Jio Phone - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 26 Aug 2022 04:40:06 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 2,099 मध्ये स्वस्त 4G फिचर फोन itel Magic X लाँच; Jio Phone होणार बाजारातून हद्दपार? https://www.91mobiles.com/marathi/4g-feature-phones-itel-magic-x-and-magic-x-play-launched-in-india-jio-phone-competition/ https://www.91mobiles.com/marathi/4g-feature-phones-itel-magic-x-and-magic-x-play-launched-in-india-jio-phone-competition/#respond Fri, 26 Aug 2022 04:40:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12505 बजेट स्मार्टफोन बनवणारी मोबाइल कंपनी itel नं आज भारतीय बाजारात दोन नवीन 4G Feature Phones सादर केले आहेत. ये दोन्ही KeyPad Mobile Phone itel Magic X आणि itel Magic X Play नावानं भारतात लाँच झाले आहेत. या दोन्ही आयटेल मोबाइल फोन्सची सर्वात मोठी खूबी म्हणजे हे dual 4G VoLTE सह येतात. त्यामुळे हे फोन भारतातील […]

The post 2,099 मध्ये स्वस्त 4G फिचर फोन itel Magic X लाँच; Jio Phone होणार बाजारातून हद्दपार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
बजेट स्मार्टफोन बनवणारी मोबाइल कंपनी itel नं आज भारतीय बाजारात दोन नवीन 4G Feature Phones सादर केले आहेत. ये दोन्ही KeyPad Mobile Phone itel Magic X आणि itel Magic X Play नावानं भारतात लाँच झाले आहेत. या दोन्ही आयटेल मोबाइल फोन्सची सर्वात मोठी खूबी म्हणजे हे dual 4G VoLTE सह येतात. त्यामुळे हे फोन भारतातील JioPhone ला थेट टक्कर देते आहेत.

itel Magic X आणि Magic X Play ची किंमत

नव्या 4G Feature Phones ची प्राइस पाहता itel Magic X Play भारतात 2,099 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे तसेच itel Magic X फीचर फोन 2,299 प्राइसवर लाँच झाला आहे. आयटेल मॅजिक एक्स प्ले Midnight Black आणि Mint Green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. तर आयटेल मॅजिक एक्स Midnight Black आणि Pearl White कलरमध्ये विकत घेता येईल. हे दोन्ही कीपॅड असलेले 4जी मोबाइल फोन ऑनलाईन व ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Jio Phone ला टक्कर

मुकेश अंबानीद्वारे लाँच करण्यात आलेल्या Jio Phone हा 4G Feature Phone बाजारात खूप चर्चेत होता. या फिचर फोनची विक्रमी विक्री झाली होती परंतु सध्या जियोफोनचा खूप कमी स्टॉक बाजारात येत आहे. या फोनमध्ये फक्त रिलायन्स जियो सिमचा वापर करता येतो. त्यामुळे हे नवीन 4जी फीचर फोन आल्यामुळे जियोफोन बाजारातून हद्दपार देखील होऊ शकतो, हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

itel Magic X आणि Magic X Play चे स्पेसिफिकेशन्स

iTel Magic X मध्ये कंपनीनं 2.4 इंचाची 3डी कर्व्ड स्क्रीन दिली आहे जो एक क्यूवीजीए डिस्प्ले आहे. तर दुसरीकडे iTel Magic X Play 1.77 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. दोन्ही फोन्समध्ये स्क्रीनच्या वरच्या बाजूला स्पिकर आहे तर खाली टी9 कीपॅड देण्यात आला आहे. या 4जी फीचर फोन्समध्ये राउंड शेप नेव्हिगेशन बटन मिळतं तसेच म्यूजिक शॉर्टकट बटन आहे. LetsChat हे आयटेल मोबाइल्सचं खास फीचर आहे जे फ्री व्हॉइस आणि मेसेज सर्व्हिस देतं.

आयटेल 4जी फीचर फोन 48 एमबी रॅमला सपोर्ट करतो सोबत 128 एमबी की इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही मोबाइल फोन्समध्ये 64 जीबी मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. कंपनीनुसार हे कीपॅड फोन 2000 कॉन्टेक्ट, 500 एसएमएस आणि 250 एमएमएस साठवून ठेऊ शकतात. या फीचर फोनमध्ये डिस्प्ले आणि कीपॅड दरम्यान एलईडी लाइट आहे जी नोटिफिकेशन्स आल्यावर चमकते.

itel Magic X आणि Magic X Play ड्युअल सिम फोन आहेत तसेच दोन्ही सिम स्लॉटमध्ये 4G SIM चा वापर केला जाऊ शकतो. तर प्रोसेसिंगसाठी हे 4जी फीचर फोन टी107 चिपसेटवर काम करतात. पावर बॅकअपसाठी मॅजिक एक्स मध्ये 1,200एमएएच तर मॅजिक एक्स प्ले मध्ये 1,900एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या मोबाइल फोन्समध्ये वीजीए कॅमेरा, 3.5एमएम जॅक, वायरलेस एफएम व ब्लूटूथ 4.2 चे ऑप्शन्स आहेत.

The post 2,099 मध्ये स्वस्त 4G फिचर फोन itel Magic X लाँच; Jio Phone होणार बाजारातून हद्दपार? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4g-feature-phones-itel-magic-x-and-magic-x-play-launched-in-india-jio-phone-competition/feed/ 0
Jio ने आणला बंपर इंटरनेट प्लान, 140 दिवसांत मिळेल 106GB डेटा, सुरुवाती किंमत 22 रुपये https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-data-recharge-launched-with-up-to-2gb-daily-data-28-days-validity/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-data-recharge-launched-with-up-to-2gb-daily-data-28-days-validity/#respond Mon, 01 Mar 2021 12:36:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10222 नवीन Jio Phone डेटा वाउचर 22 रुपये, 52 रुपये, 72 रुपये, 102 रुपये आणि 152 रुपयांमध्ये सादर केले गेले आहेत.

The post Jio ने आणला बंपर इंटरनेट प्लान, 140 दिवसांत मिळेल 106GB डेटा, सुरुवाती किंमत 22 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio ने मोठ्या कालावधीनंतर आपल्या ग्राहकांसाठी दोन नवीन वर्षाचे प्लान सादर केले होते. जियोचे हे प्लान त्यांच्या 2जी मुक्त भारत अभियाना भाग होते. आता कंपनीने Jio Phone युजर्ससाठी डेटा प्लान सादर केले आहेत. या डेटा प्लानमध्ये युजर्ससाठी एकूण 5 प्लान्स सादर करण्यात आले आहेत. या नवीन Jio Recharge Data Voucher ची किंमत 22 रुपयांपासून सुरु होत आहे आणि 152 रुपयांपर्यंत हे प्लान आहेत. या नवीन रिचार्जची माहिती टेक वेबसाइट प्राइस बाबाने दिली आहे.

जियो फोनचे पाच नवीन डेटा प्लान

लक्षात असू द्या कि हे डेटा वाउचर फक्त Jio Sim मध्ये काम करतील. नवीन Jio Phone डेटा वाउचर 22 रुपये, 52 रुपये, 72 रुपये, 102 रुपये आणि 152 रुपयांमध्ये सादर केले गेले आहेत. डेटा वाउचर असल्यामुळे यात तुम्हाला फक्त डेटा मिळतो. डेटा व्यतिरिक्त या प्लानमध्ये युजर्सना कोणताही फायदा दिला जात नाही. या सर्व पाच प्लानची वैधता 28 दिवस आहे.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी असलेला स्वस्त Samsung Galaxy M12 फोन, 11 मार्चला होईल भारतात लॉन्च

Jio च्या या प्लान मध्ये किती डेटा मिळेल?

