Lava Blaze 2 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 10 Apr 2023 07:32:36 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8999 रुपयांमध्ये स्वदेसाठी LAVA Blaze 2 लाँच; मिळेल 6GB RAM सह 5000mAh ची दणकट बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-price-in-india-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-price-in-india-and-specifications/#respond Mon, 10 Apr 2023 07:32:36 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20149 इंडियन मोबाइल कंपनी लावानं आज बाजारात आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे जो LAVA Blaze 2 नावानं लाँच झाला आहे. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो 13MP Dual Camera, 6GB RAM, Unisoc T616 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारखेच स्पेसिफिकेशन्स 8,999 रुपयांमध्ये देतो. पुढे तुम्ही लावा ब्लेज 2 ची प्राइस, सेल, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती […]

The post 8999 रुपयांमध्ये स्वदेसाठी LAVA Blaze 2 लाँच; मिळेल 6GB RAM सह 5000mAh ची दणकट बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • LAVA Blaze 2 ची किंमत 8999 रुपयांपासून सुरु होते.
  • हा फोन 5GB Virtual RAM ला सपोर्ट करतो.
  • लावा ब्लेज 2 ची विक्री 18 एप्रिलपासून सुरु होईल.

इंडियन मोबाइल कंपनी लावानं आज बाजारात आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे जो LAVA Blaze 2 नावानं लाँच झाला आहे. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो 13MP Dual Camera, 6GB RAM, Unisoc T616 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारखेच स्पेसिफिकेशन्स 8,999 रुपयांमध्ये देतो. पुढे तुम्ही लावा ब्लेज 2 ची प्राइस, सेल, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेऊ शकता.

लावा ब्लेज 2 ची किंमत व सेल

LAVA Blaze 2 स्मार्टफोन सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या मोबाइल फोनमध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे जो 128जीबी स्टोरेजसह येतो. लावा ब्लेज 2 ची भारतातील किंमत 8,999 रुपये आहे. हा फोन Glass Blue, Glass Black आणि Glass Orange कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल, जो 18 एप्रिलपासून विकत घेता येईल.

लावा ब्लेज 2 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ Display, 90Hz Refresh Rate
  • Unisoc T616 SoC
  • 6GB RAM + 128GB Memory
  • 13MP AI Camera
  • 18W Charging, 5,000mAh Battery

LAVA Blaze 2 स्मार्टफोन पंच-होल डिजाईन असेल्या डिस्प्लेसह आला आहे. फोनमध्ये 6.5 इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंचहोल आहे.

लावा ब्लेज 2 मध्ये प्रोसेसिंगसाठी Unisoc T616 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. कंपनीच्या हा दाव्यानुसार या चिपसेटने 255298 एनटूटू स्कोर मिळवला आहे जो 10 हजारांच्या बजेटमध्ये MediaTek Helio G85 आणि Helio G88 ला मागे टाकतो. हा लावा मोबाइल 5जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे इंटरनल 6जीबी रॅम 11जीबी पर्यंत बूस्ट करता येतो.

फोटोग्राफीसाठी यह लावा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह चालतो. LAVA Blaze 2 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तर एवढी मोठी बॅटरी त्वरित चार्ज करण्यासाठी कंपनीनं हा मोबाइल 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे.

The post 8999 रुपयांमध्ये स्वदेसाठी LAVA Blaze 2 लाँच; मिळेल 6GB RAM सह 5000mAh ची दणकट बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-price-in-india-and-specifications/feed/ 0
स्वदेशी Lava Blaze 2 भारतीय लाँचसाठी सज्ज; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला फोन https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-india-launch-teased-on-amazon-availability-key-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-india-launch-teased-on-amazon-availability-key-specifications/#respond Fri, 31 Mar 2023 12:16:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19945 Lava आपला नवीन फोन भारतीय बाजारात लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. स्वदेशी कंपनीचा नवीन फोन Lava Blaze 2 नावानं सादर केला जाईल. याची पुष्टी ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावरील लिस्टिंगच्या माध्यमातून झाली आहे. तसेच अ‍ॅमेझॉनवर फोनसाठी एक मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे, जिथून डिवाइसच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्ससह फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. परंतु अजूनही या फोनच्या अधिकृत […]

The post स्वदेशी Lava Blaze 2 भारतीय लाँचसाठी सज्ज; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Lava Blaze 2 ची विक्री अ‍ॅमेझॉन इंडियावरून केली जाईल.
  • फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम असेल.
  • स्मार्टफोनमध्ये 90 हर्ट्ज एचडी+ पंच होल डिस्प्ले असेल.

