आज पासून 3 वर्षांपूर्वी भारतीय मोबाईल यूजर्सनि असा विचार पण केला नव्हता कि त्यांना फ्री कॉलिंग, खुप स्वस्त दराने इंटरनेट आणि मोफत लाइव टीव्ही सारख्या सेवा मिळतील. 3 वर्षांपूवी 2GB 3G डेटा साठी महिन्याला 700 रुपयांपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागत होते पण आज 500 रुपयांपेक्षा पण कमी रुपयांत 91 दिवस रोज 2GB 4G डेटा दिला जात आहे. इतकेच नव्हे तर फ्री कॉलिंग आणि रोमिंग सह टीव्ही आणि मूवी सारख्या सेवा मोफत आहेत. आणि हे सर्व शक्य झाले आहे Reliance Jio मुळे. कंपनीने 5 सेप्टेंबर 2016 मध्ये आपल्या 4G सर्विसची सुरवात केली होती आणि त्यानंतर संपूर्ण भारतीय मोबाईल बाजार बदलला. Jio ला आज 3 वर्ष झाली आहेत आणि या 3 वर्षात कंपनीने असे कारनामे केले आहेत जे अनेक कंपन्या अनेक वर्षांत करू शकल्या नाहीत. Jio ला 3 वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त साधून आम्ही तुम्हाला कंपनीच्या 30 मोठे कारनामे सांगणार आहोत ज्यांच्यामुळे Reliance Jio फक्त भारतात नाही तर जागतिक स्थरावर प्रसिद्ध झाली आहे.
1. 6 महिन्यांपर्यंत फ्री सर्विस
Jio ची एंट्री एखाद्या हीरो सारखीच झाली होती. बाजारात येताच Reliance Jio ने घोषणा केली होती कि कंपनीची प्रत्येक सर्विस लोकांना 6 महिन्यांपर्यंत पूर्णपणे फ्री दिली जाईल. तुमच्या लक्षात असेल कि तेव्हा कशाप्रकारे Jio सिम मिळवण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या. फक्त 26 दिवसांत कंपनीने एक कोटी यूजर बेसचा आकडा गाठला होता. अशाप्रकरची सर्विस जगात आतापर्यंत कुठेच दिसली नाही.
2. Free कॉलिंग
Reliance Jio भारतातील पहली टेलीकॉम कंपनी आहे जिने आपल्या यूजर्सना फ्री वॉयस कॉलिंगची सुविधा दिली. Jio नेटवर्क वरून 6 महिन्यांपर्यंत लोकांनी अगदी मोफत कॉलिंग केली तर नंतर पण कंपनीने स्पष्ट केले कि ते फक्त डेटाचे पॅसे घेतील आणि वॉयस कॉलिंग आयुष्यभरासाठी फ्री असेल.
3. Free रोमिंग
Jio चे वॉयस कॉल पूर्णपणे निशुल्क आहेतच तसेच या फ्री कॉलिंग सेवेचा वापर रोमिंग मध्ये पण मोफत आहे. जियो नेटवर्क वर सर्व नॅशनल रोमिंग फ्री आहे.
4. स्वस्त डेटा
Jio चे सुरवातीचे 6 महीने यूजर्स साठी पूर्णपणे फ्री होते. तर 6 महिने झाल्यावर पण Reliance Jio ने आपले प्लान्स खुप स्वस्तात सादर केले होते. Jio चे डेटा प्लान इतर टेलीकॉम कंपन्यांपेक्षा सर्वात स्वस्त होते. आधी 1 जीबी डेटा साठी 400 रुपये द्यावे लागायचे. तर आज 400 मध्ये 84 दिवस रोज 1.5जीबी डेटा मिळत आहे.
5. फक्त 4G
Reliance Jio भारतातील एकमेव टेलीकॉम कंपनी आहे जी फक्त 4G नेटवर्क वर चालते. Jio ने थेट 4G पासून सुरवात केली होती. या कंपनी कडे 2G किंवा 3G नेटवर्क नाही.