22 रुपये आणि 52 रुपयांच्या Jio Phone डेटा वाउचर मध्ये क्रमश: 2GB आणि 6GB हाई स्पीड डेली डेटा मिळतो. या दोन्ही प्लानची वैधता 28 दिवस आहे. 72 रुपयांच्या जियो फोन डेटा प्लानमध्ये 500MB डेटा डेली मिळेल. तर 102 रुपये आणि 152 रुपयांच्या जियो फोन डेटा वाउचर मध्ये 1GB व 2GB डेटा प्रतिदिन मिळेल.

या प्लान मध्ये कॉलिंग मिळेल का?

वर सांगितल्याप्रमाणे हे फक्त डेटा प्लान आहेत. कंपनीने हे 5 प्लान फक्त डेटा सोबतच सादर केले आहेत. याचा अर्थ असा आहे कि युजर्सना रिचार्जमध्ये कोणतीही कॉलिंग मिळणार नाही.

जियो फोनचे नवीन वार्षिक प्लान

सर्वप्रथम 1,999 रुपयांची ऑफर पाहता यात युजर्सना एक Jio Phone दिला जाईल. या फोन सोबत 24 महीने (दोन वर्ष) अनलिमिटेड कॉलिंगसह दरमहिन्याला 2जीबी हाईस्पीड 4जी डेटा मिळेल. याचा अर्थ असा आहे कि एकदा 2,000 रुपये दिल्यानंतर दोन वर्ष युजर्सना एक पण रुपयांचा रिचार्ज करावा लागला नाही.

हे देखील वाचा : वनप्लसने केली मोठी तयारी, 8 मार्चला होईल OnePlus 9 सीरीज लॉन्च, जाणून घ्या सर्वकाही

दुसऱ्या प्लानची किंमत 1499 रुपये आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जियो फोनसह 1 वर्ष पर्यंतची अनलिमिटेड कॉलिंगसह 2 जीबी प्रतिमाह डेटा दिला जाईल. इतकेच नव्हे तर ऑफरमध्ये जियो फोन ग्राहकांचा विचार पण करत कंपनीने सांगितले आहे कि जुने युजर्स 750 रुपये देऊन एक वर्ष रिचार्ज ना करता राहू शकतात. या प्लान मध्ये युजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 2जीबी प्रतिमाह डेटा दिला जाईल.

The post Jio ने आणला बंपर इंटरनेट प्लान, 140 दिवसांत मिळेल 106GB डेटा, सुरुवाती किंमत 22 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-data-recharge-launched-with-up-to-2gb-daily-data-28-days-validity/feed/ 0
JioPhone नंतर अंबानींचा नवीन डाव, येत आहे अजून एक 4G फीचर फोन, किंमत असेल 1,000 पेक्षा कमी https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-re-launch-4g-feature-phone/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-re-launch-4g-feature-phone/#respond Thu, 24 Dec 2020 13:46:01 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9445 नवीन जियो 4जी फीचर फोनची माहिती ईटी रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टनुसार रिलायंस जियो भारतीय बाजारात अजून एक 4जी फीचर फोन लाॅन्च करण्याची योजना बनवत आहे.

The post JioPhone नंतर अंबानींचा नवीन डाव, येत आहे अजून एक 4G फीचर फोन, किंमत असेल 1,000 पेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio बद्दल काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती कि कंपनी आपल्या नवीन अँड्रॉइड स्मार्टफोन वर काम करत आहे जो खूप कमी किंमतीत लाॅन्च केला जाईल. या फोनची किंमत 50 डाॅलर सांगण्यात आली होती, जी 3,500 रुपयांच्या आसपास आहे. आता माहिती समोर येत आहे कि रिलायंस जियो नवीन वर्षात म्हणजे 2021 मध्ये एक 4G फीचर फोन पण लाॅन्च करेल जो Jio Phone नावाने बाजारात येईल. कंपनीच्या या नवीन मोबाईल फोनची किंमत 1,000 रुपयांपेक्षा पण कमी असेल जो जियो बेनिफिट्स सह विक्रीसाठी उपलब्ध होईल.

हा नवीन जियो 4जी फीचर फोनची माहिती ईटी रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. रिपोर्टनुसार रिलायंस जियो भारतीय बाजारात अजून एक 4जी फीचर फोन लाॅन्च करण्याची योजना बनवत आहे. हा मोबाईल फोन 2021 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे मार्चच्या आधी मार्केट मध्ये येईल. या नवीन Jio Phone फोन बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि याची किंमत आधीच्या जियोफोन पेक्षा थोडी जास्त असेल पण याची किंमत 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल.

Jio Phone बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा डिवायस पण 4G VoLTE कनेक्टिविटी सर्विस सह लाॅन्च केला जाईल. रिपोर्टनुसार हा नवीन मोबाईल फोन नसून कंपनी जुना Jio Phone रिलाॅन्च केला जाईल. फोन रिलाॅन्च करण्यामागे कंपनीचा उद्देश नवीन ग्राहक जोडण्याचा आहे. तसेच सांगण्यात आले आहे कि जियो फोन पुन्हा लाॅन्च करून कंपनी देशात ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देऊ इच्छितो.

हे देखील वाचा : रियलमीचा 5G फोन Realme X7 Pro येत आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला लिस्ट

Jio SmartPhone

रिलायंस जियोकडून मुकेश अंबानींनी सांगितले आहे कि कंपनी Google सह भागेदारी अंतगर्त नवीन अँड्रॉइड आधारित स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम बनवत आहे. हि घोषणा करताना अंबानींनी स्पष्टपणे जियो स्मार्टफोनचे नाव घेतले नाही पण कंपनी 5G आणणार असल्याचे आणि अँड्रॉइड ओएस बनवणार असल्याच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे कि येत्या काही दिवसांत कंपनी कमी किंमत असलेला स्वस्त Jio 5G SmartPhone पण भारतीय बाजारात लॉन्च करेल.

भारतात 5G सर्विस आणण्याच्या बाबतीत मुकेश अंबानींनी हि ‘आत्मनिर्भर भारत’ ला समर्पित करत सांगितले आहे कि कंपनी द्वारे विकसित केली जाणारी 5जी सर्व्हिस पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ असेल. अंबानींनी म्हटले आहे कि 5जी स्पेक्ट्रम उपलब्ध होताच, याचे ट्रायल सुरु होतील. फील्ड मध्ये वापरण्यासाठी पुढल्या वर्षी पर्यंत हि टेक्नॉलॉजी तयार केली जाऊ शकते. 5G बाबत आकाश अंबानींनी सांगितले कि हि टेक्नोलॉजी रिलायंस कर्मचाऱ्यांनी बनवली आहे.