Lava आपला नवीन फोन भारतीय बाजारात लाँच करण्यासाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. स्वदेशी कंपनीचा नवीन फोन Lava Blaze 2 नावानं सादर केला जाईल. याची पुष्टी ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉन इंडियावरील लिस्टिंगच्या माध्यमातून झाली आहे. तसेच अ‍ॅमेझॉनवर फोनसाठी एक मायक्रोसाइट बनवण्यात आली आहे, जिथून डिवाइसच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्ससह फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. परंतु अजूनही या फोनच्या अधिकृत लाँच डेटची माहिती मिळाली नाही.

लावा ब्लेज 2 ची डिजाइन

या आगामी डिवाइसची डिजाइन पाहता यात फ्लॅट-एज डिजाइन दिली जाईल. तसेच फोनच्या डिस्प्लेवर वरच्या बाजूला मध्यभागी पंच होल दिला जाईल, ज्यात फ्रंट कॅमेरा असेल. तसेच, मागे दोन मोठे कॅमेरा रिंग असतील ज्यात दोन सेन्सर असतील. तुम्हाला माहित असेल की लावा ब्लेज 2 पूर्वी कंपनीनं Blaze सीरीजमध्ये Lava Blaze NXT, Lava Blaze Pro आणि Lava Blaze 5G स्मार्टफोन्स सादर केले आहेत. हे देखील वाचा: 16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह लाँच होईल OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन

लावा ब्लेज 2 ची किंमत असेल 10,000 रुपयांपेक्षा कमी

Lava चा दावा आहे की AnTuTu स्कोरच्या आधारावर Lava Blaze 2 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये सर्वात फास्ट स्मार्टफोन असेल. त्यामुळे या फोनची किंमत 10 हजार रुपयांच्या आत असेल, असा अंदाज लावला जात आहे. कंपनीनं हे देखील सांगितलं आहे की डिवाइस 6GB रॅमसह बाजारात येईल. तसेच हा व्हर्च्युअल रॅम फीचरला देखील सपोर्ट करेल आणि युजर्स कडे 5GB व्हर्च्युअल रॅम मिळवण्याचा ऑप्शन असेल.

लावा ब्लेज 2 चे स्पेसिफिकेशन्स

अ‍ॅमेझॉन लिस्टिंगनुसार, फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला HD+ 6.5-इंचाचा डिस्प्ले असेल. तसेच फोनमध्ये 6GB रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम मिळेल, जोडीला 128GB UFS मेमरी दिली जाईल. इतकेच नव्हे तर यात 12nm प्रोसेस वर बनेलला प्रोसेसर देण्यात येईल, ज्याला Antutu बेंचमार्किंगवर 250K+ स्कोर मिळाला आहे. कंपनीनं याला अल्ट्रा फास्ट प्रोसेसर म्हटलं असलं तरी नावाचा खुलासा अद्याप केला नाही. त्याचबरोबर फोन 18W फास्ट चार्जर टाइप-सी यूएसबी केबलसह येईल. हे देखील वाचा: फ्री IPL बघण्यासाठी बेस्ट आहेत जास्त डेटा असलेले Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ प्लॅन

लावा ब्लेज 2 अलीकडेच गीकबेंच बेंचमार्क डेटाबेसवर दिसला होता जिथून माहिती मिळाली होती की हा फोन एका यूनीएसओसी प्रोसेसर आणि 6 जीबी रॅमसह बाजारात येऊ शकतो. तसेच गीकबेंच लिस्टिंगनुसार, ब्लेज सीरीजचा अपकमिंग स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर चालू शकतो.

The post स्वदेशी Lava Blaze 2 भारतीय लाँचसाठी सज्ज; अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/lava-blaze-2-india-launch-teased-on-amazon-availability-key-specifications/feed/ 0