फ्री IPL बघण्यासाठी बेस्ट आहेत जास्त डेटा असलेले Airtel, Jio आणि Vi चे ‘हे’ प्लॅन

Highlights

 • 31 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात होणार आहे.
 • यंदा Jio Cinema वर ऑनलाइन मोफत आयपीएलचे सामने बघता येतील.
 • 4K स्ट्रीमिंगचा पर्याय असल्यामुळे सामने बघण्यासाठी भरपूर डेटा लागू शकतो.

इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात आजपासून म्हणजे 31 मार्चपासून होणार आहे. यंदा आयपीएलचा 16वा सीजन (IPL-16) मोबाइल फोन, लॅपटॉप आणि टीव्हीवर मोफत लाइव्ह स्ट्रीम करता येईल. परंतु मॅच बघण्यासाठी युजर्सना जास्त इंटरनेट डेटाची आवश्यकत असेल. त्यामुळे आम्ही डेली 3GB डेटा असलेल्या रिचार्ज प्लॅन्सची माहिती देणार आहोत. पुढील आर्टिकलमध्ये एयरटेल, जियो, वोडाफोन आयडिया युजर्ससाठी बेस्ट IPL प्लॅनची माहिती देण्यात आली आहे.

नोट: इंडस्ट्री एक्सपर्ट्सनुसार 3 तासांची मॅच मोबाइलवर बघण्यासाठी कमीत कमी 2 जीबी डेटा आवश्यक असेल.

Airtel युजर्ससाठी बेस्ट IPL प्लॅन

 • Airtel Rs 499 Plan
 • Airtel Rs 699 Plan

एयरटेलचा 499 रुपयांचा प्लॅन: 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह डेली 3GB डेटा मिळतो. तसेच Airtel तीन महिन्यांचे Disney+ Hotstar मोबाइल आणि Airtel Xtreme अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन देत आहे. त्याचबरोबर प्लॅनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली 100 एसएमएसचा लाभ घेता येईल.

एयरटेलचा 699 रुपयांचा प्लॅन: एयरटेल 3GB रिचार्ज प्लॅनची किंमत 699 रुपये आहे आणि हा 56 दिवसांची वैधता व डेली 3GB डेटासह येतो. या प्लॅनमध्ये 56 दिवसांची Amazon Prime मेंबरशिप मिळते. त्याचबरोबर फ्री कॉलिंग आणि डेली 100 एसएमएसचा लाभ घेता येतो.

नोट: अन्य बेनिफिट्स पाहता एयरटेलच्या दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5जी डेटा, अपोलो 24×7 सर्कल सब्सक्रिप्शन, फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक, फ्री हेलो ट्यून मिळते.

Jio युजर्ससाठी बेस्ट IPL प्लॅन

jio 5g works on 4g sim

 • Jio Rs 219 Plan
 • Jio Rs 399 Plan
 • Jio Rs 999 Plan

जियोचा 219 रुपयांचा प्लॅन: रिलायन्स जियोच्या 219 रुपयांच्या रिचार्जमध्ये डेली 3GB डेटासह 14 दिवसांची वैधता दिली जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ घेत येतो. तसेच या प्लॅनमध्ये एकूण 44GB डेटा मिळतो.

जियोचा 399 रुपयांचा प्लॅन: Jio च्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह डेली 3GB हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळतो. तसेच या प्लॅनमध्ये 6GB अतिरिक्त डेटा ऑफर केला जात आहे. त्यामुळे प्लॅनमध्ये एकूण 90GB डेटा युजर्सना मिळेल. रिचार्जमध्ये डेटा व्यतिरिक्त अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस देखील दिले जात आहेत.

जियोचा 999 रुपयांचा प्लॅन: Jio च्या या प्लॅनची किंमत 999 रुपये आहे आणि यात देखील डेली 3GB डेटा मिळतो. हा पॅक 40 जीबी अतिरिक्त डेटा सह अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएसचा फायदा देतो.

नोट: या तिन्ही प्लॅनमध्ये ग्राहक इंटरनेट अनलिमिटेड 5G डेटा वापरू शकतील. तसेच जियो अ‍ॅप्सचं सब्सक्रिप्शन देखील मोफत मिळेल.

Vi युजर्ससाठी बेस्ट IPL प्लॅन

 • Vi Rs 359 Plan
 • Vi Rs 499 Plan
 • Vi Rs 601 Plan
 • Vi Rs 699 Plan
 • Vi Rs 901 Plan

वोडाफोन आयडियाचा 359 रुपयांचा प्लॅन: Vi च्या सर्वात किफायतीशीर 3GB डेटा पॅक ची किंमत 359 रुपये आहे. हा 28 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि 3GB डेली डेटा यात मिळतो. तसेच पॅकमध्ये 2GB डेटा डिलाइटचा फायदा मिळतो, जो तुमचा डेली डेटा संपल्यावर सक्रिय होतो. तसेच 359 रुपयांच्या Vi प्रीपेड प्लॅनसह भारतात रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अनलिमिटेड डेटा वापरता येतो. त्याचबरोबर यात डेटा रोलओव्हर, अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि डेली 100 एसएमएस देखील मिळतात. प्लॅनमध्ये विआय मुव्हीज आणि टीव्ही सब्सक्रिप्शनचा देखील समावेश आहे.

वोडाफोन आयडियाचा 499 रुपयांचा प्लॅन: विआय 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल, दररोज 100 एसएमएस आणि 28 दिवसांची वैधता मिळते. त्याचबरोबर रिचार्जमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर, ‘बिंज ऑल नाइट’ सारखे फायदे आणि प्रत्येक महिन्याला 2GB बॅकअप डेटा मिळतो. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये तीन महिन्यांचं डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइल सब्सक्रिप्शन मिळत आहे.

वोडाफोन आयडियाचा 601 रुपयांचा प्लॅन: या प्लॅनमध्ये डेली 3GB डेटा सोबतच 16जीबी एक्सट्रा डेटा मिळतो. तसेच एक वर्षाचं डिज्नी प्लस हॉटस्टार सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे. तसेच कंपनीनं विकेंड डेटा रोलओव्हर, ‘बिंज ऑल नाइट’ आणि 2GB बॅकअप डेटाचा समावेश देखील केला आहे. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

वोडाफोन आयडियाचा 699 रुपयांचा प्लॅन: विआय 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल, दररोज 100 एसएमएस आणि 56 दिवसांची वैधता मिळते. तसेच विकेंड डेटा रोलओव्हर, ‘बिंज ऑल नाइट’ आणि 2GB बॅकअप डेटाचा देखील मिळतो.

वोडाफोन आयडियाचा 901 रुपयांचा प्लॅन: विआयचा 699 रुपयांचा प्लॅन दररोज 3 जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल, दररोज 100 एसएमएस आणि 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. तसेच रिचार्जमध्ये विकेंड डेटा रोलओव्हर, ‘बिंज ऑल नाइट’ आणि 2GB बॅकअप देता देखील कंपनी देत आहे. जोडीला एक वर्षाचं डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाइल सब्सक्रिप्शन आणि 16जीबी एक्सट्रा डेटा देखील मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here