The post JioPhone नंतर अंबानींचा नवीन डाव, येत आहे अजून एक 4G फीचर फोन, किंमत असेल 1,000 पेक्षा कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-phone-re-launch-4g-feature-phone/feed/ 0
रिलायंस करत आहे का Jio Phone lite ची तयारी? नाही मिळत आहे Jio Phone चा स्टॉक https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-goes-out-of-stock-is-company-planing-to-launch-jio-phone-3/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-goes-out-of-stock-is-company-planing-to-launch-jio-phone-3/#respond Fri, 28 Feb 2020 14:00:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6705 जियोफोनचा स्टॉक तर दिला जात आहे पण मोठ्या अटींसह

The post रिलायंस करत आहे का Jio Phone lite ची तयारी? नाही मिळत आहे Jio Phone चा स्टॉक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंसने साल 2017 मध्ये भारताचा पाहील 4जी फीचर फोन Jio Phone लॉन्च केला होता आणि फोनने विक्रीचे सर्व विक्रम मोडले होते. अजूनही फोनला मागणी आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या फोन संबंधित लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शहरांमध्ये रिटेल स्टोर वरून Jio Phone गायब झाला आहे. सर्वात खास बाब अशी आहे कि जवळपास एका महिन्यांपासून जास्त काळ झाला आहे आणि अजूनही स्टॉक दिला जात नाही. याबाबत जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही भारतातील अनेक शहरांमध्ये याची चौकशी केली आणि आम्हाला हि बातमी खरी असल्याचे आढळून आले. तसेच धक्कादायक माहिती पण यातून समोर आली.

सर्वात आधी आम्ही पुण्यातून माहिती घेतली आणि तिथून आम्हाला अशी माहिती देण्यात आली कि ‘गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून Jio Phone स्टॉकमुळे दुकानदार हैराण आहेत. जवळपास एक महिन्यापूर्वी काही यूनीट देण्यात आले होते पण आता तर अजिबात मिळत नाहीत. परिस्थिती अशी आहे कि जियोफोनसाठी ब्लॅक मार्केटिंग सुरु झाली आहे. ज्यांच्याकडे जुना स्टॉक आहे ते एका फोनसाठी 2,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे मागत आहेत.’

याबाबत आम्ही गुजरात मध्ये कॉल केला तेव्हा तिथून पण रोचक माहिती मिळाली. रिटेलर्स म्हणाले कि ‘एका महिन्यापासून पण जास्त काळ उलटून गेला आहे आणि आम्हाला Jio Phone चा स्टॉक दिला जात नाही. कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर्स येतात आणि आम्हाला सांगतात कि फोन बंद होणार आहे आता स्टॉक येणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे जुना स्टॉक आहे ते फोन ब्लॅकने विकत आहेत.’

अशाचप्रकारे आम्ही जेव्हा झारखंड आणि बिहार मध्ये कॉल केला तेव्हा तिथून पण स्टॉक नसल्याचे सांगण्यात आले. आम्हाला रिटेलर्सनी सांगितले कि ‘गेल्या एक महिन्यापासून पण जास्त काळ जियोफोन येत नाही आहे. कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर्स म्हणत आहेत कि हा फोन बंद होणार आहे आणि काही महिन्यांमध्ये कंपनी एक स्वस्त Jio Phone आणण्याची तयारी करत आहे. हा कमी रेंजचा एक फोन असेल जो फक्त कॉलिंगसाठी वापरता येईल. याला Jio Phone Lite असे नाव दिले जाऊ शकते.’

विशेष म्हणजे याबाबत सर्वात आधी 91mobiles ने माहिती दिली होती कि कंपनी स्वस्त जियोफोन आणण्याची तयारी करत आहे ज्याला Jio Phone Lite नावाने सादर केला जाऊ शकतो. कंपनी याबाबत खूप आधीपासून स्टोर वर सर्वे करत आहे.

तसेच जियोफोन स्टॉकबद्दल जेव्हा आम्ही दिल्ली मध्ये रिटेलर्स कडून माहिती घेतली तेव्हा तिथे वेगळीच गोष्ट चालू होती. करोलबागच्या रिटेलर्सनी सांगितले कि ‘जियोफोनचा स्टॉक तर दिला जात आहे पण मोठ्या अटींसह. जर तुम्ही 10 जियोफोन घेतले तर तुम्हाला 10 माइक्रोमॅक्स भारत फोन घ्यावे लागतील ज्यांची किंमत जवळपास 2,000 रुपये आहे.’

दिल्लीनंतर मुंबई मध्ये पण आम्ही अनेक दुकानांमधून माहिती घेतली आणि तिथे पण रिटेलर्सनी सांगितले कि ‘Jio Phone चे डिस्ट्रीब्यूटर्स येऊन सांगत आहेत कि हा फोन बंद होणार आहे आणि त्यामुळे स्टॉक दिला जात नाही.’

Jio Phone बद्दल जेव्हा आम्हाला अशी माहिती मिळू लागली तेव्हा आम्ही कंपनीद्वारे पण स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ईमेल पण केला आहे पण अजूनही कोणतेही उत्तर मिळाले नाही. जर कंपनीकडून उत्तर आले तर आम्ही अपडेट करू.

कंपनी से जवाब नहीं आने वर हमने दिल्ली के एक Jio एक्जिक्यूटिव से बात की आणि उन्होंने नाव न बताने की शर्त वर बताया कि ‘जियोफोन का स्टॉक कम आहे आणि कंपनी काही नवीन लाने का प्लान कर रही आहे इसी वजह से पुराने मॉडल को हटाने का काम चल रहा आहे.’

तसेच जेव्हा याबाबत आम्ही Reliance Jio च्या दुसऱ्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली तेव्हा त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर खास बातमी सांगितली. ते म्हणाले कि ‘Jio Phone अजून बंद झाला नाही. स्टॉकची समस्या आहे आणि त्यामागे अनेक कारणे आहेत, ज्यात कोराना वायरस पण एक कारण आहे. मटेरियल सप्लाई चीन वरून होते आणि सर्वांना माहित आहे कि त्याचा काय परिणाम झाला आहे. तसेच नवीन फोन येण्याची खबर असल्यामुळे कंपनी जुन्या फोन वर लक्ष कमी करू शकते. याव्यतिरिक्त तिसरे कारण सप्लाई चेन मध्ये मागे पुढे गोष्टी होत असतात.’

नेमके काय होत आहे याबाबत कोणीही निश्चित माहिती दिली नाही फक्त काही ठिकाणी Jio Phone Lite ची बातमी मिळाली जी आम्ही आधीच सांगितली आहे. परंतु एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि ज्याप्रकारे जियोफोनची परिस्थिती समोर येत आहे त्यावरून कंपनी कडे काही तरी प्लान आहे आणि कदाचित येत्या काही दिवसांत नवीन घोषणा केली जाऊ शकते.

विशेष म्हणजे दरवर्षी जुलै किंवा ऑगस्ट मध्ये रिलायंसची एजीएम मीटिंग होते आणि यात कंपनी काहीना काही नवीन करते. त्यामुळे आशा आहे कि यावेळी पण जियो काही खास करणार आहे आणि मुकेश अंबानी पुन्हा लोकांना हैराण करू शकते.

The post रिलायंस करत आहे का Jio Phone lite ची तयारी? नाही मिळत आहे Jio Phone चा स्टॉक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-goes-out-of-stock-is-company-planing-to-launch-jio-phone-3/feed/ 0
Exclusive: Jio आणू शकते Jio Phone Lite, किंमत असेल 400 रुपयांपेक्षा कमी- सोर्स https://www.91mobiles.com/marathi/jio-to-launch-jio-phone-lite-costs-less-than-rs-400/ https://www.91mobiles.com/marathi/jio-to-launch-jio-phone-lite-costs-less-than-rs-400/#respond Mon, 30 Dec 2019 14:41:50 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6155 जियोफोन लाइट जर आला तर ते लोक याला पहिली पसंती देतील ज्यांना अफोर्डेबिलिटी, दीर्घ आयुष्य आणि फक्त कॉलिंग हवी आहे.

