोर आली होती, तर आता लीक फर्मवेयरच्या माध्यमातून Jio Phone 5G चे Specifications समोर आले आहेत. डेव्हलपर Kuba Wojciechowski यांनी 91mobiles ला एक्सक्लूसिव्हली माहिती दिली आहे.

Jio Phone 5G Specifications Exclusive 5000mAh Battery 13MP Camera Know More Details

Jio Phone 5G

डेव्हलपर Kuba Wojciechowski यांनी आम्हाला फर्मवियरचे स्क्रिनशॉट दिले आहेत, ज्यात जियोच्या 5जी फोनच्या फीचर्सची माहिती आहे. त्यानुसार हा फोन ‘ganga’ कोडनेम सह लिस्टेड आहे, ज्याचा मार्केटिंग नाव Jio Phone True 5G असू शकतं. तसेच लिस्टिंगमध्ये फोनचा मॉडेल नंबर LS1654QB5 असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त ओप्पो स्मार्टफोनमध्ये मिळणार 7GB रॅम; OPPO A17k चे फुल स्पेसिफिकेशन आणि फीचर्स लीक

जियो 5G फोनचे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.5-inch HD+ 90Hz LCD panel
  • 4GB LPDDR4X RAM
  • Snapdragon 480 SoC
  • 5,000mAh battery, 18W charging
  • 13MP + 2MP dual rear camera
  • 8MP selfie shooter
  • Android 12

जियो फोन 5जी फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट असू शकतो. तसेच, स्क्रीनचे रिजोल्यूशन 1600×720 पिक्सल असू शकते. त्याचबरोबर, फोन Snapdragon 480 प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो, जोडीला 4GB LPPDDR4X RAM आणि 32GB स्टोरेज दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: खेळ खल्लास! 200MP कॅमेरा आणि दर्जेदार स्पेक्ससह येत आहेत Xiaomi 12T आणि 12T Pro; लाँच डेटची घोषणा

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमधील प्रायमरी कॅमेरा 13MP चा आणि एक 2MP चा मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो. हा फोन Android 12 वर चालू शकतो. तसेच फोनमध्ये सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी Jio Phone True 5G मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. कनेक्टिव्हिटी ऑप्शनसाठी फोनमध्ये वाय-फाय आणि ब्लूटूथ सपोर्ट मिळू शकतो.

Jio Phone 5G Price

काही दिवसांपूर्वी Counterpoint Research च्या रिपोर्टमधून जियोफोन 5जी ची किंमत लीक झाली होती. त्यानुसार Jio चा 5G स्मार्टफोन 8,000 ते 12,000 रुपयांमध्ये बाजारात येऊ शकतो. ही प्राइस रेंज पाहता असा अंदाज लावला जात आहे की Jio Phone 5G एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये बाजारात येऊ शकतो.

The post लीक फार्मवेयरमधून Jio Phone 5G च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-5g-specifications-exclusive-5000mah-battery-13mp-camera-know-more-details/feed/ 0
जगातील सर्वात स्वस्त 5G Phone! Jio Phone 5G ची किंमत आली समोर, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-phone-launch-price-8000-to-12000-in-india-reliance-jio-ultra-affordable-5g-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-phone-launch-price-8000-to-12000-in-india-reliance-jio-ultra-affordable-5g-smartphone/#respond Tue, 27 Sep 2022 06:38:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13470 पुढील महिन्यात भारतात 5G Service येणार असल्याची माहिती केंद्रीय दूर संचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे. दिवाळीपासून भारतीय मोबाइल युजर आपल्या स्मार्टफोन्समध्ये 5G Network चा वापर करू शकतील आणि सुपर फास्ट 5G Internet चा आनंद घेऊ शकतील. रिलायन्स जियो सर्वप्रथम 5जी सर्व्हिस सुरु करू शकते. Jio 5G रोलआउट होण्याआधीच आता Jio 5G Phone Price […]

The post जगातील सर्वात स्वस्त 5G Phone! Jio Phone 5G ची किंमत आली समोर, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
पुढील महिन्यात भारतात 5G Service येणार असल्याची माहिती केंद्रीय दूर संचार मंत्री अश्विन वैष्णव यांनी दिली आहे. दिवाळीपासून भारतीय मोबाइल युजर आपल्या स्मार्टफोन्समध्ये 5G Network चा वापर करू शकतील आणि सुपर फास्ट 5G Internet चा आनंद घेऊ शकतील. रिलायन्स जियो सर्वप्रथम 5जी सर्व्हिस सुरु करू शकते. Jio 5G रोलआउट होण्याआधीच आता Jio 5G Phone Price देखील समोर आली आहे. जियो 5जी स्मार्टफोनची किंमत 8,000 रुपयांपासून सुरु होऊ शकते.

