Mobile App - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 07 Feb 2023 04:48:08 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 भारत सरकारनं घातली 232 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; लोन आणि सट्टेबाजीवर डिजिटल स्ट्राइक https://www.91mobiles.com/marathi/india-bans-over-230-betting-an-loan-app-chinese-links/ https://www.91mobiles.com/marathi/india-bans-over-230-betting-an-loan-app-chinese-links/#respond Tue, 07 Feb 2023 04:48:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17537 गृह मंत्रालय (एमएचए) च्या शिफारशीवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चीनशी संबंधित 138 बेटिंग अ‍ॅप्स आणि 94 लोन देणारे अ‍ॅप्स बॅन केले आहेत. सरकारनं IT Act Section 69 अंतगर्त एकूण 230 अ‍ॅप्स भारतात बॅन केले आहेत. सूत्रांनुसार, याची पुष्टी उच्च सरकारी अधिकाऱ्यांनी केली आहे. जबरदस्तीने वसुली आणि युजर्सच्या छळाच्या अनेक तक्रारी आल्यामुळे सरकारनं ही कारवाई […]

The post भारत सरकारनं घातली 232 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; लोन आणि सट्टेबाजीवर डिजिटल स्ट्राइक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • केंद्र सरकारनं 138 betting apps आणि 94 लोन अ‍ॅप बॅन केले आहेत.
  • हे अ‍ॅप्स सरकारनं IT Act Section 69 अंतगर्त बॅन केले आहेत.
  • जबरदस्तीने पैसे वसुली आणि युजर्सचा छळ केल्याच्या अनेक तक्रारी आल्यामुळे कारवाई.

गृह मंत्रालय (एमएचए) च्या शिफारशीवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चीनशी संबंधित 138 बेटिंग अ‍ॅप्स आणि 94 लोन देणारे अ‍ॅप्स बॅन केले आहेत. सरकारनं IT Act Section 69 अंतगर्त एकूण 230 अ‍ॅप्स भारतात बॅन केले आहेत. सूत्रांनुसार, याची पुष्टी उच्च सरकारी अधिकाऱ्यांनी केली आहे. जबरदस्तीने वसुली आणि युजर्सच्या छळाच्या अनेक तक्रारी आल्यामुळे सरकारनं ही कारवाई केल्याची चर्चा आहे.

अ‍ॅप्सचा संबंध चीनशी

हे अ‍ॅप चीनी नागरिकांचे होते ज्यांनी कथितरित्या भारतीयांना कामाला ठेवलं होतं आणि त्यांना प्रमुख निर्देशक बनवलं होतं. रिपोर्ट्सनुसार, हताश लोकांना कर्जाचं अमिश दाखवलं जात होतं आणि आणि मग त्यांच्याकडून वर्षाला 3,000 टक्के पर्यंतची व्याज वसुली केली जात होती. जेव्हा ग्राहक व्याज चुकतं करू शकत नव्हते तेव्हा या अ‍ॅप्सचे प्रतिनिधी त्यांना त्रास देण्यास सुरु करत. हे देखील वाचा: वनप्लसपेक्षा स्वस्त झाला Samsung Galaxy S22, जुना स्टॉक संपवण्यासाठी किंमतीत मोठी कपात

अ‍ॅप्सचे अनेक प्रतिनिधी ग्राहकांना धमकी देत की ते कर्ज घेणाऱ्या लोकांचे मॉर्फ्ड फोटोज प्रसिद्ध करू शकतात आणि त्यांना बदनाम करू शकतात. हे प्रकरण अनेक आत्महत्या झाल्यानंतर उघडकीस आलं. खासकरून आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये, ज्या लोकांनी अशाप्रकारच्या अ‍ॅप्सकडून कर्ज घेतलं आणि सट्टेबाजीच्या अ‍ॅपवर पैसे गमावले. सूत्रांच्या माहितीनुसार, तेलंगणा, ओरिसा आणि उत्तर प्रदेश सारख्या राज्यांसह केंद्रीय गुप्तहेर एजन्सीनी केंद्रीय गृह मंत्रालयाला अ‍ॅप विरोधात कारवाई करण्यास सांगितलं होतं. हे देखील वाचा: विवोचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लाँच; Vivo X90 आणि Vivo X90 Pro येत आहेत भारतात