The post Exclusive: Jio आणू शकते Jio Phone Lite, किंमत असेल 400 रुपयांपेक्षा कमी- सोर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वर्ष 2017 जून मध्ये मुकेश अंबानी यांनी जेव्हा जियोच्या 4जी फीचर फोन Jio Phone ची घोषणा केली होती तेव्हा संपूर्ण टेलीकॉम विश्वात हलचल निर्माण झाली होती. आज जवळपास अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा आम्हाला जियो संबंधित अशी एक मोठी बातमी मिळाली आहे. 91मोबाईल्सला एक्सक्लूसिव बातमी मिळाली आहे कि कंपनी Jio Phone च्या स्वस्त वेरियंट Jio Phone Lite ची तयारी करत आहे. या फोनच्या फीचर्सची माहिती आमच्याकडे नाही पण कंपन ने जियो पार्टनर कडे यासाठी सर्वे केला आहे आणि तिथून आम्हाला हि बातमी मिळाली आहे. हा फोन लॉन्च केलाच जाईल असा दावा करता येणार नाही पण असे म्हणता येईल कि कंपनी काहीतरी तयारी करत आहे.

लक्षात घेण्याची बाब म्हणजे जियो 4जी विशेष करून इंटरनेट साठी ओळखला जातो. त्यामुळे फीचर फोन आणि तोही फक्त कॉलिंग साठी ऐकून आम्ही पण हैराण झालो. त्यामुळे जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही दोन वेगवेगळ्या सोर्सकडे चौकशी केली आणि दोन्ही ठिकाणी आम्हाला जवळपास एकसारखे उत्तर मिळाले.

कसा असेल Jio Phone Lite

कंपनीने केलेल्या सर्वे मध्ये जियो पार्टनर कडून आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार जियोफोन प्रमाणे Jio Phone Lite पण एक कीपॅड असलेला फोन असेल. भारतीय बाजारात कंपनी हा 500 रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये सादर करणार आहे. माहितीनुसार या फोनची किंमत 399 रुपयांच्या आसपास असू शकते. खास बाब शी कि या फोन मध्ये इंटरनेट सेवा नसेल. कंपनी हा फक्त कॉलिंगसाठी सादर करू शकते. रिलायंस जियो जियोफोन लाइट साठी 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा मासिक कॉलिंग प्लान सादर करू शकते.

हा फोन कधी भारतीय बाजारात येईल याची आम्हाला माहिती मिळाली नाही पण प्रत्येकवेळी कंपनी आपल्या Reliance AGM मीटिंग मध्ये नवीन फोन्सची घोषणा करते आणि त्यामुळे आशा आहे कि Reliance AGM 2020 मध्ये याची घोषणा केली जाऊ शकते.

Jio Phone Lite ची गरज आहे का

Mukesh Ambani ने जियोफोन लॉन्चच्या वेळी माहिती दिली होती याच्या माध्यमातून कंपनी त्या लोकांपर्यंत इंटरनेट पोचवू पाहत आहे ज्यांनी आतापर्यंत स्मार्टफोनचा वापर केला नाही. तसेच अशी पण माहिती दिली होती कि कंपनी दार महिन्याला 5 मिलियन Jio Phone बनवू इच्छित आहे. जियोफोनच्या लॉन्च नंतर लोक उत्साहित होते. ऑक्टोबर 2019 मध्ये आलेल्या एका रिपोर्टनुसार कंपनीने आतापर्यंत 70 मिलियन अर्थात 7 कोटी पेक्षा जास्त जियोफोन विकले आहेत आणि अजूनहि विकत आहे.

रिलायंस जियोच्या सर्विस बद्दल बोलायचे तर 5 सप्टेंबर 2016 पासून अधिकृतपणे हिची सुरवात झाली होती आणि फक्त तीन वर्षात 35 कोटीपेक्षा जास्त यूजर सह भारतात कंपनी नंबर एक मोबाईल सेवा प्रदाता बनली. आणि जियोला नंबर एक बनवण्यात जियोफोनचे पण मोठे योगदान होते.

परंतु अजूनही अश्या यूजरची मोठी संख्या आहे जे इंटरनेटशी जास्त संबंध ठेवत नाहीत आणि कॉलिंग वर अंवलंबून राहू इच्छितात. त्या लोकांना जियोशी जोडण्यासाठी Jio Phone Lite एक चांगला पर्याय ठरू शकतो आणि कदाचित कंपनीचा पण असाच प्रयत्न आहे. खूप कमी किंमतीत फोन आणि मामुली शुल्क घेऊन कॉलिंग देऊन यूजर्सना एक चांगला पर्याय मिळावा जेणेकरून आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत रिलायंस जियो अजून पुढे जाऊ शकेल.

कोण असतील Jio Phone Lite चे यूजर

स्मार्टफोनचा बाजार वेगाने वाढत आहे यात दुमत नाही पण भारतात अजूनही फीचर फोन यूजरची मोठी संख्या आहे जे खास करून कॉलिंग वर अवलंबून राहतात. अलीकडेच आलेल्या काउंटरप्वाइंटच्या एका रिपोर्टनुसार अजूनही भारतात 400 मिलियन पेक्षा जास्त फीचर फोन यूजर आहेत आणि जियोफोन लाइट जर लॉन्च झाला तर हे यूजर केंद्रस्थानी असतील.

याबाबत टेकआर्कचे फाउंडर व चीफ ऍनालिस्ट फैशल कावूसा यांनी लाइवमिंटला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते कि “अजूनही अनेक यूजर आहेत जे स्मार्टफोन सहज वापरू इच्छित नाहीत. त्यांना डिजिटल विश्वा पासून दूर राहायचे आहे आणि स्वतःला कॉलिंग पर्यंत मर्यादित ठेवू इच्छितात. हे लोक अजूनही फीचर फोन घेऊ इच्छितात. तसेच अफोर्डेबिलिटी आणि अनेक टिकाऊपणा फीचर फोनची खासियत आहे आणि यूजरचा एक गट आहे जो याकारणांमुळे पण फीचर फोन घेऊ इच्छितो.”

त्यामुळे जियो साठी इथे अजूनही एक मोठा बाजार आहे आणि जियोफोन लाइट जर आला तर ते लोक याला पहिली पसंती देतील ज्यांना अफोर्डेबिलिटी, दीर्घ आयुष्य आणि फक्त कॉलिंग हवी आहे.

Jio Phone चे स्पेसिफिकेशन

जियोफोन बद्दल बोलायचे तर हा फोन कंपनीने 2017 मध्ये लॉन्च केला होता. हा एक 4जी फीचर फोन आहे जो स्मार्ट फीचर्स सह येतो. यात तुम्हाला इंटरनेट व्यतिरिक्त वीडियो कॉलिंग, व्हाट्सऍप आणि यूट्यूब सारखे फीचर्स पण मिळतात. फोन मध्ये 2.4 इंचाची टीएफटी कलर स्क्रीन देण्यात आली आहे. फोन मध्ये 1गीगाहट्र्जचा डुअलकोर प्रोसेसर आहे आणि 512एमबी रॅम आहे. फोनची इंटरनल मेमरी 4जीबी आहे जी मेमरी कार्डने वाढवता येते.

