Jio ची दिवाळी अजूनही चालू, 699 रुपयांमध्ये JioPhone विकत घेण्याची ऑफर एक महीना अजून सुरु राहणार

Reliance Jio यूजर्स साठी हि दिवाळी खास होती. जियोने ब्रँडचा पहिला 4G फीचर फोन JioPhone कमी किंमतीत विकला होता. हा 4जी फीचर फोन कंपनीने 1500 रुपयांमध्ये लॉन्च केला होता, पण दिवाळी ऑफर अंतर्गत Reliance Jio ने JioPhone फक्त 699 रुपयांमध्ये विकला होता. दिवाळीचा सण तर गेला पण Jio ची दिवाळी अजूनही आहे. आपल्या यूजर्सना भेट देत Reliance Jio ने घोषणा केली आहे कि JioPhone ची हि ऑफर एका महिन्यासाठी वाढवत आहे.

Reliance Jio ने अधिकृतपणे घोषणा केली आहे कि कंपनीने सादर केलेली JioPhone ऑफर आता एका महिन्यासाठी वाढवली आहे. म्हणजे आता जियो ग्राहक अजून एक महिना JioPhone फक्त 699 रुपयांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे JioPhone ची हि दिवाळी ऑफर दसऱ्याला म्हणजे 2 ऑक्टोबरला सुरु झाली होती आणि दिवाळी पर्यंत म्हणजे 27 ऑक्टोबर पर्यंत सादर करण्यात आली होती. पण आता आपल्या फॅन्स साठी Jio ने ‘Jio Phone Diwali 2019’ ऑफर एका महिन्यासाठी वाढवली आहे.

डेटाचा पण होईल फायदा

JioPhone आता 27 नोव्हेंबर पर्यंत फक्त 699 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या स्वस्त किंमतीसह जियो यूजर्स कंपनी कडून मिळणाऱ्या एक्स्ट्रा 4G इंटरनेट डेटाचा पण लाभ घेऊ शकतील. Reliance Jio कडून JioPhone ला रिचार्ज केल्यास यूजर्सना 700 रुपयांचे एक्स्ट्रा बेनिफिट मिळत आहेत. या अंतर्गत JioPhone विकत घेतल्यावर पुढील सात रिचार्ज पर्यंत अतिरिक्त 4जी इंटरनेट डेटा दिला जाईल. या 4G डेटाची किंमत 99 रुपये असेल आपोआप ग्राहकांच्या नंबर वर क्रेडिट होईल.

2 वर्षात विकले गेले 7 कोटी Jio Phone

Reliance Jio ने गेल्या 2 वर्षात 7 कोटींपेक्षा पण जास्त फीचर फोन विकून नवीन रेकॉर्ड बनवला आहे. हे आकडे Jio Phone आणि Jio Phone 2 दोघांचे आहेत. कंपनीने 2 वर्षात 7 कोटी Jio Phone विकून मोबाईल फोन सेलचा रेकॉर्ड तर बनवलाच सोबतच या दोन वर्षात Jio नेटवर्क सोबत 7 कोटी नवीन यूजर्स पण जोडले गेले. एकीकडे स्वस्तात 4G फोन मिळत असल्यामुळे अनेकांना Jio Phone आवडतो. तर Jio Phone मधील आर्कषक फीचर्स आणि My Jio App वर कंटेंटने लोकांना वेड लावले आहे.

Jio Phone

जियोफोन मध्ये 2.4-इंचाचा क्यूडब्ल्यूवीजीए (240×320 पिक्सल) डिस्प्ले आहे. तसेच यात 1.2 गीगाहर्ट्ज स्प्रेडट्रम SPRD 9820A/QC8905 डुअल कोर प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये 512 एमबी रॅम आणि इनबिल्ट स्टोरेज 4 जीबी आहे. फोटोग्राफी साठी मागे 2-मेगापिक्सलचा कॅमेरा आणि आणि फ्रंट पॅनल वर वीजीए कॅमेरा आहे. जियो फोनची बॅटरी 2000 एमएएच आहे. कनेक्टिविटी फीचर मध्ये 4जी वीओएलटीई, ब्लूटूथ वी4.1, वाई-फाई, एनएफसी, एफएम रेडियो, जीपीएस आणि यूएसबी 2.0 सपोर्टचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here