Jio 5G Phone Price

जियो फोन 5जीची किंमत काउंटरपॉईंटच्या रिपोर्ट मधून समोर आली आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स जियोचा 5जी स्मार्टफोन भारतात 8,000 रुपये ते 12,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाईल. ही प्राइस रेंज पाहता असा अंदाज लावला जात आहे की Jio Phone 5G एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: Airtel युजर्ससाठी खुशखबर! 5GB डेटा मिळतोय अगदी FREE; रिचार्ज करण्याची देखील गरज नाही

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

रिलायन्स जियो 5जी स्मार्टफोन लाँच करण्याआधी कंपनी आपल्या 4जी ग्राहकांना 5जी नेटवर्कवर आणण्याचे काम करेल आणि मोठा 5जी युजर बेस बनवल्यानंतर आपला 5जी फोन बाजारात सादर करेल. विशेष म्हणजे Reliance AGM 2022 मध्ये Mukesh Ambani यांनी आधीच घोषणा केली आहे की कंपनी Google सोबत मिळून ultra-affordable 5G phone लाँच करेल.

Jio 5G Smartphone

रिपोर्टनुसार साल 2024 पर्यंत रिलायन्स जियो कमी किंमत असलेला affordable 5G mmWave + sub-6GHz smartphone पण लाँच करू शकते. हा मोबाइल फोन भारतातील लो बजेट 5जी स्मार्टफोन्सच्या तुलनेत जास्त चांगल्या 5जी बँड्सना सपोर्ट करेल तसेच लो लेटन्सी आणि स्मूद 5जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी देऊ शकेल. परंतु याला बाजारात येण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागेल.

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

Jio Phone 5G Specifications

लीक्स नुसार Jio Phone 5G मध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिली जाऊ शकतो जो आयपीएस एलसीडी पॅनलवर असेल. फोनमध्ये 60हर्ट्ज रिफ्रेश रेट मिळू शकतो तसेच स्क्रीनला ग्लास प्रोटेक्शन देखील दिलं जाऊ शकतं. लीक्स नुसार जियोफोन 5जी चा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच स्टाईल सह येईल. Jio Phone 5G 4 जीबी रॅमसह लाँच होईल ज्यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल. फोनमध्ये इंटरनल मेमरी कमी असेल परंतु यात एक्स्ट्रनल मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल आणि फोनमध्ये स्टोरेज वाढवता येईल.

जियोफोन 5जी मध्ये प्रगती ओएस दिला जाऊ शकतो जो आपण याआधी जियोफोन नेक्स्ट lमध्ये दिसला आहे. या ऑपरेटिंग सिस्टमची निर्मिती Google नं खास भारतीय मोबाइल युजर्ससाठी केली आहे ज्यात भारतीय भाषांचा सपोर्ट देखील मिळतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Jio Phone 5G मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: एकच नंबर! 10 हजारांच्या रेंजमध्ये 8GB RAM; 50MP कॅमेऱ्यासह स्वस्त मोबाइल OPPO A17 लाँच

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

फोटोग्राफीसाठी जियोफोन 5जी मध्ये ड्युअल रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे. लीक्स नुसार हा 5जी फोन 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरला सपोर्ट करेल, जोडीला 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स दिली जाईल. हा सेकंडरी सेन्सर एक मॅक्रो लेन्स असू शकते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आतापर्यंत कोणत्याही लीक किंवा रिपोर्टमध्ये JioPhone 5G च्या बॅटरीची माहिती समोर आली नाही.

The post जगातील सर्वात स्वस्त 5G Phone! Jio Phone 5G ची किंमत आली समोर, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-5g-phone-launch-price-8000-to-12000-in-india-reliance-jio-ultra-affordable-5g-smartphone/feed/ 0
Jio 5G phone ची किंमत असेल 2,500 रुपयांच्या आसपास, पुन्हा बदलेल भारताचा मोबाईल बाजार https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-5g-phone-price-in-india-could-rs-2500-jio-android-smartphone-launch/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-5g-phone-price-in-india-could-rs-2500-jio-android-smartphone-launch/#respond Mon, 19 Oct 2020 14:20:00 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8574 Jio Android SmartPhone बद्दल सांगण्यात येत आहे कि यावर्षीच्या शेवटी म्हणजे डिसेंबर पर्यंत कंपनी आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणू शकते.