6. Free VAS
फ्री कॉलिंग आणि रोमिंग सोबत जियो ने आपल्या यूजर्सना फ्री वॅस सर्विस पण दिल्या आहेत ज्यासाठी आधी यूजर्स 45 रुपये महिन्याला देत होते. कॉलर ट्यून यातील एक सर्विस आहे. आधी एका ट्यून साठी तुम्हाला 45 रुपये द्यावे लागत होते पण आज तुम्ही प्रत्येक मिनिटाला ट्यून बदलू शकता तेही मोफत.
7. Free मूवी
Reliance Jio ने आपल्या यूजर्सना मोबाईल वर मोफत मध्ये मूवी बघण्याची सुविधा पण दिली आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही तसेच हे चित्रपट कंपनीच्या इंटरनेट डेटा वरच चालतात. जियो सिनेमा ऍप वरून तुम्ही हे ऑनलाईन बघू शकता. तर काही मूवी ऑफलाइन डाउनलोड करता येतात.
8. Free म्यूजिक
जियो सर्विस लॉन्च सोबत कंपनीने जियो म्यूजिकची सुरवात केली होती. सध्या हि जियो सावन नावाने ओळखील जाते. यात तुम्ही मोफत ऑन लाइन म्यूजिक स्ट्रीम करू शकता.
9. Free लाईव टीव्ही
Reliance Jio आपल्या युजर्सना मोबाईल वर मोफत लाईव टीव्ही बघण्याची सुविधा पण देते. यासाठी यूजर्सना फक्त Jio TV ऍप फोन मध्ये घ्यावे लागेल.
10. होम सिम डिलीवरी
साहजिक आहे Jio चे इतके फायदे बघून अनेकांना कंपनीशी जोडले जायचे असेल. अशाच यूजर्स साठी Reliance Jio ने मोफत सिम डिलीवरी सर्विस पण सुरु केली होती, ज्यात यूजर्सना घरी जाऊन त्यांचा Jio SIM दिला जात होता.
11. VoLTE सर्विस
वर सांगितल्याप्रमाणे Reliance Jio भारतात फक्त 4G नेटवर्क देते. कंपनीने भारतात पहिल्यांदा 4जी वोएलटीई ची सर्विस दिली. या नेटवर्क वर हाईडेफिनेशन कॉलिंग दिली. नंतर दुसऱ्या कंपन्यांनी पण आपली 4जी वोएलटीई कॉलिंग सर्विस सुरु केली.
12. सर्वात जास्त डेटा वापर
Reliance Jio ने स्वस्तात डेटा पॅक दिल्यामुळे थोड्या वेळात जियो नंबर वन नेटवर्क ठरला ज्यावर सर्वात जास्त इंटरनेट डेटा वापरला गेला. 2017 च्या एका रिपोर्ट नुसार Jio नेटवर्क वर प्रत्येक महिन्याला सरासरी 110 कोटी जीबी पेक्षा पण जास्त डेटा वापरला गेला होता आणि Jio नेटर्वक वर एका महिन्यात 220 कोटी मिनिटांपेक्षा पण जास्त वेळ लोकांनी घालवला होता जो जगात सर्वात जास्त आहे आणि एक रेकॉर्ड आहे.
13. नंबर वन चा खिताब
4G नेटवर्क, फ्री सर्विस, स्वस्त डेटा आणि मोफत कॉलिंग सारख्या सेवांमुळे Reliance Jio जलद गतीने वाढली आहे. रिलायंस जियो ने स्वतःला सिद्ध करत कंपनीला 3 वर्ष पूर्ण होण्याआधीच स्वतःला नंबर वन इंडियन टेलीकॉम कंपनी बनवले आहे. आज Jio चा युजरबेस भारतात सर्वात जास्त आहे.