कॅमेऱ्यासाठी जियोफोन मध्ये 2 एमपी चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी फ्रंटला वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. फोन मध्ये एफएफ रेडियो आणि म्यूजिक प्लेयर पण मिळेल. तसेच यात लाउडस्पीकर देण्यात आला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 2,000 एएमएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

The post Exclusive: Jio आणू शकते Jio Phone Lite, किंमत असेल 400 रुपयांपेक्षा कमी- सोर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-to-launch-jio-phone-lite-costs-less-than-rs-400/feed/ 0
Exclusive: नाही बंद होणार Jio Phone ची निर्मती, कंपनीने दिली 15 लाख युनिट्सची ऑर्डर https://www.91mobiles.com/marathi/reliance-will-not-stop-jio-phone-production-placed-15-lakh-additional-order/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-will-not-stop-jio-phone-production-placed-15-lakh-additional-order/#respond Thu, 26 Dec 2019 14:37:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6132 या फोनच्या जीवावर प्रतिस्पर्ध्यांना मत देऊ इच्छित आहे.

The post Exclusive: नाही बंद होणार Jio Phone ची निर्मती, कंपनीने दिली 15 लाख युनिट्सची ऑर्डर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मुकेश अंबानी यांच्या रिलायंस जियोने वर्ष 2017 मध्ये Jio Phone ची घोषणा केली होती आणि तेव्हा कंपनीने माहिती दिली होती कि प्रत्येक महिन्याला ते 5 लाख फोन विकतील. फोन लॉन्च झाल्यानंतर असेच झाले. हा जगात सर्वात जास्त विकला जाणारा फीचर फोन बनला. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार कंपनीने आता पर्यंत 70 मिलियन पेक्षा जास्त Jio Phone विकले आहेत. परंतु काही दिवसांपासून जियो रिटेलर्स मध्ये अफवा पसरवण्यात आली आहे कि कंपनीने जियोफोनचे प्रोडक्शन बंद करणार आहे. या मागील कारण म्हणजे जियो फोनचे शॉर्टेज.

गेल्या काही दिवसांपासून एंक राज्यांत जियोफोनचे शॉर्टेज आहे आणि रिटेलर्सनी वारंवार Jio Phone ची ऑर्डर देऊनही हा फोन उपलब्ध होत नव्हता. यामुळे रिटेलर्स मध्ये अशी अफवा पसरली कि जियोफोनचे प्रोडक्शन बंद होत आहे. तसेच या अफवांना कारणीभूत काही मीडिया रिपोर्ट्स पण होते. काही रिपोर्ट्स मध्ये दावा केला गेला होता कि कंपनी जियोफोनचे प्रोडक्शन बंद करणार आहे. पण हि बातमी पूर्णपणे खोटी आहे.

91मोबाईल्स कडे या फोन बद्दल एक्सक्लूसिव माहिती आहे. Jio Phone चे प्रोडक्शन अजून बंद झाले नाही. आम्हाला बातमी मिळाली आहे कि फोनचे शॉर्टेज आहे आणि ते कमी करण्यासाठी कंपनीने 15 लाख जियोफोन युनिट्सची ऑर्डर दिली आहे. यातील 3.50 लॉख यूनिटची निर्मती झाली आहे आणि हे रिलायंसच्या वेयर हाउस मध्ये पण आले आहेत. तसेच येत्या काही दिवसांत बाकी 11.50 लाख युनिट्स पण वेयर हाउस मध्ये येतील. पण रिटेलर्स पर्यंत पोचण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

सध्या कंपनीचा Jio Phone बंद करण्याचा कोणताही विचार नाही. भारतात 35 कोटी पेक्षा जास्त जियोफोन यूजर आहेत आणि भारतात रिलायंस जियोला नंबर एक सर्व्हिस प्रोव्हायडर बनवण्यात या फोनची भूमिका महत्वाची होती. पण पहिल्यासारखी लोकप्रियता राहिली नाही तरीही मागणी जास्त आहे. याचकारणामुळे रिलायंस अजूनही Jio Phone चे प्रोडक्शन बंद करू इच्छित नाही आणि या फोनच्या जीवावर प्रतिस्पर्ध्यांना मत देऊ इच्छित आहे.

Jio Phone लॉन्चच्या वेळी कंपनीने अशी माहिती दिली होती कि सुरवातीला हा इंपोर्ट केला जाईल पण नंतर मेड इन इंडिया होईल. 2018 पासून मेड इन इंडिया जियोफोन येण्यास सुरवात झाली होती पण कंपनीने कधीही या मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीचे नाव सांगतिले नाही. 91मोबाईल्स कडे जी बातमी आहे त्यानुसार या फोनची निर्मती नोएडा मधील एमसीएम टेलीकॉम करत आहे.

रिलायंस जियोफोन वीडियो

The post Exclusive: नाही बंद होणार Jio Phone ची निर्मती, कंपनीने दिली 15 लाख युनिट्सची ऑर्डर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-will-not-stop-jio-phone-production-placed-15-lakh-additional-order/feed/ 0
Jio ची दिवाळी अजूनही चालू, 699 रुपयांमध्ये JioPhone विकत घेण्याची ऑफर एक महीना अजून सुरु राहणार https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-announces-jio-phone-699-offer-extend-for-one-month-india-special-price/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-announces-jio-phone-699-offer-extend-for-one-month-india-special-price/#respond Fri, 01 Nov 2019 14:37:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5658 Reliance Jio ने गेल्या 2 वर्षात 7 कोटींपेक्षा पण जास्त फीचर फोन विकून नवीन रेकॉर्ड बनवला आहे.

The post Jio ची दिवाळी अजूनही चालू, 699 रुपयांमध्ये JioPhone विकत घेण्याची ऑफर एक महीना अजून सुरु राहणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Reliance Jio यूजर्स साठी हि दिवाळी खास होती. जियोने ब्रँडचा पहिला 4G फीचर फोन JioPhone कमी किंमतीत विकला होता. हा 4जी फीचर फोन कंपनीने 1500 रुपयांमध्ये लॉन्च केला होता, पण दिवाळी ऑफर अंतर्गत Reliance Jio ने JioPhone फक्त 699 रुपयांमध्ये विकला होता. दिवाळीचा सण तर गेला पण Jio ची दिवाळी अजूनही आहे. आपल्या यूजर्सना भेट देत Reliance Jio ने घोषणा केली आहे कि JioPhone ची हि ऑफर एका महिन्यासाठी वाढवत आहे.

Reliance Jio ने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनीने सादर केलेली JioPhone ऑफर आता एका महिन्यासाठी वाढवली आहे. म्हणजे आता जियो ग्राहक अजून एक महिना JioPhone फक्त 699 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे JioPhone ची हि दिवाळी ऑफर दसऱ्याला म्हणजे 2 ऑक्टोबरला सुरु झाली होती आणि दिवाळी पर्यंत म्हणजे 27 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्यात आली होती. पण आता आपल्या फॅन्स साठी Jio ने ‘Jio Phone Diwali 2019’ ऑफर एका महिन्यासाठी वाढवली आहे.

डेटाचा पण होईल फायदा

JioPhone आता 27 नोव्हेंबर पर्यंत फक्त 699 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या स्वस्त किंमतीसह जियो यूजर्स कंपनी कडून मिळणाऱ्या एक्स्ट्रा 4G इंटरनेट डेटाचा पण लाभ घेऊ शकतील. Reliance Jio कडून JioPhone ला रिचार्ज केल्यास यूजर्सना 700 रुपयांचे एक्स्ट्रा बेनिफिट मिळत आहेत. या अंतर्गत JioPhone विकत घेतल्यावर पुढील सात रिचार्ज पर्यंत अतिरिक्त 4जी इंटरनेट डेटा दिला जाईल. या 4G डेटाची किंमत 99 रुपये असेल आपोआप ग्राहकांच्या नंबर वर क्रेडिट होईल.

