Vivo X90 आणि Vivo X90 Pro चीनच्या बाहेर प्रथमच मलेशियन बाजारात लाँच

Highlights

  • Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन ग्लोबली लाँच झाले आहेत.
  • लवकरच हे दोन्ही मोबाइल फोन भारतात दाखल होतील.
  • 120W fast charging आणि MediaTek Dimensity 9200 सह फोनची एंट्री.

Vivo X90 आणि Vivo X90 Pro स्मार्टफोन ग्लोबली लाँच झाले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये ही सीरीज चायनामध्ये सादर करण्यात आली होती ज्यात या दोन्ही मोबाइल्स सह Vivo X90 Pro Plus देखील आला होता. आता विवो एक्स90 आणि एक्स90 प्रो चीनच्या बाहेत जागतिक बाजारात आले आहेत जे लवकरच भारतीय बाजारात देखील येतील.

Vivo X90 आणि X90 Pro ची किंमत

विवो एक्स90 आणि एक्स90 प्रो ग्लोबल मार्केटमध्ये सर्वप्रथम मलेशियामध्ये लाँच झाले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये सादर झाले आहेत ज्यात 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता Vivo X90 स्मार्टफोन MYR 3,699 (जवळपास 70,000 रुपये) तर Vivo X90 Pro मॉडेल MYR 4,999 (जवळपास 95,000 रुपये) मध्ये लाँच झाला आहे. वॅनिला मॉडेल Breeze Blue आणि Asteroid Black तर प्रो मॉडेल Legend Black vegan leather ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. हे देखील वाचा: वनप्लसला टक्कर देण्यासाठी विवो सज्ज; Vivo Y100 ची होणार भारतात जबरदस्त एंट्री

Vivo X90 आणि X90 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.78″ FHD+ OLED display
  • 12GB RAM + 256GB storage
  • MediaTek Dimensity 9200
  • 32MP Selfie Camera
  • 120W Fast Charging

विवो एक्स90 आणि एक्स90 प्रो 2800 × 1260 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाले आहेत. ही Q9 Ultra-Vision AMOLED पॅनल स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. दोन्ही स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतात तसेच 1300निट्स ब्राइटनेस व 2160हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग सारख्या फीचर्सना सपोर्ट करतात.

दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला मीडियाटेक डिमेनसिटी 9200 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 3.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. अँड्रॉइड 13 सह एक्स90 मध्ये फनटचओएस 13 देण्यात आला आहे तर एक्स90 प्रो ओरिजनओएस 3 वर चालतो. हे विवो स्मार्टफोन 12GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 4.0 storage ला सपोर्ट करतात.

Vivo X90 आणि X90 Pro स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. रियर कॅमेरा सेटअप पाहता एक्स90 मध्ये 50MP IMX866 प्रायमरी सेन्सरसह 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 12MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. तर एक्स90 प्रो 50MP IMX989 सेन्सरसह 12MP IMX663 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 50MP IMX758 पोर्टरेट लेन्सला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: वनप्लसपेक्षा स्वस्त झाला Samsung Galaxy S22, जुना स्टॉक संपवण्यासाठी किंमतीत मोठी कपात

दोन्ही विवो स्मार्टफोन 5G SA/ NSA आणि Dual 4G VoLTE ला सपोर्ट करतात. पावर बॅकअपसाठी Vivo X90 मध्ये 4,810एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. तर Vivo X90 Pro स्मार्टफोन 4,870एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. दोन्ही मोबाइल फोन्स 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतात तसेच कंपनीनं आपला प्रो मॉडेल 50वॉट वायरलेस चार्जिंगसह सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here