14. सर्वात बड़ा 4G नेटवर्क
Reliance Jio फक्त युजर जोडत नाही तर 4जी नेटवर्क कवरेज मध्ये पण देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. कंपनीचा दावा आहे कि 99 टक्के भारतीय लोकसंख्येपर्यंत जियो नेटवर्कचे कवरेज आहे.
15. डाउनलोड स्पीड
‘फक्त फ्री किंवा स्वस्त डेटा सर्विस देणे पुरेसे नाही तर त्या सर्विस मध्ये इंटरनेट स्पीड पण फास्ट असावा’, हे Reliance Jio ला चांगलेच माहित आहे. इंडियन टेलीकॉम रेग्यूलेटरी अथारिटी ट्राई ने आपल्या रिपोर्ट मध्ये अनेकदा सांगितले आहे कि Jio भारतात सर्वात वेगवान 4G डाउनलोड स्पीड देते.
16. सर्वप्रथम KYC आधारित वेरिफिकेशन
आधी सिम घेण्यासाठी भलीमोठी प्रक्रिया कारवी लागत होती. परंतु जियो ने फक्त आधार नंबर द्वारे सिम देण्यास सुरवात केली आणि देशात हि पहिली कंपनी होती जिने आधार द्वारे KYC सर्विस दिली आणि फार्म न भरता आणि फोटो न देता सिम दिले.
17. 10 कोटी ऍप डाउनलोड
Reliance Jio ने आपल्या अनेक सेवा एकाच प्लॅटफॉर्म वर देत My Jio App ची सुरवात केली होती. हि ऍप सर्विस यूजर्सना इतकी आवडली कि My Jio App पहिला भारतीय ऍप बनला जो 10 कोटी पेक्षा पण जास्त वेळा डाउनलोड केला गेला.
18. Jio Phone
टेलीकॉम क्षेत्रात कमाल दाखवल्यानंतर रिलायंस जियो ने मोबाईल बाजारात पण पाऊल टाकले आणि Jio Phone लॉन्च केला. Jio Phone ग्रामीण भागातील लोकांना लक्षात ठेऊन बनवण्यात आला होता जो खूप लोकप्रिय ठरला. याची मार्केटिंग पण कंपनीने अनोख्या पद्धतीने केली.
19. 4G फीचर फोन
Jio Phone लॉन्च करणे Reliance Jio चा मोठा कारनामा होता पण या मोबाईलच्या रूपात इंडियन यूजर्सना देशातील पहिला 4जी फीचर फोन मिळाला. Jio Phone असा फीचर फोन आहे जो 4G नेटवर्क वर चालतो.
20. सर्वात स्वस्त मासिक कॉलिंग आणि डेटा प्लान
Jio Phone साठी कंपनीने 49 रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे ज्यात महिनाभर फ्री कॉलिंग सह तुम्हाला 2 जीबी 4जी डेटा मोफत मिळतो. डेटा आणि कॉलिंग साठी हा सर्वात स्वस्त मासिक प्लान आहे.
21. Free Jio Phone
रिलायंस जियो सर्विस प्रमाणे जियो 4जी फोन पण मोफत दिला जात होता. जियो फोन साठी शुल्क 1,500 रुपये ठेवण्यात आले होते पण हे सिक्योरिटी डिपॉजिट होते. हे पैसे 3 वर्षांनंतर परत दिले जातील आणि फोन पूर्णपणे मोफत होईल.
22. Jio बनली सर्वात मोठी फीचर फोन निर्माता
Jio Phone कंपनी साठी मोठे यश घेऊन आला. हा 4जी फीचर फोन लोकांना इतका आवडला कि Jio Phone चे करोडो यूनिट विकले गेले. Reliance Jio भारतातील नाही तर जगातील सर्वात जास्त फीचर फोन विकणारी कंपनी बनली.
