KYC - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 18 Nov 2022 10:35:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आता कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरसह दिसणार आधारकार्डवरील नाव; देशात येतोय नवीन सरकारी नियम https://www.91mobiles.com/marathi/trai-caller-id-system-details-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/trai-caller-id-system-details-in-marathi/#respond Fri, 18 Nov 2022 10:35:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15108 अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स उचलणं सर्वानांच आवडत नाही. त्यावर उपाय म्हणून ट्रूकॉलर सारख्या अ‍ॅप्सची मदत घेतली जाते. हे अ‍ॅप आपली मदत करतात परंतु आपला खाजगी डेटा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट सुरक्षित राहत नाही. तसेच वारंवार येणाऱ्या पॉप-अपचा वेगळाच त्रास होतो. परंतु आता येत्या काही दिवसात हे बदलू शकतं, भारतात कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइल नंबरसह त्या व्यक्तीचे […]

The post आता कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरसह दिसणार आधारकार्डवरील नाव; देशात येतोय नवीन सरकारी नियम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स उचलणं सर्वानांच आवडत नाही. त्यावर उपाय म्हणून ट्रूकॉलर सारख्या अ‍ॅप्सची मदत घेतली जाते. हे अ‍ॅप आपली मदत करतात परंतु आपला खाजगी डेटा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट सुरक्षित राहत नाही. तसेच वारंवार येणाऱ्या पॉप-अपचा वेगळाच त्रास होतो. परंतु आता येत्या काही दिवसात हे बदलू शकतं, भारतात कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइल नंबरसह त्या व्यक्तीचे नाव देखील दिसेल. हे TRAI Caller ID System अंतगर्त होईल जी पूर्णपणे KYC Based असेल.

TRAI Caller ID System

ट्राय कॉलर आयडी सिस्टम भारत सरकारची नवीन योजना आहे जिच्यावर सध्या विचार सुरु आहे. सर्व मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असावेत तसेच जेव्हा एखादी व्यक्ती कोणाला कॉल करत असेल तेव्हा समोरच्या व्यक्तीकडे फक्त कॉल करणाऱ्याचा मोबाइल नंबर नव्हे तर नंबरसह कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसावं अशी Telecom regulatory authority of india ची योजना आहे. हे तेच नाव असेल जे Adhaar Card वर असेल. हे देखील वाचा: OTT Releases this Week: या आठवड्यात ओटीटीवर Godfather, Dharavi Bank सह पाहा साऊथचे हे जबरदस्त चित्रपट

trai caller id system details in marathi

ट्राय कॉलर आयडीचा फायदा

ट्राय कॉलर आयडी सिस्टममध्ये कोणाचा फोन आल्यावर त्याचा नंबर आणि नाव दोन्ही स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे कॉल रिसीव करण्याआधी लोकांना त्यांना फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव समजेल. हा नियम लागू झाल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख लपून राहणार नाही आणि त्यामुळे फसवणुकीच्या घटना कमी होतील. भारत सरकारच्या या नियमानंतर ट्रूकॉलर सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सची गरज भासणार नाही.

trai caller id system details in marathi

भारत सरकारची योजना

टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया येत्या तीन आठवड्यात आपल्या नव्या योजनेची घोषणा करू शकते. रिपोर्टनुसार ही पूर्णपणे केवायसी बेस्ड प्रक्रिया असेल. ज्या व्यक्तीच्या नावावर एखादं सिम कार्ड (Sim Card) इश्यू झालं असेल, त्या मोबाइल नंबरद्वारे कॉल केल्यावर तेच नाव दुसऱ्या व्यक्तीच्या फोनमध्ये दिसेल. हे देखील वाचा: काही मिनिटांत फुलचार्ज होईल विवोचा हा सुंदर फोन; कमी किंमतीत 12GB RAM सह 50MP Camera

