16GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह लाँच होईल OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन

Highlights

  • OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन भारतात 4 एप्रिलला लाँच होईल.
  • हा फोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 695 प्रोसेसरसह मार्केटमध्ये येईल.
  • OnePlus चा हा फोन 8GB रॅमसह 27,999 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो.

OnePlus लवकरच भारतात OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीनं कंफर्म केलं आहे की हा फोन भारतीय बाजारात 4 एप्रिलला लाँच केला जाईल. वनप्लसचा हा फोन 2023 मध्ये लाँच होणारा सर्वात अफोर्डेबल 5G स्मार्टफोन आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या फोनवर आहेत. लाँचपूर्वीच वनप्लसच्या या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि किंमतीची माहिती समोर आली आहे. त्यानुसार हा फोन 16GB रॅम (8GB+8GB) आणि आणि 108MP कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. चला जाणून घेऊया वनप्लसच्या या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमतीची आतापर्यंत आलेली माहिती.

OnePlus Nord CE 3 Lite 5G लाँच डेट

कंपनीनं कंफर्म केलं आहे की हा फोन भारतात 4 एप्रिलला एका इव्हेंटमध्ये लाँच केला जाईल. वनप्लसनं या इव्हेंटला ‘लार्जर दॅन लाइफ – अ वनप्लस नॉर्ड लाँच इव्हेंट’ असं नाव दिलं आहे. वनप्लसचा हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. कंपनी यादिवशी OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनसह वायरलेस इयरबड्स OnePlus Nord Buds 2 देखील लाँच करेल. हा इव्हेंट वनप्लसच्या ऑफिशियल सोशल मीडिया साइट आणि युट्युब चॅनेलवर लाइव्ह बघता येईल.

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्पेसिफिकेशन्स

  • 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले
  • 108 MP + 2 MP + 2 MP रियर कॅमेरा सेटअप
  • 16 MP सेल्फी कॅमेरा
  • Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर
  • 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज
  • 5000mAh बॅटरी, 67W फास्ट चार्जिंग

डिस्प्ले

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनचे महत्वाचे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक झाले आहेत तर काही कंपनीनं वेबसाइट लिस्टिंगमधून कन्फर्म केले आहेत. कंपनीच्या मायक्रोसाइटनुसार या फोनमध्ये 6.72-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. त्याचबरोबर वनप्लसच्या या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट दिली जाईल.

कॅमेरा

OnePlus च्या आगामी Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोन बाबत बोललं जात आहे की यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, ज्यात दोन कॅमेरा रिंग आहेत. पहिल्या रिंगमध्ये फोनचा 108MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, जो 3X झूमला सपोर्ट करतो. दुसऱ्या रिंगमध्ये दोन कॅमेरा सेन्सर असतील, ज्यात 2MP चा डेप्थ आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा असू शकतो. रियर पॅनलमध्ये कॅमेरारिंग सह LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

प्रोसेसर

वनप्लसनं कंफर्म केलं आहे की हा आगामी फोन Qualcomm च्या Snapdragon 695 प्रोससरसह मार्केटमध्ये एंट्री करेल. तसेच कंपनीनं सांगितलं आहे की फोनमध्ये 8GB LPDDR4x RAM असेल. जोडीला 8GB व्हर्च्युअल रॅम मिळून फोनमध्ये एकूण 16GB रॅमची पावर मिळेल. लीक रिपोर्ट्सनुसार हा फोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये लाँच होईल आणि फोनमध्ये 128GB स्टोरेज मिळू शकते.

बॅटरी

OnePlus Nord CE 3 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. तसेच हा फोन 67W फास्ट चार्जला सपोर्टसह सादर केला जाईल. कंपनीचा दावा आहे की हा फोन फक्त 30 मिनिटांच्या चार्जमध्ये फुल डे बॅटरी बॅकअप देतो.

कनेक्टिव्हिटी आणि अन्य फीचर्स

OnePlus चा आगामी अफोर्डेबल 5G स्मार्टफोन Android 13 आधारित OxygenOS 13 कस्टम स्किनवर चालू शकतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi 802.11ac, Bluetooth 5.1, आणि USB Type-C पोर्टचा सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. या फोनचा बॅक पॅनल पॉलीकार्बोनेट मॅटेरियलपासून बनवण्यात येऊ शकतो.

OnePlus Nord CE 3 Lite 5G किंमत (लीक)

लीक रिपोर्ट्सनुसार, OnePlus Nord CE 3 Lite 5G भारतात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह 21,999 रुपयांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. फोनची सेलिंग प्राइस थोडी कमी असू शकते. वनप्लसचा हा फोन दोन कलर व्हेरिएंट – पॅस्टेल लाइम आणि क्रोमॅटिक ग्रे ऑप्शनमध्ये लाँच केला जाईल.

SourceOnePlus

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here