The post Jio 5G phone ची किंमत असेल 2,500 रुपयांच्या आसपास, पुन्हा बदलेल भारताचा मोबाईल बाजार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Jio ने सांगितले आहे कि कंपनी भारतात 5G नेटवर्क आणण्याची तयारी करत आहे आणि लवकरच देशात 5जी घेऊन येईल. तसेच Reliance Jio भारतात आपला स्वस्त स्मार्टफोन आणण्याची पण तयारी करत आहे. Jio Android SmartPhone बद्दल काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती, ज्यात सांगण्यात आले होते कि या जियो स्मार्टफोनची किंमत 4,000 रुपयांच्या आसपास असेल. तसेच आता जियो संबंधित एका नवीन रिपोर्ट मध्ये कंपनीच्या Jio 5G phone ची महत्वाची माहिती समोर आली आहे.

Reliance Jio संबंधित हि मोठी बातमी न्यूज एजेंसी पीटीआईने प्रकाशित केले आहे. एजेंसी रिपोर्टनुसार रिलायंस जियो लो बजेट 5जी फोन आणण्याची तयारी करत आहे. रिपोर्टनुसार कंपनी Jio 5G phone चे अनेक मॉडेल्स बाजारात घेऊन येईल आणि या सर्वांची किंमत 5,000 रुपयांपेक्षा कमी असेल. रिपोर्ट मध्ये दावा केला गेला आहे कि जियो 5जी फोन कंपनी 2,500 ते 3,000 रुपयांमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करेल.

Jio 5G phone चा बेस मॉडेल 2,500 रुपयांपर्यंतच्या किंमतीत विकला जाईल. रिपोर्टनुसार जियोची योजना 20 ते 30 कोटी 5जी फोन बनवण्याची आहे. सांगण्यात आले आहे कि रिलायंस जियो ‘2G-मुक्त भारत’ अभियान अंतगर्त हा मोबाईल फोन घेऊन येईल आणि कंपनीचे पहिले टारगेट असे लोक असतील जे आतापर्यंत फीचर फोन किंवा 2जी नेटवर्क वापरात आहेत.

Jio Android SmartPhone बद्दल सांगण्यात येत आहे कि यावर्षीच्या शेवटी म्हणजे डिसेंबर पर्यंत कंपनी आपला नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणू शकते. तसेच Jio 5G phone साठी पुढल्या वर्षीचा 2021 ची वाट बघावी. जियोचा आगामी अँड्रॉइड स्मार्टफोन 4Gला सपोर्ट करेल आणि याची किंमत 4,000रुपयांच्या आसपास असेल. बातमी नुसार Jio ची योजना पुढच्या दोन वर्षांमध्ये 200 मिलियन स्मार्टफोन बनवण्याची आहे.

Jio 5G Phone

आता पर्यंत जे लीक समोर आले आहेत त्यानुसार फोन मध्ये 5 इंचापेक्षा मोठी स्क्रीन मिळू शकते. यूजर फ्रेंडली असल्यामुळे या फोन मध्ये शार्टकट गूगल असिस्टेंट बटन दिला जाऊ शकतो. फोन अँड्रॉइड गो ओएस वर लॉन्च होऊ शकतो आणि त्यासाठी फोन मध्ये 2 जीबी पर्यंतचा रॅम दिला जाऊ शकतो. आशा आहे कि फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट कमीत कमी 256 जीबी पर्यंतचा असेल. तसेच वीडियो कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सल पर्यंतचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी जियो 5जी फोन मध्ये 3,000एमएएच पर्यंतची बॅटरी दिली जाऊ शकते. या फोन मध्ये भारतातील क्षेत्रीय भाषांना सपोर्ट पण दिला जाऊ शकतो.

Reliance Jio ने अधिकृतपणे वर घोषणा केली आहे कि कंपनीचा 5G नेटवर्क तयार आहे आणि भारतात 5जी स्पेक्ट्रम उपलब्ध होताच याची सुरवात करेल. आशा आहे कि 2021 पर्यंत भारतात 5जी स्पेक्ट्रम लिलावासाठी उपलब्ध होईल आणि त्यानंतर सर्विस पण सुरु होईल. 5जी ची घोषणा करताना अंबानीनी स्पष्टपणे सांगितले होते कि जियो 5जी नेटवर्क पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ असेल. त्याचबरोबर त्यांनी Google सह मिळून स्वतःचा 5G Smartphone बनवण्याचे पण काम चालू आहे असे सांगितले. कंपनीने फोनचे नाव तर सांगितले नाही पण असे सांगितले कि हा फोन Made In India असेल.

The post Jio 5G phone ची किंमत असेल 2,500 रुपयांच्या आसपास, पुन्हा बदलेल भारताचा मोबाईल बाजार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-5g-phone-price-in-india-could-rs-2500-jio-android-smartphone-launch/feed/ 0