रिलायंस करत आहे का Jio Phone lite ची तयारी? नाही मिळत आहे Jio Phone चा स्टॉक

रिलायंसने साल 2017 मध्ये भारताचा पाहील 4जी फीचर फोन Jio Phone लॉन्च केला होता आणि फोनने विक्रीचे सर्व विक्रम मोडले होते. अजूनही फोनला मागणी आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या फोन संबंधित लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शहरांमध्ये रिटेल स्टोर वरून Jio Phone गायब झाला आहे. सर्वात खास बाब अशी आहे कि जवळपास एका महिन्यांपासून जास्त काळ झाला आहे आणि अजूनही स्टॉक दिला जात नाही. याबाबत जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही भारतातील अनेक शहरांमध्ये याची चौकशी केली आणि आम्हाला हि बातमी खरी असल्याचे आढळून आले. तसेच धक्कादायक माहिती पण यातून समोर आली.

सर्वात आधी आम्ही पुण्यातून माहिती घेतली आणि तिथून आम्हाला अशी माहिती देण्यात आली कि ‘गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून Jio Phone स्टॉकमुळे दुकानदार हैराण आहेत. जवळपास एक महिन्यापूर्वी काही यूनीट देण्यात आले होते पण आता तर अजिबात मिळत नाहीत. परिस्थिती अशी आहे कि जियोफोनसाठी ब्लॅक मार्केटिंग सुरु झाली आहे. ज्यांच्याकडे जुना स्टॉक आहे ते एका फोनसाठी 2,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे मागत आहेत.’

याबाबत आम्ही गुजरात मध्ये कॉल केला तेव्हा तिथून पण रोचक माहिती मिळाली. रिटेलर्स म्हणाले कि ‘एका महिन्यापासून पण जास्त काळ उलटून गेला आहे आणि आम्हाला Jio Phone चा स्टॉक दिला जात नाही. कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर्स येतात आणि आम्हाला सांगतात कि फोन बंद होणार आहे आता स्टॉक येणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे जुना स्टॉक आहे ते फोन ब्लॅकने विकत आहेत.’

अशाचप्रकारे आम्ही जेव्हा झारखंड आणि बिहार मध्ये कॉल केला तेव्हा तिथून पण स्टॉक नसल्याचे सांगण्यात आले. आम्हाला रिटेलर्सनी सांगितले कि ‘गेल्या एक महिन्यापासून पण जास्त काळ जियोफोन येत नाही आहे. कंपनीचे डिस्ट्रीब्यूटर्स म्हणत आहेत कि हा फोन बंद होणार आहे आणि काही महिन्यांमध्ये कंपनी एक स्वस्त Jio Phone आणण्याची तयारी करत आहे. हा कमी रेंजचा एक फोन असेल जो फक्त कॉलिंगसाठी वापरता येईल. याला Jio Phone Lite असे नाव दिले जाऊ शकते.’

विशेष म्हणजे याबाबत सर्वात आधी 91mobiles ने माहिती दिली होती कि कंपनी स्वस्त जियोफोन आणण्याची तयारी करत आहे ज्याला Jio Phone Lite नावाने सादर केला जाऊ शकतो. कंपनी याबाबत खूप आधीपासून स्टोर वर सर्वे करत आहे.

तसेच जियोफोन स्टॉकबद्दल जेव्हा आम्ही दिल्ली मध्ये रिटेलर्स कडून माहिती घेतली तेव्हा तिथे वेगळीच गोष्ट चालू होती. करोलबागच्या रिटेलर्सनी सांगितले कि ‘जियोफोनचा स्टॉक तर दिला जात आहे पण मोठ्या अटींसह. जर तुम्ही 10 जियोफोन घेतले तर तुम्हाला 10 माइक्रोमॅक्स भारत फोन घ्यावे लागतील ज्यांची किंमत जवळपास 2,000 रुपये आहे.’

दिल्लीनंतर मुंबई मध्ये पण आम्ही अनेक दुकानांमधून माहिती घेतली आणि तिथे पण रिटेलर्सनी सांगितले कि ‘Jio Phone चे डिस्ट्रीब्यूटर्स येऊन सांगत आहेत कि हा फोन बंद होणार आहे आणि त्यामुळे स्टॉक दिला जात नाही.’

Jio Phone बद्दल जेव्हा आम्हाला अशी माहिती मिळू लागली तेव्हा आम्ही कंपनीद्वारे पण स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ईमेल पण केला आहे पण अजूनही कोणतेही उत्तर मिळाले नाही. जर कंपनीकडून उत्तर आले तर आम्ही अपडेट करू.

कंपनी से जवाब नहीं आने वर हमने दिल्ली के एक Jio एक्जिक्यूटिव से बात की आणि उन्होंने नाव न बताने की शर्त वर बताया कि ‘जियोफोन का स्टॉक कम आहे आणि कंपनी काही नवीन लाने का प्लान कर रही आहे इसी वजह से पुराने मॉडल को हटाने का काम चल रहा आहे.’

तसेच जेव्हा याबाबत आम्ही Reliance Jio च्या दुसऱ्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली तेव्हा त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर खास बातमी सांगितली. ते म्हणाले कि ‘Jio Phone अजून बंद झाला नाही. स्टॉकची समस्या आहे आणि त्यामागे अनेक कारणे आहेत, ज्यात कोराना वायरस पण एक कारण आहे. मटेरियल सप्लाई चीन वरून होते आणि सर्वांना माहित आहे कि त्याचा काय परिणाम झाला आहे. तसेच नवीन फोन येण्याची खबर असल्यामुळे कंपनी जुन्या फोन वर लक्ष कमी करू शकते. याव्यतिरिक्त तिसरे कारण सप्लाई चेन मध्ये मागे पुढे गोष्टी होत असतात.’

नेमके काय होत आहे याबाबत कोणीही निश्चित माहिती दिली नाही फक्त काही ठिकाणी Jio Phone Lite ची बातमी मिळाली जी आम्ही आधीच सांगितली आहे. परंतु एक गोष्ट स्पष्ट झाली आहे कि ज्याप्रकारे जियोफोनची परिस्थिती समोर येत आहे त्यावरून कंपनी कडे काही तरी प्लान आहे आणि कदाचित येत्या काही दिवसांत नवीन घोषणा केली जाऊ शकते.

विशेष म्हणजे दरवर्षी जुलै किंवा ऑगस्ट मध्ये रिलायंसची एजीएम मीटिंग होते आणि यात कंपनी काहीना काही नवीन करते. त्यामुळे आशा आहे कि यावेळी पण जियो काही खास करणार आहे आणि मुकेश अंबानी पुन्हा लोकांना हैराण करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here