OTT Releases this Week: या आठवड्यात ओटीटीवर Godfather, Dharavi Bank सह पाहा साऊथचे हे जबरदस्त चित्रपट

New OTT Releases this Week: ओटीटी प्लॅटफॉर्मवर मुव्हीज आणि वेब सीरीज बघायला आवडणाऱ्या लोकांसाठी हा विकेंड खूप खास ठरणार आहे. नोव्हेंबरच्या या आठवड्यात ओटीटीवर आठपेक्षा जास्त चित्रपट रिलीज होत आहेत. ओटीटीवर ‘Christmas With You’, ‘Christmas in Love’ आणि ‘The Santa Clauses’ सारख्या क्रिसमस-थीम चित्रपटांसह ‘The Twelve’ कोर्ट रूम ड्रामा देखील तयार आहे. इतकंच नव्हे तर, सुनील शेट्टी आणि विवेक ओबेरॉय यांचा बहुप्रतीक्षित ‘Dharavi Bank’ देखील ओटीटीवर येण्यासाठी तयार आहे. मेगास्टार चिरंजीवी स्टारर ‘गॉडफादर’ 19 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होईल.

Godfather

मेगास्टार चिरंजीवीचा चित्रपट Godfather रिलीजच्या आधीपासून खूप चर्चेत होता. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीजसाठी तयार आहे. मोहन के राजा द्वारे दिग्दर्शित हा चित्रपट मल्याळम ब्लॉकबस्टर Lucifer चा रीमेक आहे. शानदार ओपनिंग मिळून देखील चित्रपट ब्लॉकबस्टर झाला नाही. यात सुपरस्टार नयनतारा, सत्यदेव, मुरली शर्मा, सुनील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात बॉलीवुड स्टार सलमान खानचा देखील एक स्पेशल रोल आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 19 नोव्हेंबर, 2022 ला रिलीज होत आहे.

Sardar

पीएस मिथरन द्वारे दिग्दर्शित सरदार (Sardar) अ‍ॅक्शन स्पाय थ्रिलर आहे ज्यात कार्थी शिवकुमार दुहेरी भूमिकेत आहे. सरदारची गोष्ट प्रसिद्ध पोलीस इंस्पेक्टर विजय कुमारच्या पिता-पुत्र जोडीची आहे. चित्रपटात राशी खन्ना, राजिशा विजयन आणि चंकी पांडे महत्वपूर्ण भूमिका करत आहेत. सरदारना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Aha वर 18 नोव्हेंबर, 2022 ला रिलीज होत आहे.

Iravatham

इरावथम (Iravatham) मध्ये तन्वी नेगी आणि अमरदीप मुख्य भूमिकेत आहे. हा सुहास मीरा द्वारे दिग्दर्शित एक तेलुगू मिस्ट्री- थ्रिलर आहे, ज्यात महत्वाकांक्षी ब्यूटीशियनची गोष्ट सांगण्यात आली आहे. तिच्या जीवनाला तेव्हा वेगळं वळण मिळतं जेव्हा तिचा प्रियकर एक कॅमेरा भेट म्हणून देतो. यात स्वतःला कैद करण्याचा प्रयत्न जेव्हा ती करते तेव्हा इमेज तिला हैराण करते.हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टार वर 17 नोव्हेंबर, 2022 ला रिलीज झाला आहे.

Anel Meley Pani Thuli

अनेल मेले पानी थुली कैसर आनंद द्वारे दिग्दर्शित तामिळ क्राइम थ्रिलर आहे. यात एंड्रिया जेरेमिया आणि आधव कन्नदासन यांची भूमिका आहे. गोष्ट एका महिलेच्या भोवताली फिरते जिच्यावर एका अज्ञात पुरुषाकडून जंगलात लैंगिक अत्याचार केला जातो. पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा त्या गुन्हेगारांची ओळख पटवण्याची वेळ येते तेव्हा तिला तो चेहरा आठवत नाही. कशाप्रकारे पोलिसांच्या मदतीनं गुन्हेगार पकडला जातो, हे बघण्यालायक आहे. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म SonyLIV वर 18 नोव्हेंबर 2022 रिलीज होत आहे.

Dharavi Bank

ही सुनील शेट्टी आणि विवेक आनंद ओबेरॉय यांची थ्रिलर वेब सीरीज आहे. यात कुटुंबाची ताकद, कर्तव्य आणि सन्मानासाठी संघर्ष आणि विजय यांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ही सीरीज एमएक्स प्लेयरवर 19 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. थलाइव्हन सर्वात मोठ्या गुन्हेगारी सिंडिकेट ‘धारावी बँक’ ला सांभाळतो.

याव्यतिरिक्त, वीकेंडवर The Wonder ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 16 नोव्हेंबर पासून बघता येईल. Slumberland अमेरिकन फँटसी अ‍ॅडवेंचर आहे, जो Netflix वर 18 नोव्हेंबरला रिलीज होत आहे. Wonder Women तुम्ही SonyLIV वर 18 नोव्हेंबरपासून बघू शकता. Christmas with You ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 17 नोव्हेंबरला आला आहे, तर 2 Hearts देखील तुम्ही नेटफ्लिक्सवर या वीकेंडला बघू शकता.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here