इनपुट्सच्या आधारावर, गृह मंत्रालयाने सहा महिन्यांपूर्वी 28 लोन देणाऱ्या चिनी अ‍ॅपचे विश्लेषण सुरु केले होते. त्यातून समजलं की ई-स्टोरवर 94 अ‍ॅप उपलब्ध आहेत आणि अन्य थर्ड-पार्टी लिंकच्या माध्यमातून काम करत आहेत. हे अ‍ॅप आता स्मार्टफोनवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाहीत परंतु सूत्रांनुसार, सट्टेबाजीचे अ‍ॅप आणि गेम आता स्वतंत्र लिंक किंवा वेबसाइटच्या माध्यमातून डाउनलोड केले जात आहे.

The post भारत सरकारनं घातली 232 चिनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी; लोन आणि सट्टेबाजीवर डिजिटल स्ट्राइक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/india-bans-over-230-betting-an-loan-app-chinese-links/feed/ 0
आता 47 चायनीज ऍप्स वर बंदी, PUGB समवेत 250 पेक्षा जास्त Apps वर पण टांगती तलवार, बघा संपूर्ण यादी https://www.91mobiles.com/marathi/47-more-chinese-apps-banned-in-india-over-250-more-apps-reportedly-under-the-radar-including-pubg/ https://www.91mobiles.com/marathi/47-more-chinese-apps-banned-in-india-over-250-more-apps-reportedly-under-the-radar-including-pubg/#respond Mon, 27 Jul 2020 11:00:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7701 भारत सरकारने आईटी ऍक्टच्या सेक्शन 69ए अंतर्गत भारतात अजून 47 चीनी ऍप्स वर बंदी घातली आहे.

The post आता 47 चायनीज ऍप्स वर बंदी, PUGB समवेत 250 पेक्षा जास्त Apps वर पण टांगती तलवार, बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारत सरकारने आईटी ऍक्टच्या सेक्शन 69ए अंतर्गत भारतात अजून 47 चीनी ऍप्स वर बंदी घातली आहे. याआधी सरकारने 59 चीनी ऍप्स बॅन केले होते, ज्यात लोकप्रिय ऍप टिकटॉक, शेयरइट आणि इतर अनेक ऍप्सचा समावेश होता. भारतात नवीन 47 प्रतिबंधित ऍप्सची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. अशाप्रकारे भारत सरकारने एकूण 106 ऍप्स भारतात प्रतिबंधित करण्यात आले आहेत. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार बॅन करण्यात आलेल्या ऍप्स मध्ये बऱ्याचश्या क्लोन ऍप्सचा समावेश आहे. म्हणजे आधी बॅन केलेल्या ऍप्स प्रमाणे ऍप बनवून हे ऍप्स सादर करण्यात आले होते. या ऍप्स वर यूजर्सच्या डेटा चोरीचा आरोप आहे.

चायनीज ऍप्स वर भारत सरकारची नजर आहे. या ऍप्सचा तपास करून सरकार यातील धोकादायक प्रोसेसेसची समीक्षा करत आहे. कोणत्याही परिस्थितीत या चायनीज ऍप्सच्या माध्यमातून देशाची सुरक्षा आणि भारतीय यूजरच्या डेटा सुरक्षेला धोका उदभवू नये असा सरकराचा प्रयत्न आहे.

पबजी वर टांगती तलवार

टिकटॉक सोबतच 59 ऍप बॅन केल्यावर सरकारची नजर 250 पेक्षा जास्त चीनी ऍप्स वर आहे. यात लोकप्रिय गेमिंग ऍप PUBG चा पण समावेश आहे. सराकार कडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार एका अधिकाऱ्याने सांगितले आहे कि चीन ऍप्सची सतत तपासणी चालू आहे आणि त्यांना फंडिंग कुठून मिळत आहे याचा देखील शोध घेतला जात आहे. अधिकाऱ्यांच्या मते काही ऍप्समुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे दिसून आले आहे तर काही ऍप डेटा शेयरिंग आणि गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत.

