खेळ खल्लास! 200MP कॅमेरा आणि दर्जेदार स्पेक्ससह येत आहेत Xiaomi 12T आणि 12T Pro; लाँच डेटची घोषणा

4 October Xiaomi 12T And Xiaomi 12T Pro Launch Date

गेले कित्येक दिवस चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या 12T सीरिजचे दोन स्मार्टफोन्स त्यांच्या स्पेसिफिकेशन्समुळे चर्चेत आहेत. आता आपल्या फॅन्सना सरप्राइज देत कंपनीनं 4 ऑक्टोबरच्या लाँच इव्हेंटची घोषणा केली आहे. यादिवशी कंपनी आपली शाओमी 12टी सीरीज सादर करणार आहे ज्या अंतर्गत Xiaomi 12T आणि Xiaomi 12T Pro स्मार्टफोन लाँच होतील. शाओमी 12टी प्रो 5जी 200MP Camera Phone असेल, अशी चर्चा आहे. या शाओमी फोन्सच्या लाँच डेटसह व स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे आहे.

Xiaomi Launch Event

शाओमी 12टी आणि 12टी प्रो स्मार्टफोन्स कंपनी येत्या 4 ऑक्टोबरला लाँच करणार आहे. हा Xiaomi Launch October 2022 Event म्यूनिकमध्ये होईल ज्याचे थेट प्रक्षेपण जगभरात केलं जाईल. हा लाँच इव्हेंट भारतीय वेळेनुसार संध्यकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 4 ऑक्टोबरला Xiaomi’s first Redmi-branded tablet Redmi Pad आणि Xiaomi Smart Band 7 Pro देखील लाँच होऊ शकतात. हे देखील वाचा: भन्नाट! दोन-दोन सेल्फी कॅमेरे आणि 12GB रॅमसह Xiaomi Civi 2 लाँच; फ्रंटला देखील मिळतोय फ्लॅश

4 October Xiaomi 12T And Xiaomi 12T Pro Launch Date

Xiaomi 12T आणि 12T Pro स्पेसिफिकेशन्स

शाओमी 12टी प्रो के फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या माहितीनुसार हा मोबाइल फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 चिपसेटवर लाँच केला जाईल. हा प्रोसेसर स्मार्टफोन मोबाइल मार्केटमधील सर्वात पावरफुल आणि फास्ट चिपसेटपैकी एक आहे. तर शाओमी 12टी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो.

Xiaomi 12T Pro 200 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लाँच होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार हा सॅमसंग एचपी 1 सेन्सर असेल. Xiaomi 12T मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळू शकतो. तसेच दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो.

4 October Xiaomi 12T And Xiaomi 12T Pro Launch Date

अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता, शाओमी 12टी मध्ये 6.7 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले तसेच शाओमी 12टी प्रो मध्ये 6.67 इंचाची अ‍ॅमोलेड स्क्रीन मिळू शकते. दोन्ही मोबाइल फोन्सची स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. तसेच Xiaomi 12T 67वॉट फास्ट चार्जिंग आणि 12T Pro मॉडेलमध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त अँड्रॉइड टॅबलेट! नोकिया-रियलमीला धोबीपछाड देण्यासाठी Redmi Pad 4G मैदानात

मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही शाओमी स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केले जातील. Xiaomi 12T 8GB RAM + 128GB storage आणि 8GB RAM + 256GB storage व्हेरिएंटमध्ये मार्केटमध्ये येऊ शकतो. तर Xiaomi 12T Pro 8GB RAM + 256GB storage आणि 12GB RAM + 256GB storage व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here