2 वर्षात विकले गेले 7 कोटी Jio Phone

Reliance Jio ने गेल्या 2 वर्षात 7 कोटींपेक्षा पण जास्त फीचर फोन विकून नवीन रेकॉर्ड बनवला आहे. हे आकडे Jio Phone आणि Jio Phone 2 दोघांचे आहेत. कंपनीने 2 वर्षात 7 कोटी Jio Phone विकून मोबाईल फोन सेलचा रेकॉर्ड तर बनवलाच सोबतच या दोन वर्षात Jio नेटवर्क सोबत 7 कोटी नवीन यूजर्स पण जोडले गेले. एकीकडे स्वस्तात 4G फोन मिळत असल्यामुळे अनेकांना Jio Phone आवडतो. तर Jio Phone मधील आर्कषक फीचर्स आणि My Jio App वर कंटेंटने लोकांना वेड लावले आहे.

Jio Phone

जियोफोन मध्ये 2.4-इंचाचा क्यूडब्ल्यूवीजीए (240×320 पिक्सल) डिस्प्ले आहे. तसेच यात 1.2 गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 डुअल कोर प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये 512 एमबी रॅम आणि इनबिल्ट स्टोरेज 4 जीबी आहे. फोटोग्राफी साठी मागे 2-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि आणि फ्रंट पॅनल वर वीजीए कॅमेरा आहे. जियो फोनची बॅटरी 2000 एमएएच आहे. कनेक्टिविटी फीचर मध्ये 4जी वीओएलटीई, ब्लूटूथ वी4.1, वाई-फाई, एनएफसी, एफएम रेडियो, जीपीएस आणि यूएसबी 2.0 सपोर्टचा समावेश आहे.

The post Jio ची दिवाळी अजूनही चालू, 699 रुपयांमध्ये JioPhone विकत घेण्याची ऑफर एक महीना अजून सुरु राहणार first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-announces-jio-phone-699-offer-extend-for-one-month-india-special-price/feed/ 0
Reliance Jio चे 3 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 3 वर्षांतील 30 मोठे कारनामे https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-3rd-anniversary-india-jio-fiber-broadband-jiophone-volte-4g-data-free-voice-call-ott-dth-set-top-box/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-3rd-anniversary-india-jio-fiber-broadband-jiophone-volte-4g-data-free-voice-call-ott-dth-set-top-box/#respond Fri, 06 Sep 2019 15:09:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5251 आम्ही तुम्हाला कंपनीच्या 30 मोठे कारनामे सांगणार आहोत ज्यांच्यामुळे Reliance Jio फक्त भारतात नाही तर जागतिक स्थरावर प्रसिद्ध झाली आहे.

The post Reliance Jio चे 3 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 3 वर्षांतील 30 मोठे कारनामे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आज पासून 3 वर्षांपूर्वी भारतीय मोबाईल यूजर्सनि असा विचार पण केला नव्हता कि त्यांना फ्री कॉलिंग, खुप स्वस्त दराने इंटरनेट आणि मोफत लाइव टीव्ही सारख्या सेवा मिळतील. 3 वर्षांपूवी 2GB 3G डेटा साठी महिन्याला 700 रुपयांपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागत होते पण आज 500 रुपयांपेक्षा पण कमी रुपयांत 91 दिवस रोज 2GB 4G डेटा दिला जात आहे. इतकेच नव्हे तर फ्री कॉलिंग आणि रोमिंग सह टीव्ही आणि मूवी सारख्या सेवा मोफत आहेत. आणि हे सर्व शक्य झाले आहे Reliance Jio मुळे. कंपनीने 5 सेप्टेंबर 2016 मध्ये आपल्या 4G सर्विसची सुरवात केली होती आणि त्यानंतर संपूर्ण भारतीय मोबाईल बाजार बदलला. Jio ला आज 3 वर्ष झाली आहेत आणि या 3 वर्षात कंपनीने असे कारनामे केले आहेत जे अनेक कंपन्या अनेक वर्षांत करू शकल्या नाहीत. Jio ला 3 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून आम्ही तुम्हाला कंपनीच्या 30 मोठे कारनामे सांगणार आहोत ज्यांच्यामुळे Reliance Jio फक्त भारतात नाही तर जागतिक स्थरावर प्रसिद्ध झाली आहे.

1. 6 महिन्यांपर्यंत फ्री सर्विस

Jio ची एंट्री एखाद्या हीरो सारखीच झाली होती. बाजारात येताच Reliance Jio ने घोषणा केली होती कि कंपनीची प्रत्येक सर्विस लोकांना 6 महिन्यांपर्यंत पूर्णपणे फ्री दिली जाईल. तुमच्या लक्षात असेल कि तेव्हा कशाप्रकारे Jio सिम मिळवण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. फक्त 26 दिवसांत कंपनीने एक कोटी यूजर बेसचा आकडा गाठला होता. अशाप्रकरची सर्विस जगात आतापर्यंत कुठेच दिसली नाही.

2. Free कॉलिंग

Reliance Jio भारतातील पहली टेलीकॉम कंपनी आहे जिने आपल्या यूजर्सना फ्री वॉयस कॉलिंगची सुविधा दिली. Jio नेटवर्क वरून 6 महिन्यांपर्यंत लोकांनी अगदी मोफत कॉलिंग केली तर नंतर पण कंपनीने स्पष्ट केले कि ते फक्त डेटाचे पॅसे घेतील आणि वॉयस कॉलिंग आयुष्यभरासाठी फ्री असेल.

3. Free रोमिंग

Jio चे वॉयस कॉल पूर्णपणे निशुल्क आहेतच तसेच या फ्री कॉलिंग सेवेचा वापर रोमिंग मध्ये पण मोफत आहे. जियो नेटवर्क वर सर्व नॅशनल रोमिंग फ्री आहे.

4. स्वस्त डेटा

Jio चे सुरवातीचे 6 महीने यूजर्स साठी पूर्णपणे फ्री होते. तर 6 महिने झाल्यावर पण Reliance Jio ने आपले प्लान्स खुप स्वस्तात सादर केले होते. Jio चे डेटा प्लान इतर टेलीकॉम कंपन्यांपेक्षा सर्वात स्वस्त होते. आधी 1 जीबी डेटा साठी 400 रुपये द्यावे लागायचे. तर आज 400 मध्ये 84 दिवस रोज 1.5जीबी डेटा मिळत आहे.

5. फक्त 4G

Reliance Jio भारतातील एकमेव टेलीकॉम कंपनी आहे जी फक्त 4G नेटवर्क वर चालते. Jio ने थेट 4G पासून सुरवात केली होती. या कंपनी कडे 2G किंवा 3G नेटवर्क नाही.

6. Free VAS

फ्री कॉलिंग आणि रोमिंग सोबत जियो ने आपल्या यूजर्सना फ्री वॅस सर्विस पण दिल्या आहेत ज्यासाठी आधी यूजर्स 45 रुपये महिन्याला देत होते. कॉलर ट्यून यातील एक सर्विस आहे. आधी एका ट्यून साठी तुम्हाला 45 रुपये द्यावे लागत होते पण आज तुम्ही प्रत्येक मिनिटाला ट्यून बदलू शकता तेही मोफत.

