लीक फार्मवेयरमधून Jio Phone 5G च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

भारतात लवकरच 5G मोबाइल सर्व्हिस (5G Service) सुरु होऊ शकते. यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव झाला आहे, टेलिकॉम Jio आणि Airtel सारख्या टेलिकॉम ऑपरेटर्सनी पुढील महिन्यात सर्व्हिस लाइव्ह करण्याची तयारी केली आहे. परंतु मोठ्याप्रमाणावर 5G चा प्रसार करण्याच्या मार्गात एक मोठा अडथळा आहे तो म्हणजे महागडे 5G स्मार्टफोन्स. परंतु आता यावर देखील भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Jio नं उपाय शोधला आहे तो म्हणजे Jio Phone 5G.

रिलायन्स जियो (Jio) सर्वप्रथम आपलं 5G Network लाइव्ह करण्यासोबतच स्वस्त 5जी स्मार्टफोन म्हणजे Jio Phone 5G सादर करण्याची योजना बनवत आहे. अलीकडेच Jio 5G Phone ची Price समोर आली होती, तर आता लीक फर्मवेयरच्या माध्यमातून Jio Phone 5G चे Specifications समोर आले आहेत. डेव्हलपर Kuba Wojciechowski यांनी 91mobiles ला एक्सक्लूसिव्हली माहिती दिली आहे.

Jio Phone 5G Specifications Exclusive 5000mAh Battery 13MP Camera Know More Details

Jio Phone 5G

डेव्हलपर Kuba Wojciechowski यांनी आम्हाला फर्मवियरचे स्क्रिनशॉट दिले आहेत, ज्यात जियोच्या 5जी फोनच्या फीचर्सची माहिती आहे. त्यानुसार हा फोन ‘ganga’ कोडनेम सह लिस्टेड आहे, ज्याचा मार्केटिंग नाव Jio Phone True 5G असू शकतं. तसेच लिस्टिंगमध्ये फोनचा मॉडेल नंबर LS1654QB5 असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त ओप्पो स्मार्टफोनमध्ये मिळणार 7GB रॅम; OPPO A17k चे फुल स्पेसिफिकेशन आणि फीचर्स लीक

जियो 5G फोनचे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 6.5-inch HD+ 90Hz LCD panel
  • 4GB LPDDR4X RAM
  • Snapdragon 480 SoC
  • 5,000mAh battery, 18W charging
  • 13MP + 2MP dual rear camera
  • 8MP selfie shooter
  • Android 12

जियो फोन 5जी फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले, 90Hz रिफ्रेश रेट असू शकतो. तसेच, स्क्रीनचे रिजोल्यूशन 1600×720 पिक्सल असू शकते. त्याचबरोबर, फोन Snapdragon 480 प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो, जोडीला 4GB LPPDDR4X RAM आणि 32GB स्टोरेज दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: खेळ खल्लास! 200MP कॅमेरा आणि दर्जेदार स्पेक्ससह येत आहेत Xiaomi 12T आणि 12T Pro; लाँच डेटची घोषणा

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. या सेटअपमधील प्रायमरी कॅमेरा 13MP चा आणि एक 2MP चा मॅक्रो सेन्सर दिला जाऊ शकतो. हा फोन Android 12 वर चालू शकतो. तसेच फोनमध्ये सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी Jio Phone True 5G मध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. कनेक्टिव्हिटी ऑप्शनसाठी फोनमध्ये वाय-फाय आणि ब्लूटूथ सपोर्ट मिळू शकतो.

Jio Phone 5G Price

काही दिवसांपूर्वी Counterpoint Research च्या रिपोर्टमधून जियोफोन 5जी ची किंमत लीक झाली होती. त्यानुसार Jio चा 5G स्मार्टफोन 8,000 ते 12,000 रुपयांमध्ये बाजारात येऊ शकतो. ही प्राइस रेंज पाहता असा अंदाज लावला जात आहे की Jio Phone 5G एकापेक्षा जास्त व्हेरिएंट्समध्ये बाजारात येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here