भारतीय सैन्याने बॅन केले हे ऍप्स

अलीकडेच भारतीय सैन्याने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Facebook, Instagram, Truecaller, आणि PUBG सहित 89 ऍप वर बंदी घातली आहे. या ऍप्समुळे सौन्याला फक्त साइबर घुसखोरीची भीती नाही तर माहिती फुटण्याची पण चिंता आहे. सरकारने 59 चीनी ऍप्स वर बंदी घातली होती. पण आर्मीने बंदी घातलेल्या ऍप्सची यादी थोडी मोठी आहे आणि यात लोकप्रिय ऍप जसे कि फेसबुक, इंस्टाग्राम व डेटिंग ऍप टिंडरचा पण समावेश आहे.

प्रतिबंधित ऍप्सच्या यादीत TikTok, BigoLive आणि WeChat सह Truecaller, Zoom and Vigo Video ऍप्सचा समावेश आहे. भारतीय सैन्याच्या सैनिकांना Tinder, Bumble, Happn, TrulyMadly, Aisle, Coffee Meets Bagel, Couch Surfing आणि वीडियो स्ट्रीमिंग ऍप जसे कि Zoom, LiveMe, Vmate, आणि Uplive पण डीलिट करण्यास सांगण्यात आले आहे. इथे क्लिक करून संपूर्ण यादी बघा.

The post आता 47 चायनीज ऍप्स वर बंदी, PUGB समवेत 250 पेक्षा जास्त Apps वर पण टांगती तलवार, बघा संपूर्ण यादी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/47-more-chinese-apps-banned-in-india-over-250-more-apps-reportedly-under-the-radar-including-pubg/feed/ 0
दोन फोन मध्ये वापरा एकच WhatsApp, जाणून घ्या संपूर्ण पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-use-whatsapp-with-the-same-number-two-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-use-whatsapp-with-the-same-number-two-smartphone/#respond Wed, 08 Jul 2020 11:25:31 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7612 या खास फीचरच्या माध्यमातून यूजर्स आपले अकाउंट एकाचवेळी अनेक डिवाइसेस मध्ये वापरू शकतील.

The post दोन फोन मध्ये वापरा एकच WhatsApp, जाणून घ्या संपूर्ण पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp शानदार फीचर्स सह येतो. फेसबुकच्या मालकीची कंपनी व्हाट्सऍप अनेक दिवसांपासू आपल्या यूजर्ससाठी चांगले फीचर्स घेऊन येत आहे, ज्यामुळे यूजर्ससाठी चॅटिंग करणे सोप्पे होते. काही दिवसांपूर्वी व्हाट्सऍप वर Dark Mode फीचर लॉन्च केला गेला होता, जो यूजर्सना खूप आवडला आहे. अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती कि कंपनी मल्टीपल डिवाइस सपोर्ट सादर करण्याची योजना बनवत आहे.

या खास फीचरच्या माध्यमातून यूजर्स आपले अकाउंट एकाचवेळी अनेक डिवाइसेस मध्ये वापरू शकतील. सध्या निश्चित नाही कि कंपनी हे फीचर कधी सादर करेल. या फीचरविना तुम्ही एक नंबरचे व्हाट्सऍप अकाउंट फक्त एकाच फोन वर वापरू शकता. पण एका ट्रिकच्या मदतीने आता तुम्ही एकाच नंबर वरून दोन मोबाईल फोन वर व्हाट्सऍपचा वापर करू शकता. खास बाब अशी कि असे करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टि ऍपची गरज नाही.

फॉलो करा या स्टेप्स

1. सर्वात आधी ज्या फोन मध्ये तुम्ही व्हाट्सऍप वापरायचे आहे त्यात वेब ब्राउजर ओपन करून web.whatsapp.com वर जा.

2. त्यानंतर वेब ब्राउजर तुम्हाला व्हाट्सऍपच्या होम पेज वर घेऊन जाईल. होम पेज वर डावीकडे वरच्या बाजूला तीन डॉट वर क्लिक करा.

3. त्यानंतर ‘Request desktop site’ वर क्लिक करा.