7. Free मूवी

Reliance Jio ने आपल्या यूजर्सना मोबाईल वर मोफत मध्ये मूवी बघण्याची सुविधा पण दिली आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही तसेच हे चित्रपट कंपनीच्या इंटरनेट डेटा वरच चालतात. जियो सिनेमा ऍप वरून तुम्ही हे ऑनलाईन बघू शकता. तर काही मूवी ऑफलाइन डाउनलोड करता येतात.

8. Free म्यूजिक

जियो सर्विस लॉन्च सोबत कंपनीने जियो म्यूजिकची सुरवात केली होती. सध्या हि जियो सावन नावाने ओळखील जाते. यात तुम्ही मोफत ऑन लाइन म्यूजिक स्ट्रीम करू शकता.

9. Free लाईव टीव्ही

Reliance Jio आपल्या युजर्सना मोबाईल वर मोफत लाईव टीव्ही बघण्याची सुविधा पण देते. यासाठी यूजर्सना फक्त Jio TV ऍप फोन मध्ये घ्यावे लागेल.

10. होम सिम डिलीवरी

साहजिक आहे Jio चे इतके फायदे बघून अनेकांना कंपनीशी जोडले जायचे असेल. अशाच यूजर्स साठी Reliance Jio ने मोफत सिम डिलीवरी सर्विस पण सुरु केली होती, ज्यात यूजर्सना घरी जाऊन त्यांचा Jio SIM दिला जात होता.

11. VoLTE सर्विस

वर सांगितल्याप्रमाणे Reliance Jio भारतात फक्त 4G नेटवर्क देते. कंपनीने भारतात पहिल्यांदा 4जी वोएलटीई ची सर्विस दिली. या नेटवर्क वर हाईडेफिनेशन कॉलिंग दिली. नंतर दुसऱ्या कंपन्यांनी पण आपली 4जी वोएलटीई कॉलिंग सर्विस सुरु केली.

12. सर्वात जास्त डेटा वापर

Reliance Jio ने स्वस्तात डेटा पॅक दिल्यामुळे थोड्या वेळात जियो नंबर वन नेटवर्क ठरला ज्यावर सर्वात जास्त इंटरनेट डेटा वापरला गेला. 2017 च्या एका रिपोर्ट नुसार Jio नेटवर्क वर प्रत्येक महिन्याला सरासरी 110 कोटी जीबी पेक्षा पण जास्त डेटा वापरला गेला होता आणि Jio नेटर्वक वर एका महिन्यात 220 कोटी मिनिटांपेक्षा पण जास्त वेळ लोकांनी घालवला होता जो जगात सर्वात जास्त आहे आणि एक रेकॉर्ड आहे.

13. नंबर वन चा खिताब

4G नेटवर्क, फ्री सर्विस, स्वस्त डेटा आणि मोफत कॉलिंग सारख्या सेवांमुळे Reliance Jio जलद गतीने वाढली आहे. रिलायंस जियो ने स्वतःला सिद्ध करत कंपनीला 3 वर्ष पूर्ण होण्याआधीच स्वतःला नंबर वन इंडियन टेलीकॉम कंपनी बनवले आहे. आज Jio चा युजरबेस भारतात सर्वात जास्त आहे.

14. सर्वात बड़ा 4G नेटवर्क

Reliance Jio फक्त युजर जोडत नाही तर 4जी नेटवर्क कवरेज मध्ये पण देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. कंपनीचा दावा आहे कि 99 टक्के भारतीय लोकसंख्येपर्यंत जियो नेटवर्कचे कवरेज आहे.

15. डाउनलोड स्पीड

‘फक्त फ्री किंवा स्वस्त डेटा सर्विस देणे पुरेसे नाही तर त्या सर्विस मध्ये इंटरनेट स्पीड पण फास्ट असावा’, हे Reliance Jio ला चांगलेच माहित आहे. इंडियन टेलीकॉम रेग्यूलेटरी अथारिटी ट्राई ने आपल्या रिपोर्ट मध्ये अनेकदा सांगितले आहे कि Jio भारतात सर्वात वेगवान 4G डाउनलोड स्पीड देते.

16. सर्वप्रथम KYC आधारित वेरिफिकेशन

आधी सिम घेण्यासाठी भलीमोठी प्रक्रिया कारवी लागत होती. परंतु जियो ने फक्त आधार नंबर द्वारे सिम देण्यास सुरवात केली आणि देशात हि पहिली कंपनी होती जिने आधार द्वारे KYC सर्विस दिली आणि फार्म न भरता आणि फोटो न देता सिम दिले.

17. 10 कोटी ऍप डाउनलोड

Reliance Jio ने आपल्या अनेक सेवा एकाच प्लॅटफॉर्म वर देत My Jio App ची सुरवात केली होती. हि ऍप सर्विस यूजर्सना इतकी आवडली कि My Jio App पहिला भारतीय ऍप बनला जो 10 कोटी पेक्षा पण जास्त वेळा डाउनलोड केला गेला.

18. Jio Phone

टेलीकॉम क्षेत्रात कमाल दाखवल्यानंतर रिलायंस जियो ने मोबाईल बाजारात पण पाऊल टाकले आणि Jio Phone लॉन्च केला. Jio Phone ग्रामीण भागातील लोकांना लक्षात ठेऊन बनवण्यात आला होता जो खूप लोकप्रिय ठरला. याची मार्केटिंग पण कंपनीने अनोख्या पद्धतीने केली.

19. 4G फीचर फोन

Jio Phone लॉन्च करणे Reliance Jio चा मोठा कारनामा होता पण या मोबाईलच्या रूपात इंडियन यूजर्सना देशातील पहिला 4जी फीचर फोन मिळाला. Jio Phone असा फीचर फोन आहे जो 4G नेटवर्क वर चालतो.

20. सर्वात स्वस्त मासिक कॉलिंग आणि डेटा प्लान

Jio Phone साठी कंपनीने 49 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे ज्यात महिनाभर फ्री कॉलिंग सह तुम्हाला 2 जीबी 4जी डेटा मोफत मिळतो. डेटा आणि कॉलिंग साठी हा सर्वात स्वस्त मासिक प्लान आहे.

21. Free Jio Phone

रिलायंस जियो सर्विस प्रमाणे जियो 4जी फोन पण मोफत दिला जात होता. जियो फोन साठी शुल्क 1,500 रुपये ठेवण्यात आले होते पण हे सिक्योरिटी डिपॉजिट होते. हे पैसे 3 वर्षांनंतर परत दिले जातील आणि फोन पूर्णपणे मोफत होईल.

22. Jio बनली सर्वात मोठी फीचर फोन निर्माता

Jio Phone कंपनी साठी मोठे यश घेऊन आला. हा 4जी फीचर फोन लोकांना इतका आवडला कि Jio Phone चे करोडो यूनिट विकले गेले. Reliance Jio भारतातील नाही तर जगातील सर्वात जास्त फीचर फोन विकणारी कंपनी बनली.

23. Jio Fiber

Reliance Jio ची लेटेस्ट सर्विस आहे Jio Fiber. जियो फाइबर सह रिलायंस जियो ने देशातील ब्रॉडबँड बाजारात एंट्री केली आहे. Jio Fiber ऑप्टिल फाइबर केबल द्वारे अल्ट्रा फास्ट स्पीड इंटरनेट आणि अनेक अतिरिक्त सुविधा मिळतात. हि 5 सेप्टेंबरला Reliance Jio ला तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे बाजारात आली आहे.

