Samsung Galaxy S22 च्या किंमतीत मोठी कपात; जाणून घ्या नवी किंमत

Highlights

 • Samsung Galaxy S23 लाँच होताच Galaxy S22 च्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे.
 • हा फोन लाँच प्राइसपेक्षा 20 हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे.
 • प्राइस कट व्यतिरिक्त गॅलेक्सी एस22 वर ऑफर्स देखील मिळत आहेत.

गॅलेक्सी एस23 सीरीज भारतात लाँच झाली आहे. यात Samsung Galaxy S23 5G, S23 plus 5G आणि S23 Ultra 5G फोन आले आहेत जे प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. Galaxy S23 series ची एंट्री होताच कंपनीनं आपल्या Samsung Galaxy S22 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. लाँच प्राइसच्या तुलनेत आता गॅलेक्सी एस22 5जी फोन 20,000 रुपये स्वस्त झाला आहे. हे देखील वाचा: Samsung ने लाँच केले दोन दणकट स्मार्टफोन; Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus उडवणार वनप्लसची झोप

Samsung Galaxy S22 Price

जुनी किंमत:

 • 8GB RAM + 128GB Storage = 72,999
 • 8GB RAM + 256GB Storage = 76,999

नवीन किंमत:

 • 8GB RAM + 128GB Storage = 52,999
 • 8GB RAM + 256GB Storage = 56,999
 • सॅमसंग गॅलेक्सी एस22 5जी फोन भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. याच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जो 72,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता. तर फोनचा दुसरा व्हेरिएंट 8जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो जो 76,999 लाँच प्राइससह भारतीय बाजारात आला होता.

  Samsung Galaxy S23 5G आल्यानंतर आता गॅलेक्सी ए22 ची किंमत लाँच प्राइसपेक्षा 20,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट आता 72,999 रुपयांच्या ऐवजी फक्त 52,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल तसेच मोठ्या व्हेरिएंटची किंमत 76,999 रुपयांवरून 56,999 रुपये करण्यात आली आहे. फोनची नवीन प्राइस ऑफिशियल वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या किंमतीव्यतिरिक्त प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या ऑफर्स देखील मिळत आहेत.

  Samsung Galaxy S22 specifications

  सॅमसंग गॅलेक्सी S22 मध्ये 6.1-इंचाचा FHD+ डायनॅमिक AMOLED 2X Infinity-O डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात 120Hz वेरिएबल रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 2,000,000:1 कंट्रास्ट रेश्यो, 1.300 निट्स पीक ब्राइटनेस आणि आय कम्फर्ट शील्ड आहे. फोन अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो, तसेच गोरिल्ला ग्लास विक्टसची सुरक्षा मिळते. Samsung Galaxy S22 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेटवर चालतो. हे देखील वाचा: Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली; आता प्रीबुक केल्यास भरपूर फायदे

  फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी S22 मध्ये ट्रिपल रियरला सपोर्ट करतो ज्यात ड्युअल पिक्सेल ऑटोफोकस, f/1.8 अपर्चर, OIS आणि 85-डिग्री FoV सह 50MP चा प्रायमरी सेन्सर, f/2.2 अपर्चर असलेला 12MP चा अल्ट्रावाइड अँगल सेन्सर आहे आणि f/2.2 अपर्चर लेन्ससह 120-डिग्री FoV आणि 10MP 3x टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 10एमपीचा कॅमेरा मिळतो. 3,700एमएएच बॅटरीसह फोनमध्ये 25W वायर्ड चार्जिंग, 15W वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस पावरशेयरचा सपोर्ट आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here