23. Jio Fiber
Reliance Jio ची लेटेस्ट सर्विस आहे Jio Fiber. जियो फाइबर सह रिलायंस जियो ने देशातील ब्रॉडबँड बाजारात एंट्री केली आहे. Jio Fiber ऑप्टिल फाइबर केबल द्वारे अल्ट्रा फास्ट स्पीड इंटरनेट आणि अनेक अतिरिक्त सुविधा मिळतात. हि 5 सेप्टेंबरला Reliance Jio ला तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे बाजारात आली आहे.
24. 1 GBPS स्पीड
रिलायंस जियोच्या Jio Fiber सर्विसची सर्वात मोठी खासियत याची सुपर फास्ट इंटरनेट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार Jio Fiber वर यूजर्सना 1GBPS पर्यंतचा इंटरनेट स्पीड मिळेल. या स्पीडने सेकंदात संपूर्ण मूवी डाउनलोड होईल. भारतात आतापर्यंत 1जीबीपीएस स्पीड देणारी हि पहिली सर्विस आहे.
25. Free Set-Top Box
Jio Fiber चे कनेक्शन घेणाऱ्या यूजर्सना Reliance Jio मोफत Set-Top Box पण देत आहे. कंपनी ‘Jio Forever Annual Plan’ घेणाऱ्या यूजर्सना हि मोफत सुविधा मिळेल. सेट-टॉप बॉक्स सोबत कपंनी डीटीएच सर्विस पण देईल. या सर्विस मध्ये OTT ऍप्स पण असतील ज्या सोबत मोफत सब्सक्रिप्शन पण दिले जाईल.
26. Free TV
जेव्हा कंपनीने फ्री कॉलिंग, फ्री रोमिंग आणि फ्री फोन नंतर मोफत टीव्ही देण्याची घोषणा केली तेव्हा हद्दच झाली. Reliance Jio Jio Fiber यूजर्सना Set-Top Box व्यतिरिक्त HD/4K LED TV पण मोफत देईल. Jio Fiber चे वार्षिक प्लान्स घेणाऱ्या लोकांना कपंनी मोफत टेलीविजन देईल.
27. VR सर्विस
Jio Fiber सोबत Reliance Jio यूजर्सना VR म्हणजे वर्चुअल रियालिटी सर्विस पण दिली जाईल. या सर्विसचा वापर अभ्यास, मनोरंजन आणि शॉपिंग साठी करता येईल. रिलायंस जियो या सर्विस साठी VR हँडसेट पण विकेल जे स्वस्तात विकत घेता येतील.
28. Free मल्टी यूजर वीडियो कॉफ्रेंसिंग
Reliance Jio आपल्या Jio Fiber सर्विस मध्ये मल्टी यूजर वीडियो कॉफ्रेंसिंगची सुविधा पण देईल. या सर्विस मुळे कोणत्याही शुल्काविना यूजर्स कुठूनही आपल्या नातेवाईक व मित्रांशी लाईव वीडियो चॅट करू शकतील. खास बाब अशी कि हि वीडियो चॅट मोबाईल वर नाही तर TV वर होईल.
29. Free लँडलाईन
Jio Fiber मध्ये Reliance Jio यूजर्सना कंपनी कडून लँडलाईन सेट दिला जाईल जो फाइबर केबलशी कनेक्टड असेल. या सर्विस मध्ये कंपनी सुपर फास्ट इंटरनेट डेटा तर देत आहे त्याचबरोबर लँडलाईनने यूजर्स मोफत वॉयस कॉल पण करू शकतील आणि खास बाब अशी कि लँडलाइन फोन मध्ये लोकल आणि एसटीडी कॉल पूर्णपणे फ्री आहेत.
30. स्वस्त इंटरनॅशनल कॉल
Reliance Jio ने Jio Fiber यूजर्स साठी खुपच स्वस्त इंटरनॅशनल रोमिंग पॅक पण सादर केला आहे. Jio ची हि सर्विस वापरणारे लोक अमेरिका आणि कॅनडात फक्त 500 रुपयांमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. आतापर्यंत हि सर्वात स्वस्त इंटरनॅशनल कॉलिंग सर्विस आहे.