सध्या अंदाज लावला जात आहे की हे नाव स्वतःहून बदलता येणार नाही तसेच आधार कार्ड किंवा ज्या ओळखपत्राच्या मदतीनं सिम विकत घेतलं असेल, तेच नाव TRAI Caller ID System मध्ये नोंदवलं जाईल. सध्यातरी ट्रायच्या या नव्या योजनेविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही. आशा आहे की येत्या काही दिवसांत भारतात लागू होणाऱ्या या नियमाविषयी सरकारकडून माहिती दिली जाईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post आता कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरसह दिसणार आधारकार्डवरील नाव; देशात येतोय नवीन सरकारी नियम first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/trai-caller-id-system-details-in-marathi/feed/ 0
सावधान: पेटीएम वर KYC बद्दल होत फसवणूक, रहा सावध https://www.91mobiles.com/marathi/paytm-is-giving-advisory-kyc-warning-to-its-users/ https://www.91mobiles.com/marathi/paytm-is-giving-advisory-kyc-warning-to-its-users/#respond Sat, 23 Nov 2019 06:35:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5855 अधिकृत KYC प्रतिनिधीला समोरासमोर भेटल्याविना पेटीएम KYC करू नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पेटीएम यासाठी कॉल करत नाही किंवा कोणतेही ऍप डाउनलोड करावे लागत नाही.

The post सावधान: पेटीएम वर KYC बद्दल होत फसवणूक, रहा सावध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आजकल इंटरनेट स्कॅमबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती असते. आता याच्या जाळ्यात मोबाईल पेमेंट कंपनी Paytm चे यूजर्स अडकत आहेत यासाठी कंपनीने सावधानतेचा इशारा दिला आहे. या सूचनेत यूजर्सना KYC मध्ये होणाऱ्या फसवणुकीच्या मेसेज पासून सावध राहण्यास सांगितले आहे.

यासाठी कंपनीने वॉर्निंग मध्ये लिहिले आहे कि जर तुम्हाला Paytm KYC करण्यासाठी एखादा एसएमएस किंवा कॉल आला असेल आणि एखादा ऍप डाउनलोड करण्यास सांगितले गेले असेल तर त्यावर विश्वास ठेऊ नये. तुमची माहिती मिळवण्यासाठी तुमची केलेली हि फसवणूक आहे. गेल्या काही महिन्यांपासून फसवणुकीची हि पद्धत वापरली जात आहे.

येत आहे असा फ्रॉड मेसेज

Paytm KYC साठी वेगवेगळ्या पद्धतीने फ्रॉड मेसेज केले जात आहेत. यातील काहींमध्ये लिहिलेले असते कि जर तुम्ही तुमची KYC केली नाही तर तुम्ही पेटीएम अकाउंट वापरू शकणार नाही. इतकेच नव्हे तर फ्रॉड मेसेज मध्ये असे पण लिहिलेले असते कि KYC पूर्ण होईपर्यंत तुमच्या पेटीएम अकाउंट वरून काही पैसे होल्ड वर राहतील.

इथे करा KYC

पेटीएम KYC फक्त अधिकृत KYC पॉइंट्स वर जाऊन किंवा पेटीएम प्रतिनिधीला घरी बोलवून पूर्ण केली जाते. तर सर्वात महत्वाची बाब म्हणजे KYC साठी कोणत्याप्रकारचे शुल्क घेतले जात नाही आणि जर शुल्क घेतले गेल्यास तुम्ही पेटीएम कस्टमर केयर वर कॉल करून याची तक्रार करू शकता. विशेष म्हणजे कोणत्याही अधिकृत KYC प्रतिनिधीला समोरासमोर भेटल्याविना पेटीएम KYC करू नये आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पेटीएम यासाठी कॉल करत नाही किंवा कोणतेही ऍप डाउनलोड करावे लागत नाही.

फसवणूक टाळण्याचे उपाय

पेटीएम चा कर्मचारी यूजर कडून ओटीपी, पिन, पासवर्ड, पासवर्ड रीसेट लिंक, डेबिट/क्रेडिट कार्ड सीवीवी, पिन किंवा बॅंक डीटेल्स मागू शकत नाही. त्यामुळे पर्सनल डीटेल्स कोणाला देऊ नये.

The post सावधान: पेटीएम वर KYC बद्दल होत फसवणूक, रहा सावध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/paytm-is-giving-advisory-kyc-warning-to-its-users/feed/ 0