Vivo Y76s (t1 version) स्मार्टफोन चीनमध्ये लाँच

विवो मोबाइल फोन Vivo Y76s (t1 version) बद्दल दोन दिवसांपूर्वी लीक समोर आलं होतं की कंपनी आपल्या नवीन मोबाइल फोनवर काम करत आहे जो लवकरच मार्केटमध्ये सादर केला जाईल. त्यानुसार आज विवोनं कोणताही गाजावाजा न करता हा नवीन विवो स्मार्टफोन कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये लाँच केला आहे. Vivo Y76s (t1 version) स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झाला आहे जो 50MP Camera, 12GB RAM, MediaTek Dimensity 700 चिपसेट आणि 44W Fast Charging सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो.

Vivo Y76s (t1 Version) Specifications

विवो वाय76एस (टी1 व्हर्जन) चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 2408 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.58 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. या फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 60हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. यात वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन आहे जिच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: Jio नंतर आता Airtel नं देखील दिला ग्राहकांना धक्का; लोकांच्या आवडीचे 4 प्लॅन केले बंद

Vivo Y76s (t1 Version) अँड्रॉइड 12 वर आधारित फनटच ओएसवर चालतो. प्रोसेसिंगसाठी हा स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 700 चिपसेटवर चालतो. चीनी मार्केटमध्ये हा स्मार्टफोन 12 जीबी रॅमसह लाँच करण्यात आला जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो.

विवो वाय76एस (टी1 व्हर्जन) फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा विवो मोबाइल 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo Y76s (t1 Version) ड्युअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी जिथे मोबाइलच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आलं आहे तर पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,100एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो जी 44वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. हे देखील वाचा: 4 किंवा 6 नव्हे तर तब्बल 12GB RAM सह Vivo V21s 5G ची एंट्री; कॅमेरा देखील आहे पावरफुल

Vivo Y76s (t1 version) Price

विवो वाय76एस (टी1 व्हर्जन) चीनी मार्केटमध्ये सिंगल व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत 1899 युआन आहे जे 21,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होतात. चीनमध्ये हा विवो स्मार्टफोन Star Diamond White, Galaxy White आणि Starry Night Black कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here