लोकप्रिय मेसेजिंग ऍप व्हाट्सऍप एक नवीन कीर्तिमान स्थापित केला आहे. नुकतेच गूगल प्ले स्टोर वर याचे 5 बिलियन डाउनलोड्स पूर्ण झाले आहेत, ज्याची माहिती कंपनीने दिली आहे. विशेष म्हणजे फेसबुक नंतर 5 बिलियन डाउनलोड असलेला हा दुसरा नॉन गूगल ऍप आहे. व्हाट्सऍप व्यतिरिक्त मार्केट मध्ये इतर अनेक मेसेजिंग ऍप आहेत. पण जेवढी व्हाट्सऍपला लोकप्रियता मिळाली आहे तेवढी इतर कोणाला मिळाली नाही.
तसेच यूजर्सना चांगला अनुभव देण्यासाठी व्हाट्सऍप मध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. फेसबुकच्या मालकीचा व्हाट्सऍप यूजर एक्सपीरियंस सुधारण्यासाठी सतत नवीन अपडेट्स पण देत असतो.
व्हाट्सऍपचे 5 बिलियन डाउनलोड होणे आश्चर्यकारक नाही कारण हा जगभरात हा ऍप सर्वांना आवडतो. व्हाट्सऍप जगभरात सर्वात जास्त वापरला जाणारा चॅट ऍप आहे, ज्याचे अंदाजे मासिक सक्रिय यूजर 1.5 बिलियन पेक्षा जास्त आहेत. जेव्हापासून फेसबुकने कार्यभार सांभाळला आहे व्हाट्सऍपच्या फीचर सेट मध्ये खूप सुधार झाला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा आहे कि व्हाट्सऍप वर डार्क मोड येत आहे. व्हाट्सऍप कडून डार्क मोड फीचरच्या लॉन्चची कोणतीही माहिती अजूनपर्यंत देण्यात आलेली नाही. याव्यतिरिक्त गेल्या काही दिवसांत व्हाट्सऍप मध्ये अनेक नवीन फीचर आले आहेत.
व्हाट्सऍप पूर्णपणे फ्री ऍप आहे. तसेच या ऍप वर जाहिराती यूजर्सना त्रास देत नाहीत, पण असे बोलले जात आहे कि आता हे बदलणार आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार व्हाट्सऍप वर सध्या 2020 मध्ये तरी जाहिराती दिसणार नाहीत.