8999 रुपयांमध्ये स्वदेसाठी LAVA Blaze 2 लाँच; मिळेल 6GB RAM सह 5000mAh ची दणकट बॅटरी

Highlights

  • LAVA Blaze 2 ची किंमत 8999 रुपयांपासून सुरु होते.
  • हा फोन 5GB Virtual RAM ला सपोर्ट करतो.
  • लावा ब्लेज 2 ची विक्री 18 एप्रिलपासून सुरु होईल.

इंडियन मोबाइल कंपनी लावानं आज बाजारात आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे जो LAVA Blaze 2 नावानं लाँच झाला आहे. हा एक लो बजेट स्मार्टफोन आहे जो 13MP Dual Camera, 6GB RAM, Unisoc T616 प्रोसेसर आणि 5,000mAh Battery सारखेच स्पेसिफिकेशन्स 8,999 रुपयांमध्ये देतो. पुढे तुम्ही लावा ब्लेज 2 ची प्राइस, सेल, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेऊ शकता.

लावा ब्लेज 2 ची किंमत व सेल

LAVA Blaze 2 स्मार्टफोन सध्या सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या मोबाइल फोनमध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे जो 128जीबी स्टोरेजसह येतो. लावा ब्लेज 2 ची भारतातील किंमत 8,999 रुपये आहे. हा फोन Glass Blue, Glass Black आणि Glass Orange कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल, जो 18 एप्रिलपासून विकत घेता येईल.

लावा ब्लेज 2 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.5″ HD+ Display, 90Hz Refresh Rate
  • Unisoc T616 SoC
  • 6GB RAM + 128GB Memory
  • 13MP AI Camera
  • 18W Charging, 5,000mAh Battery

LAVA Blaze 2 स्मार्टफोन पंच-होल डिजाईन असेल्या डिस्प्लेसह आला आहे. फोनमध्ये 6.5 इंचाची एचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालतो. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंचहोल आहे.

लावा ब्लेज 2 मध्ये प्रोसेसिंगसाठी Unisoc T616 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. कंपनीच्या हा दाव्यानुसार या चिपसेटने 255298 एनटूटू स्कोर मिळवला आहे जो 10 हजारांच्या बजेटमध्ये MediaTek Helio G85 आणि Helio G88 ला मागे टाकतो. हा लावा मोबाइल 5जीबी व्हर्च्युअल रॅमला देखील सपोर्ट करतो त्यामुळे इंटरनल 6जीबी रॅम 11जीबी पर्यंत बूस्ट करता येतो.

फोटोग्राफीसाठी यह लावा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो सेकंडरी एआय लेन्ससह चालतो. LAVA Blaze 2 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. तर एवढी मोठी बॅटरी त्वरित चार्ज करण्यासाठी कंपनीनं हा मोबाइल 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here