24. 1 GBPS स्पीड

रिलायंस जियोच्या Jio Fiber सर्विसची सर्वात मोठी खासियत याची सुपर फास्ट इंटरनेट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार Jio Fiber वर यूजर्सना 1GBPS पर्यंतचा इंटरनेट स्पीड मिळेल. या स्पीडने सेकंदात संपूर्ण मूवी डाउनलोड होईल. भारतात आतापर्यंत 1जीबीपीएस स्पीड देणारी हि पहिली सर्विस आहे.

25. Free Set-Top Box

Jio Fiber चे कनेक्शन घेणाऱ्या यूजर्सना Reliance Jio मोफत Set-Top Box पण देत आहे. कंपनी ‘Jio Forever Annual Plan’ घेणाऱ्या यूजर्सना हि मोफत सुविधा मिळेल. सेट-टॉप बॉक्स सोबत कपंनी डीटीएच सर्विस पण देईल. या सर्विस मध्ये OTT ऍप्स पण असतील ज्या सोबत मोफत सब्सक्रिप्शन पण दिले जाईल.

26. Free TV

जेव्हा कंपनीने फ्री कॉलिंग, फ्री रोमिंग आणि फ्री फोन नंतर मोफत टीव्ही देण्याची घोषणा केली तेव्हा हद्दच झाली. Reliance Jio Jio Fiber यूजर्सना Set-Top Box व्यतिरिक्त HD/4K LED TV पण मोफत देईल. Jio Fiber चे वार्षिक प्लान्स घेणाऱ्या लोकांना कपंनी मोफत टेलीविजन देईल.

27. VR सर्विस

Jio Fiber सोबत Reliance Jio यूजर्सना VR म्हणजे वर्चुअल रियालिटी सर्विस पण दिली जाईल. या सर्विसचा वापर अभ्यास, मनोरंजन आणि शॉपिंग साठी करता येईल. रिलायंस जियो या सर्विस साठी VR हँडसेट पण विकेल जे स्वस्तात विकत घेता येतील.

28. Free मल्टी यूजर वीडियो कॉफ्रेंसिंग

Reliance Jio आपल्या Jio Fiber सर्विस मध्ये मल्टी यूजर वीडियो कॉफ्रेंसिंगची सुविधा पण देईल. या सर्विस मुळे कोणत्याही शुल्काविना यूजर्स कुठूनही आपल्या नातेवाईक व मित्रांशी लाईव वीडियो चॅट करू शकतील. खास बाब अशी कि हि वीडियो चॅट मोबाईल वर नाही तर TV वर होईल.

29. Free लँडलाईन

Jio Fiber मध्ये Reliance Jio यूजर्सना कंपनी कडून लँडलाईन सेट दिला जाईल जो फाइबर केबलशी कनेक्टड असेल. या सर्विस मध्ये कंपनी सुपर फास्ट इंटरनेट डेटा तर देत आहे त्याचबरोबर लँडलाईनने यूजर्स मोफत वॉयस कॉल पण करू शकतील आणि खास बाब अशी कि लँडलाइन फोन मध्ये लोकल आणि एसटीडी कॉल पूर्णपणे फ्री आहेत.

30. स्वस्त इंटरनॅशनल कॉल

Reliance Jio ने Jio Fiber यूजर्स साठी खुपच स्वस्त इंटरनॅशनल रोमिंग पॅक पण सादर केला आहे. Jio ची हि सर्विस वापरणारे लोक अमेरिका आणि कॅनडात फक्त 500 रुपयांमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. आतापर्यंत हि सर्वात स्वस्त इंटरनॅशनल कॉलिंग सर्विस आहे.

The post Reliance Jio चे 3 वर्ष पूर्ण, जाणून घ्या 3 वर्षांतील 30 मोठे कारनामे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-3rd-anniversary-india-jio-fiber-broadband-jiophone-volte-4g-data-free-voice-call-ott-dth-set-top-box/feed/ 0
जियो फोनची बॅटरी झाली दुर्घटनाग्रस्त, कंपनीने केली त्वरित कारवाई https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-blast-in-haldwani/ https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-blast-in-haldwani/#respond Mon, 29 Jul 2019 11:52:30 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4928 कंपनीने लगेचच कारवाई करून प्रकरण वाढण्याची आधीच सांभाळून घेतले.

The post जियो फोनची बॅटरी झाली दुर्घटनाग्रस्त, कंपनीने केली त्वरित कारवाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी रिलायंस जियो ने अशी घोषणा केली आहे कि कंपनी एयरटेलला मागे टाकून देशातील नंबर दोन सेवा देणारी कंपनी बनली आहे. कंपनीने फक्त तीन वर्षांपेक्षा पण कमी काळात हा पराक्रम केला आहे. यात जियोच्या फीचर स्मार्टफोन जियोफोनचे पण मोठे योगदान आहे. याच्याच जीवावर कपंनी फीचर फोन सेग्मेंट मध्ये नंबर वन कंपनी बनली आहे. पण आज जियोफोन यूजर्स साठी हि बातमी चांगली नाही. हल्द्वानी मध्ये एक जियो फोन ब्लास्ट झाला आहे आणि 91मोबाईल्सला याची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे आणि आम्ही या प्रकरणाची दोन्ही बाजूने पडताळणी केली आहे. एकीकडे यूजर्स कडून संपूर्ण माहिती मागितली तसेच कंपनीला पण संपूर्ण प्रकरण सांगितले आणि कंपनीने पण यावर त्वरित कारवाई करत प्रकरण शांत केले आहे.

हि घटना हल्द्वानी येतील आहे जिथे अतुल कोठारी नावाच्या एका यूजरने आपला जियो फोन ब्लास्ट झाल्याची बातमी ट्विटर वर पोस्ट केली होती. त्यानंतर आम्ही त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याने संपूर्ण माहिती दिली. तो म्हणाला कि “फोन नेहमी ठेवतो तसाच थवेच्या होता. चार्जिंगला पण लावला नव्हता. आपोआप आग लागली. त्यानंतर जेव्हा मी कंपनी कडे गेलो तेव्हा ते म्हणाले कि तुम्हाला 50 टक्के किंमतीत रिफर्बिश फोन दिला जाईल, म्हणून मी नकार दिला.”

अतुलशी बोलल्यानंतर आम्ही कंपनीशी संपर्क केला आणि त्यांनी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. सोबत रिलायंस रिटेलचे प्रवक्ता म्हणाले कि “जियोफोनची डिजाइन आणि निर्मिती खूप मोठ्या मोबाईल निर्मात्यांकडून केली जाते जयंत आम्ही उच्च गुणवत्तेची काळजी घेतो. निर्मिती काळात क्वालिटी कंट्रोल साठी अनेक प्रकियामधून हा फोन जातो. असे असूनही हि घटना आमच्या समोर आली आहे आणि आमची टीम यामागील कारणांचा शोध घेत आहे. माहितीच्या आधारवर आम्ही योग्य ती कारवाई करू.”

कंपनीच्या उत्तरांनंतर जेव्हा आम्ही यूजरशी बोललो तेव्हा त्याने जास्त काही सांगितले नाही पण इतके जरूर सांगितले कि नवीन फोन मिळाला आहे. तसेच त्याने आपला ट्विट डिलीट पण केला. एक चांगली बाब अशी कि कंपनीने लगेचच कारवाई करून प्रकरण वाढण्याची आधीच सांभाळून घेतले.

The post जियो फोनची बॅटरी झाली दुर्घटनाग्रस्त, कंपनीने केली त्वरित कारवाई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-phone-blast-in-haldwani/feed/ 0