4. त्यानंतर तुम्हाला QR कोड मिळेल.

5. ज्या फोन मध्ये यूजर आधी पासून व्हाट्सऍप वापरात होते त्या फोन मध्ये Settings मध्ये जाऊन यूजरला WhatsApp Web सेलेक्ट करावा लागेल.

6. दुसऱ्या फोन मधील QR कोड अधसह्य फोनने स्कॅन करा त्यानंतर लगेचच दुसऱ्या व्हाट्सऍप लॉगिन होईल.

नोट: लक्षात असू द्या की दोन मोबाईल फोन वर एकच व्हाट्सऍप अकाउंटचा वापर करण्यासाठी तुमच्या दोन्ही फोन मध्ये इंटरनेट चालू असणे आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर सिम विना पण यूजर्स व्हाट्सऍपचा वापर करू शकतात.

The post दोन फोन मध्ये वापरा एकच WhatsApp, जाणून घ्या संपूर्ण पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-use-whatsapp-with-the-same-number-two-smartphone/feed/ 0
WhatsApp ने केला नवीन रेकॉर्ड, आतापर्यंत 5 अब्ज वेळा झाला इंस्टॉल https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-crosses-5-billion-downloads-on-google-play-store/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-crosses-5-billion-downloads-on-google-play-store/#respond Wed, 22 Jan 2020 14:04:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6359 मिळालेल्या माहितीनुसार व्हाट्सऍप वर सध्या 2020 मध्ये तरी जाहिराती दिसणार नाहीत.

The post WhatsApp ने केला नवीन रेकॉर्ड, आतापर्यंत 5 अब्ज वेळा झाला इंस्टॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
लोकप्रिय मेसेजिंग ऍप व्हाट्सऍप एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे. नुकतेच गूगल प्ले स्टोर वर याचे 5 बिलियन डाउनलोड्स पूर्ण झाले आहेत, ज्याची माहिती कंपनीने दिली आहे. विशेष म्हणजे फेसबुक नंतर 5 बिलियन डाउनलोड असलेला हा दुसरा नॉन गूगल ऍप आहे. व्हाट्सऍप व्यतिरिक्त मार्केट मध्ये इतर अनेक मेसेजिंग ऍप आहेत. पण जेवढी व्हाट्सऍपला लोकप्रियता मिळाली आहे तेवढी इतर कोणाला मिळाली नाही.

तसेच यूजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी व्हाट्सऍप मध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. फेसबुकच्या मालकीचा व्हाट्सऍप यूजर एक्सपीरियंस सुधारण्यासाठी सतत नवीन अपडेट्स पण देत असतो.

व्हाट्सऍपचे 5 बिलियन डाउनलोड होणे आश्चर्यकारक नाही कारण हा जगभरात हा ऍप सर्वांना आवडतो. व्हाट्सऍप जगभरात सर्वात जास्त वापरला जाणारा चॅट ऍप आहे, ज्याचे अंदाजे मासिक सक्रिय यूजर 1.5 बिलियन पेक्षा जास्त आहेत. जेव्हापासून फेसबुकने कार्यभार सांभाळला आहे व्हाट्सऍपच्या फीचर सेट मध्ये खूप सुधार झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा आहे कि व्हाट्सऍप वर डार्क मोड येत आहे. व्हाट्सऍप कडून डार्क मोड फीचरच्या लॉन्चची कोणतीही माहिती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. याव्यतिरिक्त गेल्या काही दिवसांत व्हाट्सऍप मध्ये अनेक नवीन फीचर आले आहेत.

व्हाट्सऍप पूर्णपणे फ्री ऍप आहे. तसेच या ऍप वर जाहिराती यूजर्सना त्रास देत नाहीत, पण असे बोलले जात आहे कि आता हे बदलणार आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार व्हाट्सऍप वर सध्या 2020 मध्ये तरी जाहिराती दिसणार नाहीत.

The post WhatsApp ने केला नवीन रेकॉर्ड, आतापर्यंत 5 अब्ज वेळा झाला इंस्टॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-crosses-5-billion-downloads-on-google-play-store/feed/ 0