अनोळखी नंबरवरून येणारे कॉल्स उचलणं सर्वानांच आवडत नाही. त्यावर उपाय म्हणून ट्रूकॉलर सारख्या अॅप्सची मदत घेतली जाते. हे अॅप आपली मदत करतात परंतु आपला खाजगी डेटा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट सुरक्षित राहत नाही. तसेच वारंवार येणाऱ्या पॉप-अपचा वेगळाच त्रास होतो. परंतु आता येत्या काही दिवसात हे बदलू शकतं, भारतात कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाइल नंबरसह त्या व्यक्तीचे नाव देखील दिसेल. हे TRAI Caller ID System अंतगर्त होईल जी पूर्णपणे KYC Based असेल.
TRAI Caller ID System
ट्राय कॉलर आयडी सिस्टम भारत सरकारची नवीन योजना आहे जिच्यावर सध्या विचार सुरु आहे. सर्व मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असावेत तसेच जेव्हा एखादी व्यक्ती कोणाला कॉल करत असेल तेव्हा समोरच्या व्यक्तीकडे फक्त कॉल करणाऱ्याचा मोबाइल नंबर नव्हे तर नंबरसह कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसावं अशी Telecom regulatory authority of india ची योजना आहे. हे तेच नाव असेल जे Adhaar Card वर असेल. हे देखील वाचा: OTT Releases this Week: या आठवड्यात ओटीटीवर Godfather, Dharavi Bank सह पाहा साऊथचे हे जबरदस्त चित्रपट
ट्राय कॉलर आयडीचा फायदा
ट्राय कॉलर आयडी सिस्टममध्ये कोणाचा फोन आल्यावर त्याचा नंबर आणि नाव दोन्ही स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे कॉल रिसीव करण्याआधी लोकांना त्यांना फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव समजेल. हा नियम लागू झाल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख लपून राहणार नाही आणि त्यामुळे फसवणुकीच्या घटना कमी होतील. भारत सरकारच्या या नियमानंतर ट्रूकॉलर सारख्या थर्ड पार्टी अॅप्सची गरज भासणार नाही.
भारत सरकारची योजना
टेलीकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ऑफ इंडिया येत्या तीन आठवड्यात आपल्या नव्या योजनेची घोषणा करू शकते. रिपोर्टनुसार ही पूर्णपणे केवायसी बेस्ड प्रक्रिया असेल. ज्या व्यक्तीच्या नावावर एखादं सिम कार्ड (Sim Card) इश्यू झालं असेल, त्या मोबाइल नंबरद्वारे कॉल केल्यावर तेच नाव दुसऱ्या व्यक्तीच्या फोनमध्ये दिसेल. हे देखील वाचा: काही मिनिटांत फुलचार्ज होईल विवोचा हा सुंदर फोन; कमी किंमतीत 12GB RAM सह 50MP Camera
सध्या अंदाज लावला जात आहे की हे नाव स्वतःहून बदलता येणार नाही तसेच आधार कार्ड किंवा ज्या ओळखपत्राच्या मदतीनं सिम विकत घेतलं असेल, तेच नाव TRAI Caller ID System मध्ये नोंदवलं जाईल. सध्यातरी ट्रायच्या या नव्या योजनेविषयी अधिकृत माहिती समोर आली नाही. आशा आहे की येत्या काही दिवसांत भारतात लागू होणाऱ्या या नियमाविषयी सरकारकडून माहिती दिली जाईल.
लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.